cotton rate update एक ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नव्या हंगामात 2023 24 मधील शिल्लक स्टॉप खूप कमी आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते भारतात यंदा जवळपास 23 लाख गाठी शिल्लक असून, मागील हंगामातील जवळपास 29 लाख गाठी कापूस शिल्लक असला तरी मागणीमुळे दर वाढण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे.
यावर्षी देशांमध्ये कापूस या पिकाची उत्पादन कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. कारण की यावर्षी देशांमध्ये कापूस या पिकाची लागवड कमी प्रमाणात झालेली आहे. आणि अतिवृष्टी, पूर यामुळे कापूस या पिकाच्या गोंड्या खराब होणे, पाते गळणे आणि बोंड आळी यामुळे पिकाची नुकसान होत आहे. मागील हंगामातील कापसाचा स्टॉप कमी असल्यामुळे, देशातील कापसाचा पुरवठा कमी होऊन कापसाच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव नीचाकी पातळीवर असतानाच ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून कापूस आयातीचे वायदे झाले आहेत . तसेच देशात या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता धरून आयातदार अगोदर पासूनच आयातीसाठी सौदे करून ठेवत आहेत. पण, देशामध्ये नेमकी कापूस पिकाचे उत्पादन किती होईल, हे आता सध्या सांगता येणार नाही. पण सध्या नवीन कापसाचे दर हे 7 हजार ते 7 हजार 700 रुपयांच्या आसपास आहे. देशामध्ये कापसाच्या उत्पादनात जास्तीत जास्त प्रमाणात घट झाल्यास कापसाचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे आयातदार अंगावरून सौदे करत आहेत, अशी माहिती उद्योगातून सांगण्यात येत आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 जमा
cotton rate update कापूस उत्पादन पिकाचे दर
cotton rate update या वर्षी देशामधील काही बाजारामध्ये नवा कापूस दाखल होत आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये हा नवा कापूस विक्रीसाठी येत असून, हा कापूस ओला असल्यामुळे सध्या या नव्या कापसाला सरासरी 7 हजार ते 7 हजार 700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
शासनाने यावर्षी मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी 7 हजार 121 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी 7 हजार 521रुपये हमीभाव जाहीर केला आहे. म्हणजे सध्या देशामध्ये हमीभावा दरम्यान कापसाचे दर आहेत.
देशामध्ये मागील हंगामात कापसाचे उत्पादन घटले होते. ज्यामुळे कापसाचे भाव कमी झाले आणि वापर जास्त प्रमाणात वाढला होता त्यामुळे मागील हंगामातील कापसाचा स्टॉक कमी आहे. २०२३-२४ एक ऑक्टोंबर पासून सुरू झालेल्या नव्या शिल्लक स्टॉप कमी आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आतून गणात्रा हे म्हणाले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे म्हणणे असे आहे की, यावर्षी सरासरी 23 लाख गाठी कापूस शिल्लक आहे. आणि मागील हंगामात सरासरी 29 लाख गाठी कापूस शिल्लक होता.
देशामध्ये कापूस या पिकाची लागवड
देशामध्ये कापूस या पिकाची लागवड 17 टक्क्यांनी कमी झालेली आहे. कापूस या पिकाची लागवड उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. उत्तर भारतामध्ये, महाराष्ट्र आणि गुजरात या भागांमध्ये गुलाबी बोंड अळीचा परिणाम झाला आहे. तसेच अतिवृष्टी, ढगफुटी यासारख्या प्रकारामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील पिकाला मोठा फटका बसला आहे. इतरांच्या मध्येही पिकांची नुकसान झाले असून, तेलंगणातही फटका बसला आहे असे सांगितले जाते.
cotton rate update त्यामुळे कापूस या पिकामध्ये उत्पादन कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षी पेक्षा 7 टक्क्यापर्यंत कमी राहील.
देशामध्ये यावर्षी कापूस या पिकाची लागवड उशिरा झालेली आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडायला उशीर झाल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाची लागवड करायला जवळपास एक महिना लेट झालेला आहे. त्यामुळे बाजारामध्ये कापसाची आवक ही उशिरा वाटण्याची शक्यता आहे. देशामधील अशी परिस्थिती पाहता कापूस आयातदार कापसाचे सौदे करून ठेवत आहे. देशात कापूस आयातीवर 11 टक्के आयात शुल्क लागू आहे. मात्र मधल्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे 66 ते 67 सेट प्रति पाउंडपर्यंत कमी झाले होते. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यामध्ये 7 ते 10 लाख कापूस आयातीचे सौदे झाल्याची शक्यता आहे.
असा अंदाज व्यक्त करण्यात येतो की, कापूस उत्पादन कमी करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्पादनातील घटीचा अंदाज. त्यामुळे देशातील कापूस आयातदार आतापासूनच आयातीचे सौदे करून ठेवत आहे. पण यापुढे कापूस उत्पादनाची परिस्थिती एक ते दोन आठवड्यामध्ये स्पष्ट होईल. त्यावेळी देशातील कापसाचे बाजारातील भावाची स्थिती काय राहू शकते याचा पण अंदाज येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती
सध्या अमेरिकेच्या कापसाचे भाव पातळी दरम्यान दिसून येत आहेत. मागील आठवड्यामध्ये आकडा आकडा ही वाढलेला दिसला. पण यानुसार बाजारामध्ये अपेक्षित परिणाम दिसलेला नाही. पण मात्र दुसरीकडे ब्राझीलच्या कापसाला चांगला उठाव मिळत आहे. अमेरिकेमध्ये काही भागात कापूस हे पिकांना वादळ आणि पावसाचा फटका बसलेला आहे. तर दुसरीकडे चीनची मागणी आतापर्यंत गार वाटली आहे.
तसेच भारताचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या मागणी पाहिजे तेवढी नसल्याचे काही निर्यात दराने सांगितले आहे. पण त्यांनी असेही सांगितले आहे की, चीनकडून कापसाला मागणी येत आहे असेही सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे इजराइल आणि इराण मधील तणावामुळे इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब कापसासाठी पुरक असली तरी युद्धामुळे कपड्याच्या मागणीवर परिणाम दिसत असतो. या सर्व कारणामुळे जागतिक आणि देशातील कापूस बाजारापर्यंत दिसून येते.