महिलांसाठी महत्वाची महिला किसान योजना रु 50000 लाभ

महिला किसान योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

 शेतकऱ्यांसाठी  अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना  राबवण्यात येत आहेत. खास करून महिलांसाठी  सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. महिला किसान योजनेमार्फत लाभार्थ्यांना 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे. महिलांना 50 हजार मदत देण्यात येणाऱ्या  मदतीमध्ये   40000 हजार रुपये 5% व्याज दराने महिलांना कर्ज दिले जाते. आणि 10000 रुपये महिलांसाठी अनुदान म्हणून असते.  आता महिला पुरुषाच्या कांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला आता खूप साक्षर झाले आहेत. महिला पुरुषासारखं काम आता एकटी करत आहेत. प्रत्येक शेतातील गोष्ट त्या स्वतः हँडल करत आहेत.  महिलांना शेतकऱ्यांचे  समाजामध्ये स्थान वाढून  जीवनमान उंचावत आहेत. त्यामध्ये आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत या योजनेमार्फत   अर्थ साह्य  दिले जात आहे. महिला लाभार्थ्यांना  या योजनेमार्फत अर्ज करायचा असेल तर   स्वतः महिलेच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे. जर शेतीच्या नावावर किंवा पती-पत्नीच्या दोघांच्या नावावर असेल तरी  ह्या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या प्रबळ नसतात ज्या कमजोर असतात आणि दारिद्र्य रेषेखालील असतात. अशा महिलांना या योजनेमार्फत अनुदान दिले जात आहे. ज्याप्रमाणे त्यांची कामे अपूर्ण न राहता पूर्णपणे होतील या योजनेमार्फत महिलांना कर्ज सुद्धा मिळत आहे. ह्या योजनेचा लाभ खूप महिला घेत आहेत.

योजनेचे नाव

महिला किसान योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र राज्य

अर्ज प्रक्रिया

 ऑफलाइन  

अधिकृत संकेतस्थळ

उपलब्ध नाही

लाभ

50000  रुपये

लाभार्थी

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व चर्मकार समाजातील  महिला  शेतकरी

योजनेचा उद्देश

महिला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

महिला किसान योजना

    महिला किसान योजना ही योजना मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी काम करत आहे. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध वेगळ्या प्रकारच्या योजना शासन राबवत आहे. आणि याचा लाभ ही महिलांना मिळतो. महिला शेती करत करत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा त्याला जोडधंदा म्हणून करत आहेत. महिला स्वतःला कमी लेखायच्या महिलांना वाटायचं आम्ही काहीही करू शकत नाहीत कारण कुठेही पैसा कमी पडायचा खूप खर्च लागायचा  कोणतीही गोष्ट करायला गेले की विचार करून करावं लागत असे. पूर्ण घरचे कुटुंब चालून त्यांना मागे पुढे बघावं लागायचं  एवढं सगळं करून त्यांना अशी ती मध्ये सुद्धा खूप मेहनत करावी लागते. महिला खूप कष्टाळू असते  पण आता महिलांनी स्वतःला खूप साक्षर केला आहे. महिलांचा कॉन्फिडन्स वाढत आहे प्रत्येक गोष्ट महिला आनंदाने करताय ज्या काही योजना शासन महिलांसाठी राबवत आहेत त्यामुळे महिलांना खूप आनंद होतोय  देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी महिला या योजनेचा भरपूर चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. कारण जो खर्च स्वतः भरू शकत नव्हत्या आता तो खर्च त्यांना शासन सबसिडी अनुदान म्हणून महिलांचा खर्च कमी करत आहे.

 महिला अतिशय उत्साहाने शेती करायला आहेत. या योजनेमार्फत महिला किसान योजनेचा अतिशय मोलाचा वाटा बनतात या योजनेचा फायदा महिला अतिशय उत्कृष्ट पणाने घेत आहेत. अनुसूचित जाती जमातीतील महिलांना ज्या उपजाती आहेत जसं की ढोर, होलार मोची, चर्मकार इत्यादी प्रवर्गातील महिलांना  या योजनेचा लाभ  भेटत आहे.

महिला किसान योजना उद्दिष्ट

  1. महिलांना समाजप्रवाहात मानाचे  स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक,आर्थिक, त्याचप्रमाणे
  2. सामाजिक विकास होण्यासाठी मंडळ मार्फत योजना राबविण्यात येतात.
  3. महिलांना आत्मनिर्भर बनवणे. 
  4. महिलांना स्वावलंबी बनवणे . 
  5. महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून त्यांना समाजात उच्च स्थान मिळवून देणे. 
  6. शेतकरी महिलांना नवीन व्यवसाय करण्यासाठी प्रोस्थाहण देणे. 

