प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : नोंदणी कशी कराल? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी वेगवेगळे योजना राबविण्यात येत असतात. त्या योजनेपैकीच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक योजना आहे. तर आज आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहूया . प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ही योजना गरीब व गरजू कुटुंबांसाठी असून त्यांना उत्तम आरोग्य सेवा विनामूल्य मिळावी यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून गरीब कुटुंबांना आर्थिक संकट न येता वैद्यकीय उपचार घेण्याची संधी मिळवून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेता येतो. या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना दर्जाची दवाखान्याची सोय उपलब्ध व्हावी, असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे गरीब नागरिकांना आरोग्याच्या संबंधित कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, अशा पद्धतीने या योजनेची रचना करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

हे वाचा : सोलर पंप अर्ज मंजूर झालाय का? तर तपासू शकतात सोलर पंप अर्जाची स्थिती,पहा सविस्तर माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Give blood, give hope जागतिक रक्तदाता दिन २०२५: Give blood, give hope

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये

  1. आरोग्य विमा रक्कम:
    • प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष ₹5 लाखांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात.
  2. दवाखान्याची निवड:
    • लाभार्थी सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात.
  3. खर्चाचा समावेश:
    • दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच्या तीन दिवसांपासून दाखल झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर केला जातो.
  4. सर्वसमावेशक लाभ:
    • औषधे, वैद्यकीय उपकरणे, राहण्याची आणि जेवणाची सोय योजनेत समाविष्ट आहे.
  5. पात्रता:
    • कुटुंबाचा आकार, वय किंवा लिंग यावर कोणतेही बंधन नाही.
  6. अशा वैद्यकीय स्थितीसाठी लाभ:
    • आधीपासून असलेल्या आजारांवरही या योजनेअंतर्गत उपचार केले जातात.
  7. लाभार्थी संख्या:
    • देशातील 12 कोटींहून अधिक गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत.

प्रधानमंत्री जन आरोग्य नोंदणी प्रक्रिया

  1. PMJAY पोर्टलला भेट द्या:
    • अधिकृत वेबसाईट pmjay.gov.in वर जा.
  2. नोंदणी करा:
    • नोंदणी करण्यासाठी मेनूमधून PMJAY Gov हा पर्याय निवडा आणि अर्ज भरन्यास सुरुवात करा.
  3. वैयक्तिक माहिती भरा:
    • आधार क्रमांक, संपर्क तपशील आणि वैयक्तिक माहिती भरा.
  4. कागदपत्रे अपलोड करा:
    • आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
  5. फॉर्म पुष्टी:
    • सर्व माहिती योग्य आहे याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
  6. मोबाईल नंबर सत्यापन:
    • मोबाईल नंबर व्हेरिफाय करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  7. अशा पद्धतीने तुम्हाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अर्ज भरु शकतात .

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

ज्या नागरिकांचे वय 70 पेक्षा जास्त आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान ॲपवरून त्यांची नोंदणी करू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 29 ऑक्टोंबरल आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB PM – JAY) अंतर्गत आयुष्यमान वय वंदना हेल्थ कार्ड लाँच केले आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करण्यासाठी फक्त आधार कार्ड असणे आवश्यक आहे . प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा निधी पूर्णपणे सरकारकडून दिला जाणार आहे.

निष्कर्ष

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरीब आणि गरजूंसाठी आशेचा किरण ठरली आहे. सरकारकडून पुरवला जाणारा निधी आणि विनामूल्य सेवा यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटातून मुक्ती मिळाली आहे. गरजूंनी या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत नोंदणी करून तिचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा:
mukhyamantri sahayata nidhi mukhyamantri sahayata nidhi : मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा मिळवा लाभ.

1 thought on “mukhyamantri sahayata nidhi : मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा मिळवा लाभ.”

Leave a comment