मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन

नमस्कार आज आपण या लेखामध्ये  महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकरी यांना सोयी सुविधा पुरविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करणे बाबत माहिती या लेखाद्वारे पाहणार आहोत.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी आहे, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटीची तरतू शासनाकडून करण्यात आलेली आहे.  दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आषाढी वारी म्हटलं की सर्वांना पंढरपूर येथील विठ्ठल  रखुमाई ची आठवण येते. दरवर्षीप्रमाणे या वारीमध्ये अनेक छोट्या-मोठ्या ग्रामीण भागातून या वारीमध्ये जाण्यासाठी वारकरी सहभागी असतात. दरवर्षीप्रमाणे या वारीमध्ये 15 ते 20 लक्ष वारकरी या वारीमध्ये सहभागी असतात. वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या कुटुंबातील वारकरी हे एक महिना माऊली माऊली करत पायी चालत असतात. ही अशीच परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे यात लाखो लोक धर्मकार्य व समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. महाराष्ट्रातील थोर समाजसेवक विभूती आणि संत महंत यांचा फार मोठा हातभार आहे. याची उदाहरण म्हणजे शेकडो वर्ष पासून सुरू असलेली पंढरपूरच्या विठोबा रायाची वारी. वारी संप्रदायाचा पाया चरणाचे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिले जाते तसेच संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत बहिणाबाई, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वारी, जी आज पण या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरकडे लाखो वारकरी आषाढी एकादशीला या वारीचा आनंद घेत असतात. ज्यामध्ये अनेक जाती-धर्माचे भाविक लाखोच्या संख्येने सहभागी होतात. ही परंपरा साधारणता 800 वर्षाहून अधिक कालावधीपासून असल्याचे मानले जाते. अशा या वारकऱ्यांकरिता मा. मुख्यमंत्री, महोदयांनी   वारकरी सांप्रदाया करिता स्वातंत्र्य महामंडळ स्थापना करण्याबाबतची घोषणा केली आहे.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

आषाढी वारी म्हणलं की  विविध गावांपासून पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. या वारीमध्ये लाखो वारकरी पंढरपूर येथे जमतात, परंतु  पंथांची दीक्षा न घेतल्याने अनेक विठ्ठल भक्त ही येतात. आंध्र – कर्नाटकातून येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच वारीही आषाढी आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळी होते. या वारीमध्ये त्रिंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दर वर्षी निघत असते. तसेच यामध्ये पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणा वरून मार्गस्थ होत असतात. संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ महाराज (पैठण), संत सोपान काका (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत जनार्दन स्वामी (छत्रपती संभाजी नगर), संत जयरामस्वामी (वडगाव), संत घाडगेबोवा(कोळी), संत तपकिरीबोवा (चिंचगाव), संत मच्छिंद्रनाथ(मच्छिंद्रगड), संत रोहिदास(पंढरपूर), संत जनाबाई(पंढरपूर), संत चोखोबा(पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहूनापुरा ), संत दामाजी (मंगळवेढे), संत रखुमाबाई, संत शंकर महाराज (माऊली अमरावती), संत गोरखनाथ (शिराळ) या सर्व दिंड्यांबरोबर लाखो भावी पंढरपूरच्या मार्गावर असतात.

महाराष्ट्रातील गावागावातून लाखो भावीक  दरवर्षी वारीला जातात. यामध्ये प्रामुख्याने काम करी, शेतकरी, कष्टकरी यांचा समावेश असतो. परंतु वर्षांन – वर्ष वारकऱ्याची आणि दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनांचे सूक्ष्म निवेदन महत्त्वाचे ठरले आहे याकरिता वारी महामंडळ उपयुक्त ठरू शकेल या सर्वाचा विचार करून मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिनांक 11 जुलै 2024 रोजी वारकरी महामंडळ स्थापना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ शासन निर्णय नेमका काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

महामंडळाची रचना:

  •  मुख्यमंत्री वारकरी मंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
  •  महामंडळावर कार्य रत किंवा सेवानिवृत्ती भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
  •  मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भाग भांडवल रू. 50 कोटी इतके असेल.

प्रस्तावित महामंडळाचे कार्य

शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी वारीमध्ये पायी दिंडी   या महाराष्ट्रात आहे. सर्व तीर्थक्षेत्राचा विकास, कीर्तनकार व वारकऱ्यांना  अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा, इ . सोय सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या महामंडळामार्फत वारकरी, कीर्तनकार ,तीर्थक्षेत्रांसाठी सोयी – सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल.

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply

महामंडळाच्या प्रस्तावित योजना

  •  महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी सोडवणे
  •  सर्व पालखी सोहळ्याच्या मार्गाची सुविधा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करण्यात येईल.
  •  या वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण कवच देण्याबाबतीची कार्यवाही करण्यात येईल.
  •  भजन मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता (टाळ, मृदंग , वीणा. इ) अनुदान देण्याची कारवाई करण्यात येईल.
  •  आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षीचा सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
  • पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्रिंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थांना, शेगाव तारकेश्वर, भगवानगड, अगस्त ऋषी, संत सावता माळी समाज मंदिर, इतर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल
  •  चंद्रभागा, इंद्रायणी ,गोदावरी व इतर नद्याचे प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल.
  •  परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल.
  •  संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर, ता . जि उस्मानाबाद येथे  15000 स्केयर पोटाचा संभामंडपायसाठी

निधी मंजूर करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल.

  •  श्री संत मुक्ताबाई संस्था मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधी स्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कारवाई करण्यात येईल.
  •  श्रीक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  •  श्री क्षेत्र पंढरपूर येथे  म्हसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागे वरती पदाचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  •  सर्व पालखी सोहळ्याचे मार्ग व्यवस्थित करून प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था  करणाऱ्या करिता कायमस्वरूपी निधी मंजूर करण्यात येईल.
  •  आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणारे वारकरी/भाविक तसेच दिंडीच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कारवाई करण्यात येईल.
  •  महिला वारकऱ्यासाठी स्वातंत्र्य निवास व्यवस्था, प्रधान गृहे,  वस्त्रांतर व इतर अनुषंगीक सोय सुविधा पुरविण्याबाबतीची कारवाई करण्यात येईल
  • सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www. Maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला .

गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

Leave a comment