महिला किसान योजना अटी व पात्रता :-

  1. .अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  2. अर्जदार हा अनुसूचित जातीतील जमातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  1. महिला किसान योजनेमार्फत महिला जो ही व्यवसाय करत आहे, त्या व्यवसायाचे ज्ञान महिलांना चांगल्या प्रकारे पाहिजे.
  2. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे आहे.
  3. महिला किसान योजना मार्फत ग्रामीण भागाकरिता 98 हजार उत्पन्न मर्यादा त्याचप्रमाणे शहरी भागांकरिता 1 लाख 20 हजार रुपये  असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  4. महिला किसान योजनेमार्फत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना लाभ देण्यात येत आहे.
  5. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार व तत्सम सक्षम प्रतिकयाने दिलेला असावा.
  6. महामंडळाने ठरवलेल्या  त्यावेळी अटी व शर्ती अर्जावर बंधनकारक राहतील

महिला किसान योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • शेत जमिनीचा 7/12 उतारा
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा जातीचा दाखला
  • अर्जदाराच्या  रहिवासी असल्याचा दाखला

महिला किसान योजना अर्ज प्रक्रिया :-

अर्ज नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात निशुल्क स्वरूपात उपलब्ध असेल.

. अर्जदाराने  विहित नमुन्यातील अर्ज भरून संपूर्ण कागदपत्र काळजीपूर्वक घेऊन समाज कल्याण च्या जिल्हा   कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे.

महिला किसान योजनेचे स्वरूप

महिला किसान योजना  मार्फत ज्या महिलांची नावे शेत जमिनीचा उतारा  शेत जमिनीच्या 7/12 उतारा किंवा पती-पत्नीच्या दोघांच्याही नावावर 7/12 उतारा आहे. अथवा पतीच्या नावाच्या 7/12 उतारा आहे. व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञापत्र ते आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेती जमिनीच्या नावे  कर्ज मंजूर तयार करून घेण्यास स्वतः तयार असेल अशा महिला लाभार्थीस रक्कम 50000/ पर्यंत अर्थसहाय्य दिले जात आहे. त्याचप्रमाणे 10000/ हजार रुपये अनुदान  व उर्वरित रक्कम 40000/ कर्ज स्वरूपात 5% व्याज दराने महिलांना मंजूर करण्यात येते. सदरील कर्ज हे फक्त शेतीसाठी किंवा शेतीविषयक व्यवसायासाठी देण्यात येते.

महिला किसान योजना

निष्कर्ष

    आपल्या सगळ्यांना माहित आहे की  शेती ही महिलांसाठी रोजगार देणारी आहे. आर्थिक दृष्ट्या सक्रिय महिला शेतामध्ये गुंतलेले आहेत या योजनेच्या मार्फत महिलांना समान अधिकार मिळत आहे. त्यासाठी महिलांना सक्षम केले आहे. महिला या योजनेमार्फत खूप  यशस्वी ठरले आहेत.

        चला महिला भगिनींनो आपल्यासाठी मराठी माहिती तंत्रज्ञान महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना पर्यंत जाण्यासाठी महिलांना मदत करत आहे  मराठी माहिती तंत्रज्ञानामुळे महिला योजनांचा नवनवीन लाभ घेत आहेत. महिला भगिनींना   मराठी माहिती तंत्रज्ञान महिलांना कोणत्याही योजनांपासून वंचित ठेवणार नाही अधिक माहितीसाठी

https://marathitantradnyanmahiti.com या संकेतस्थळाला आवश्यक  भेट द्या.

FAQ, S:-

  1. या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो?

उत्तर : अनुसूचित जातीमधील  चर्मकार प्रवर्गातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.

  1. या योजनेचा अर्ज कोठे करावा?

उत्तर : जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालय येथे अर्ज करावा.

  1. अर्ज ऑनलाईन आहे का ऑफलाईन?

उत्तर : अर्ज ऑफलाईन आहे अर्जाचा नमुना समाज कल्याण कार्यालयात मिळतो.

  1. महिला किसान योजना ही थोडक्यात काय आहे?

उत्तर : अनुसूचित जातीतील चर्मकार महिलांसाठी ही योजना आहे. या योजना मार्फत महिलांना 50 हजार  एवढी आर्थिक सहाय्यता केली जाते. यापैकी 10 हजार अनुदान असते. उर्वरित रक्कम 40 हजार  याची फेड 5 %रुपये व्याजदराने  करावे लागते.

  1. ही योजना केंद्र शासनाचे आहे का राज्य शासनाची?

उत्तर :  केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ ही योजना राबवली जाते.

 

1 thought on “महिलांसाठी महत्वाची महिला किसान योजना रु 50000 लाभ”

Leave a comment