सोयाबीन बाजार भाव अचानक मोठी वाढ
सोयाबीन बाजार भाव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन बाजारात येत असते, काही काही ठिकाणी तर सप्टेंबर महिन्यामध्ये सोयाबीन बाजारामध्ये येत असते. पण मात्र सोयाबीनची खरी आवक ही ऑक्टोंबर महिन्यात पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आवक आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सोयाबीनला पाहिजे तितका भाव मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हे नाराज होत असतात .
नाराज होण्याचे कारण म्हणजे सोयाबीन एकरी उत्पादकतामध्ये घसर होत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला बाजारामध्ये पाहिजे तेवढा भाव मिळत नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हा नाराज होत आहे.
सोयाबीन बाजारात दाखल कधी होते?
बाजारामध्ये दरवर्षी नवीन सोयाबीन ऑक्टोंबर या महिन्यामध्ये दाखल होत असते, तसेच काही काही ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सोयाबीन या पिकाचा नवीन माल बाजारामध्ये दाखल होत असतो.पण , मात्र सोयाबीन या पिकाची खरी आवक बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. याही वर्ष दर वर्षी प्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये आवक होणार आहे.
मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक होते त्या शेतकऱ्यांना या सोयाबीन पिकाला खूप कमी दर मिळाला होता त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की, यावर्षी सोयाबीन या पिकाला कसा दर मिळतो ? सोयाबीन बाजार भाव त्यामुळे त्या शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीन पिकाला कसा दर मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हे वाचा : पी एम किसान मानधन योजना
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर
यावर्षीची हंगामातील सोयाबीन बाजारामध्ये येण्या अगोदर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर आलेली आहे. सोयाबीन बाजार भाव मागील दोन ते तीन दिवसापासून चांगली सुधारणा झालेली आहे. गणपती बाप्पाचे आगमन होणे आणि सोयाबीन बाजार भावात अचानक वाढ होणे , यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी असे म्हणतात की गणपती बाप्पा पावले.
सोयाबीन बाजार भाव पाहूया
बाजार समिति मधील माहितीनुसार, काल अकोला कृषी उत्पन बाजार समितीमध्ये सहा सप्टेंबर रोजी सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झालेले आहे. महत्त्वाचे म्हणजे काल अकोल्याच्या बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा 4000 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा जास्त झालेला आहे.
नवरात्रीच्या कालावधीमध्ये सोयाबीनची आवक बाजारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढणार आहे, त्यामुळे बाजार अभ्यासंकांनी बाजारात आलेली ही तेजी क्षणिक असल्याचे म्हटले आहे. सोयाबीनचा नवीन हंगाम ऑक्टोंबर महिन्यामध्ये म्हणजे पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
पण मात्र नवीन माल बाजारामध्ये येण्या अगोदरच सोयाबीन दरात सुधारणा झालेली आहे. कालच्या लिलावात अकोल्याच्या बाजारात सोयाबीनला किमान 4100 रुपये, कमाल 4745 रुपये आणि सरासरी 4600 कृपयाचा दर मिळाला आहे.
गेल्या आठवड्यातील सोयाबीनचे दर
गेल्या आठवड्यातील सोयाबीनचे दर बघायचे म्हटलं तर , कमीत कमी दर 3800 रुपयापर्यंत , जास्तीत जास्त दर 4300 रुपयाच्या आत आणि सरासरी दर 4200 पर्यंत होता, पण मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे.
काल तर , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी समाधानकारक सोयाबीनला भाव मिळालेला आहे. सोयाबीन दरात अचानक सुधारणा झालेली आहे. पण, ही सुधारणा सध्या बाजारातील उलाढालीमुळे झाल्याचा कयास आहे. यामुळे हे सोयाबीनचे दर जास्त दिवस टिकणार नाही असे वाटत आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “सोयाबीन बाजार भाव अचानक मोठी वाढ पहा महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळतोय.”