Namo shetkari yojana status check online : शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महत्त्वाची आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी थोडासा आधार मिळतो. तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात का, हे तपासण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे . तर आज आपण या लेखामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी स्टेटस ऑनलाइन कसे तपासायचे हे सविस्तर पाहणार आहोत .
Namo shetkari yojana status check online पोर्टलवर कसे जावे?
लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (nsmny.gov.in) भेट द्यावी. पोर्टलवर गेल्यानंतर उजव्या बाजूस “Beneficiary Status” नावाचा पर्याय दिसतो. यावर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करता येते.
हे वाचा: नमो शेतकरी योजना
लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी आवश्यक माहिती
लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी दोन मुख्य पर्याय आहेत:
- रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे
- मोबाईल नंबरच्या आधारे
जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल, तर मोबाईल नंबरद्वारे तपासणी करता येते. मात्र, मोबाईल नंबर एकाच खात्यासाठी नोंदणीकृत असावा, अन्यथा रजिस्ट्रेशन नंबरची आवश्यकता भासेल.
रजिस्ट्रेशन नंबर असा शोधा .
Namo shetkari yojana status check online जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल, तर तुम्हाला पोर्टलवरील “Get Registration Number” या पर्यायावर क्लिक करावे लागेल . त्यानंतर, खालील प्रक्रिया फॉलो करा:
- आधार नंबर किंवा मोबाईल नंबर भरा.
- दिलेला कॅप्चा कोड टाका.
- नंतर, मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
- “Get Data” वर क्लिक करा.
यामुळे तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर स्क्रीनवर दिसेल.
लाभार्थी स्टेटस कसे तपासायचे?
रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर भरून तुम्हाला लाभार्थी स्टेटस तपासता येते. संबंधित माहिती टाकल्यानंतर पुन्हा एकदा ओटीपी टाकावा लागतो.otp टाकल्या नंतर ,
“Get Data” या पर्यायावर क्लिक करा . क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती मिळेल:
- शेतकऱ्याचे नाव
- रजिस्ट्रेशन तारीख
- जमीन मोजणीचा डेटा
- मोबाईल नंबर
- योजनेअंतर्गत पात्रतेसंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध होईल.
हप्त्यांची माहिती कशी शोधावी
Namo shetkari yojana status check online या योजनेअंतर्गत आतापर्यंत मिळालेल्या हप्त्यांची माहिती देखील पोर्टलवर पाहता येते. तुम्हाला या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेतका किंवा जमा झालेले नसल्यास का मिळाले नाही, हे देखील तपासता येते. यासाठी युटीएल नंबर आणि हप्त्यांची तारीख या ठिकाणी पाहता येईल.
ऑनलाईन प्रक्रिया अत्यंत सोपी आहे
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी स्टेटस तपासण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद आहे. फक्त दोन मिनिटांत तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता. ऑनलाईन पोर्टलमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या लाभाची संपूर्ण माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे.