Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी; शासन निर्णयानुसार पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळणार लाभ.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र् राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रतिमाहा 1500 दिले जातात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोंबर देण्यात आलेली होती. 15 ऑक्टोंबर पर्यंत या योजनेअंतर्गत 69 लाख महिलांनी अर्ज केले आहेत. 69 अर्जापैकी 2 कोटी 58 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहे. पण मात्र, राज्यात 2 कोटी 58 लाख महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी कसे , या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार तपासून पाहण्याच्या तयारीत आहेत . तसेच अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर पडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्राने सांगितले.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana 2100 प्रति महिन

या योजनेअंतर्गत सध्याच्या स्थितीमध्ये लाभार्थीं संख्येवरून प्रत्येकी दीड हजार रुपये प्रमाणे दरवर्षी 46 हजार कोटी (दरमहा 3870 कोटी) रुपये द्यावे लागणार आहेत.आता या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येकी 2100 रुपये देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकारला दरवर्षी 65 हजार कोटी रुपये लागणार आहे. तिजोरीची सध्या स्थिती पाहिली तर एवढा निधी उभारायचा कसा, हा मुख्य प्रश्न सरकार समोर आहे. सध्याची स्थिती पाहतात एवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे विचार करून आगामी काळात निर्णय घेतला जाईल . Ladki Bahin Yojana

हे वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांची भरती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

Ladki Bahin Yojana परिवहन ची मदत घेणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा शासन तयार करीत आहे . यासंदर्भात प्राप्तिकर विभाग तसेच राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याशी समन्वय साधून माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्या आधारे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न, तसेच लाभार्थी महिलांच्या फॅमिली मध्ये सदस्याच्या नावावर असलेल्या चारचाकी वाहनाची माहिती घेण्यात येणार आहे आणि नंतर या योजनेसाठी पात्र न ठरणाऱ्या महिलांचे इथून पुढे हप्ते बंद केले जाणार आहेत. तसेच याप्रमाणे लाभार्थी महिला सरकारी नोकरी करीत आहे का किंवा लाभार्थी महिलाच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्याबाबत ही माहिती घेतली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषानुसार पात्र असणाऱ्या महिलांना कायमस्वरूपी दिला जाणार आहे हे निश्चित आहे. या योजनेअंतर्गत प्राप्त असणाऱ्या अर्जाच्या फेर पडताळणीचे अजून शासन स्तरावरून आदेश नाहीत, पण जेव्हा आदेश येईल त्यावेळेस मात्र अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हे काम होऊ शकते. सर्व निकषाची ऑनलाईन पडताळणी करण्यात येणार आहे आणि ते करत असताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

Ladki Bahin Yojana निकष आणि काटेकोर पडताळणीचे नियोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिलांना खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC
  1. जमिनीचे क्षेत्रफळ: कुटुंबाकडे दोन हेक्टर (पाच एकर) पेक्षा जास्त शेती जमीन नसावी.
  2. वाहन मालकी: कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नसावे.
  3. इतर योजना: लाभार्थी महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य कोणत्याही योजनांची लाभार्थी नसावी.
  4. कुटुंबातील अर्जदार संख्या: एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच अर्ज करण्याची परवानगी आहे.
  5. आर्थिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

Ladki Bahin Yojana शासन निर्णयात बदल नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला होता. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये सहा हफ्ते जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 9 हजार रुपये जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana सरकारी सेवेत असलेल्या महिलांसाठी विशेष नियम

सरकारी सेवेत काम करणाऱ्या महिलांनी स्वतःहून योजनांचा लाभ घेण्यापासून मागे हटावे, असा नियम आखण्यात आला आहे. यामुळे त्या लाभार्थीच्या जागी गरजू महिलांना संधी मिळू शकते. या निर्णयाने सरकारी सेवेतून वेगळे लाभ मिळवणाऱ्या महिलांच्या ऐवजी खऱ्या गरजू महिलांना मदत करण्याचा उद्देश साध्य होतो.

Ladki Bahin Yojana ज्या महिलांनी आधीपासून योजनांचे लाभ घेतले आहेत, त्यांना त्यांच्या लाभावर कोणताही परिणाम होणार नाही. योजनांमध्ये प्रवेश केल्यानंतर मिळालेला लाभ परत घेतला जाणार नाही. हा निर्णय त्यांच्या यथास्थितीत बदल होऊ नये, यासाठी घेतला गेला आहे.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

पहा काय म्हणाल्या अदिती तटकरे

निष्कर्ष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी मोठी आर्थिक मदत ठरू शकते. परंतु, पात्रतेचे निकष काटेकोरपणे पाळणे आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अर्जांच्या फेरपडताळणीमुळे योजनांची परिणामकारकता वाढेल आणि आर्थिक स्थैर्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल.Ladki Bahin Yojana

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

Leave a comment