PM Kisan Tractor : कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार असून, आधुनिक उपकरणांच्या वापराने शेती अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर बनवता येते. यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान ट्रॅक्टर सबसिडी योजना (PM Kisan Tractor Subsidy Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून शेतीच्या प्रक्रियेत सुधारणा करणे हा आहे. त्या मुळे जे शेतकरी आपल्या शेतीतील कामासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी इच्छुक आहेत. अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ नक्कीच घ्यावा.
ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान 50 टक्के दिले जात आहे, परंतु या साठी जास्तीती जास्त मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या किमतीच्या 50 टक्के जास्तीत जास्त 1,25,000 या प्रमाणात अनुदान दिले जाते. खाली थोडी आकडेवारी दिली आहे ज्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की किती खरीदी किमतीवर किती अनुदान मिळेले. ट्रॅक्टर खरेदी अनुदान हे जास्तीत जास्त 1,25,000 एवढे दिले जाते.
ट्रॅक्टर किमत | मिळणारे अनुदान |
1,00,000 | 50,000 |
2,00,000 | 1,00,000 |
2,50,000 | 1,25,000 |
5,00,000 | 1,25,000 |
8,00,000 | 1,25,000 |
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्ट
ही योजना विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. पारंपरिक शेतीत सुधारणा करून अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 20% ते 50% पर्यंत सबसिडी दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसारखे महागडे उपकरण सहज उपलब्ध होऊन वेळ, मेहनत आणि खर्च वाचवता येऊ शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल. असा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत .
हे वाचा : पीकविमा योजनेसाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ , मोफत अर्ज करा
PM Kisan Tractor योजनेचे फायदे
- उत्पादनवाढ: ट्रॅक्टर वापरामुळे कमी मेहनतीत शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणावर शेती करता येते.
- आर्थिक बचत: ट्रॅक्टरवरील सबसिडीमुळे शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक बोजा कमी होतो.
- सुधारित उपकरणे: मान्यताप्राप्त ट्रॅक्टर ब्रँड निवडण्याची मुभा असल्याने उच्च दर्जाचे उपकरण मिळते.
- कमी वेळेत अधिक कार्यक्षमता: ट्रॅक्टरच्या मदतीने मोठ्या क्षेत्रावर शेती करणे शक्य होते, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढते.
PM Kisan Tractor वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीनुसार आणि गरजेनुसार ट्रॅक्टर खरेदीवर सबसिडी दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेती प्रक्रियेतील ती सुलभ करता येते. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना कमी मेहनतीमध्ये जास्त क्षेत्रात शेती करण्याची संधी मिळते. ज्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही मान्यता प्राप्त ट्रॅक्टर ब्रँडची निवड करू शकतात. ज्यामुळे त्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे उपकरणे प्राप्त होतील.
PM Kisan Tractor पात्रता निकष
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची शेती असणे आवश्यक आहे .
- अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेचा लाभ घेण्या साठी अर्जदाराकडे आधीपासून ट्रॅक्टर नसावा .
PM Kisan Tractor आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करताना आधार कार्ड
- जमीन मालकीचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया कशी कराल?
या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागते आणि ऑनलाइन नोंदणी करावी लागते. तसेच ,आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते. काही राज्यांमध्ये अर्ज शुल्क भरण्याची सुविधा देखील आहे.जी ऑनलाइन पद्धतीने तुमला करता येते. अर्ज सादर झाल्यानंतर, सबसिडी मंजुरीसाठी विभागीय प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागते.
शेतीतील आधुनिकतेकडे पाऊल
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्य देत नाही, तर शेतीत आधुनिक उपकरणांचा वापर वाढवून उत्पादनातही सुधारणा करते. शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि देशाच्या कृषी क्षेत्राला प्रगत बनवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.PM Kisan Tractor
Sonalika tractor
Subsidy 50%
Installment
Monty
140000
10000