PM Kisan Samman Nidhi Yojana New update :19 व्या हप्त्यापासून राहणार 3 कोटी शेतकरी वंचित! पहा तर कारण काय?जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने 19व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. मात्र, यावेळीही सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 3 कोटी शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळणार नाही. तर त्याचे कारण असे आहे की, सरकारी आकडेवारीनुसार अजूनही असे कोट्यावधी शेतकरी आहेत ज्यांनी सरकारी आदेशाचे पालन केलेले नाही . त्या मुळे अशा शेतकऱ्यांना सरकार यावेळीही 19व्या किस्तेपासून वंचित ठेवणार आहे.तर या लेखामध्ये पाहूया कोणते शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहे.
![PM Kisan Samman Nidhi Yojana New update](https://marathitantradnyanmahiti.com/wp-content/uploads/2024/12/20241218_162928.jpg)
PM Kisan Samman Nidhi Yojana New update कोणते शेतकरी लाभापासून वंचित राहणार?
सरकारने योजना अधिक पारदर्शक आणि काटेकोर करण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक अटींचे पालन करण्याची सूचना केली होती. मात्र, अजूनही बरेच शेतकरी या नियमांचे पालन करत नाहीत.
- eKYC पूर्ण केले नाही:
ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. - भूलेख सत्यापन न केलेले:
सरकारी नोंदींनुसार जमिनीची माहिती अद्ययावत केलेली नसल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत. - आधार बँक खात्याशी लिंक न केलेले:
आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यास शेतकऱ्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नाही.
हे वाच : या योजनेतून महिलांना मिळणार 7 हजार रुपये महिना.
मागील हप्त्याचा फायदा केवळ 9.4 कोटी शेतकऱ्यांना
ऑक्टोबर महिन्यात, 18 व्या हप्त्यांतर्गत केवळ 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यावेळीही 2.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. यावेळी देखील नियमांचे पालन न करणाऱ्या 3 कोटी शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana New update 19व्या हप्त्याची तारीख कधी आहे?
सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी जानेवारीच्या मध्यात 19वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे.
लाभ घेण्यासाठी काय करावे?
जर तुम्ही अजूनही खालील प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास, ती लवकरात लवकर पूर्ण करा:
- eKYC:
ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान पोर्टल किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन E kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी . - भूलेख सत्यापन:
आपल्या जमिनीशी संबंधित माहिती राज्य सरकारच्या भूलेख पोर्टलवर नोंदवा. - आधार लिंक:
तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का याची खात्री करून घ्यावी .
PM Kisan Samman Nidhi Yojana New update शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ठरवलेले नियम पूर्ण करणे आवश्यक आहे. 19व्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला योजनेपासून वंचित राहावे लागेल.
अधिक माहितीसाठी
सरकारी पोर्टलवर भेट द्या किंवा आपल्या गावातील सहाय्यकांकडे चौकशी करा. आपला हक्काचा लाभ वेळेत मिळवण्यासाठी योजनेच्या अटी व नियमांचे पालन करा. PM Kisan Samman Nidhi Yojana New update .