pmmvy benefits प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: गरोदर महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ,योजनेचा उद्देश आणि महत्त्व

pmmvy benefits प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत देणे हा आहे. जेणेकरून त्या महिलांना गरोदर असताना किंवा प्रस्तुती झाल्यानंतर नवजात बाळाची काळजी घेण्याकरिता सरकारच्या या मदतीचा लाभ होऊ शकेल. गरीब परिस्थिती असणाऱ्या महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे . या योजनेअंतर्गत, गरोदर महिलांना आणि स्तनदा मातांना एकूण 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते.

pmmvy benefits ही योजना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालय आणि समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, आणि त्यामध्ये महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या स्थितीनुसार तीन हप्त्यांमध्ये मदत दिली जाते. तसेच पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल, तर त्या महिलेला अतिरिक्त 1 हजार रुपये म्हणजेच 6 हजार रुपये दिले जातात. तुम्ही या योजनेचा लाभ जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन घेऊ शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

तर आज आपण या लेखांमध्ये या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहे, या योजनेची रक्कम कशी दिली जाईल, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक लागणारे कागदपत्रे, रक्कम मिळाली की नाही हे कुठे तपासावे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावा.

pmmvy benefits पात्रता आणि अटी

pmmvy benefits या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदार महिला भारताची कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
  • या योजनेचा लाभ एकदाच मिळू शकतो. गर्भपात किंवा मृत जन्म झाल्यास, संबंधित महिला उर्वरित हप्त्यांसाठी पात्र ठरते.
  • राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारे व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात.
  • गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी ही योजना खुली आहे.
  • या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविकाही अर्ज करू शकतात.
  • लाभार्थी महिलेचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असणे अवशक आहे .
  • अर्जदार आणि त्यांच्या पतीचे आधार कार्ड क्रमांक अनिवार्य आहे.

योजनेची रक्कम कशी मिळते?

pmmvy benefits प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना तीन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाते. प्रत्येक हप्त्याच्या शर्ती आणि रक्कम खालीलप्रमाणे आहेत:

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana
  1. पहिला हप्ता: गरोदर महिला गर्भधारणेची नोंदणी करताच तिला 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या हप्त्यामुळे महिला आपल्या गर्भधारणेची प्रारंभिक तपासणी आणि नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित होतात.
  2. दुसरा हप्ता: गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दुसऱ्या हप्त्याच्या रूपात 2000 रुपये दिले जातात. या हप्त्यात महिलांना पुढील गर्भधारणेच्या काळात आवश्यक असलेली औषधे आणि पोषण मिळवण्याची मदत केली जाते.
  3. तिसरा हप्ता: मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरण केल्यानंतर 2000 रुपये दिले जातात. या हप्त्यामुळे मुलाच्या आरोग्याच्या तपासणीला प्रोत्साहन मिळते आणि लसीकरण कार्यक्रमांचा भाग होण्याचे सुनिश्चित केले जाते.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अर्ज प्राप्त करा: महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज फॉर्म प्राप्त करू शकता.
  2. फॉर्म भरणे: अर्ज फॉर्मवर सर्व माहिती भरा. यामध्ये तुमचे नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, गर्भधारणेची माहिती, लसीकरणाची माहिती यांचा समावेश असावा लागतो.
  3. कागदपत्रांची जोडणी: अर्ज भरण्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जोडावीत. या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक खाती, MCP कार्ड (माता बाल संरक्षण कार्ड), आणि इतर संबंधित दस्तऐवज असतात.
  4. अर्ज सादर करा: अर्ज भरणे पूर्ण झाल्यानंतर अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात जमा करा. येथे तुम्हाला एक पोचपावती मिळेल, जी भविष्यात कागदपत्रांच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरेल.

अर्ज स्वीकारण्याची अटी

  • अर्ज करताना लाभार्थी महिलेने तिच्या आणि तिच्या पतीच्या स्वाक्षरी केलेली हमीपत्र/संमती पत्र देणे आवश्यक आहे.
  • मोबाईल नंबर आणि आधार कार्ड यांची लिंक असावी लागते.
  • बँक खात्याची माहिती, तसेच एमसीपी कार्ड आणि जन्म प्रमाणपत्राची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रत्येक हप्त्याच्या दावा प्रक्रियेत संबंधित तपासणी आणि नोंदणीची छायाप्रत आवश्यक आहे.

कागदपत्रांची आवश्यकता

  • लाभार्थी महिलेच्या स्वाक्षरी केलेले हमीपत्र.
  • महिलाचे आधार कार्ड आणि पतीचे आधार कार्ड.
  • मोबाईल नंबर, जो आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
  • बँक खाते तपशील.
  • एमसीपी (MCP) कार्ड (माता बाल संरक्षण कार्ड).
  • गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रस्तुतीपूर्वी तपासणी दर्शविणारे एमसीपी कार्ड कार्डाची झेरॉक्स.
  • मुलीच्या जन्माची नोंदणीची एक प्रत आणि लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केलेली असल्याचे दर्शवणारे एमसीपी कार्ड.

pmmvy benefits रक्कम मिळाली की नाही हे कसे तपासावे?

  1. योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर, लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट पेमेंट मिळते. यासाठी DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने रक्कम हस्तांतरित केली जाते.
  2. रक्कम मिळाली का हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
  3. तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म ओपन करा.
  4. तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  5. लॉग इन केल्यानंतर, पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थ्याची स्थिती माहिती करून घेण्याचा पर्याय मिळेल.
  6. तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून सर्च या बटणावर क्लिक करावे लागेल.
  7. सर बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्यासमोर दिसेल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल.
  8. तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासू शकतात आणि तो डाउनलोड करण्याची पण सुविधा उपलब्ध आहे.

हे वाचा: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सविस्तर माहिती

निष्कर्ष

pmmvy benefits प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गरोदर महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत पुरवून त्यांचे जीवन अधिक सुलभ करते. या योजनेच्या मदतीने महिलांना त्यांचा गर्भधारणेचा काळ सुरक्षित आणि आरामदायक बनवता येतो. योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे, आणि योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यास महिलांना त्वरित लाभ मिळतो.pmmvy benefits



हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

Leave a comment