swadhar yojana: स्वाधार योजना
swadhar yojana: स्वाधार योजना या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती जमाती नमोबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी,12 वी तसेच व्यवसायिक व विगरव्यवसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो त्यासाठी त्यांना 65000/- रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
हे वाचा : सारथी शिष्यवृत्ती योजना
हे वाचा : महाज्योती शिष्यवृत्ती योजना
राज्यातील विद्यार्थ्यांना 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये चांगले गुण मिळवल्यानंतर पुढे शिकण्यासाठी खूप उत्सुक असतात. पण काही ठिकाणी दहावी झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची सोय नसते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुढे चालून दुसऱ्या गावी जावे लागते. तसेच दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यवसाय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घरापासून लांब, शहरात जावे लागते.
शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या विद्यार्थ्यांना शहरांमध्येच राहावे लागते घरापासून लांब शहरांमध्येच राहावे लागते. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वस्तीगृहे यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात राहण्याची सोय उपलब्ध नाही . त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी जास्त पैसे देऊन जावे लागते परंतु राज्यातील अशी बरीचशे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दुसरीकडे राहण्यासाठी जास्त खर्च येतो आणि एवढा खर्च करण्याची त्या कुटुंबाची परिस्थिती नसते पण या सर्व गोष्टीचा परिणाम त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होतो. आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्व गोष्टीचा राज्य सरकारने विचार करून स्वाधार योजनेची सुरुवात केलेली आहे.
या योजनेअंतर्गत 11 वी,12 वी असच व्यवसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाहन भत्ता उपलब्ध करून देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत 65000/- रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून राज्य सरकारने या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा व विद्यार्थ्यांना स्वतःचा उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम दिली जाणार आहे ही लाभाची रक्कम अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी/12वी/पदवी/पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. आणि या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल.
योजनेचे नाव | swadhar yojana: स्वाधार योजना |
विभाग | समाज कल्याण विभाग |
लाभ | शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी |
उद्देश | विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन / ऑफलाइन |
swadhar yojana: स्वाधार योजना ची माहिती
- अपूर्ण भरलेल्या अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- 60 टक्के पेक्षा कमी गुण असलेला अर्ज घेण्यात येणार नाही.
- अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मर्यादा 50% असेल.
- हा लाभ फक्त अनुसूचित जाती न बौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घेण्यात येईल.
- निवड यादी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया मार्फत प्रसिद्ध केली जाईल निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.
- या योजनेची निवड ही विद्यार्थ्यांच्या गुणोत्तरानुसार करण्यात येईल.
swadhar yojana: स्वाधार योजना उद्दिष्टे
- या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, नव बौद्ध वर्गातील 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यवसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ,निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी एक नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- समाजातील मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा प्रसार करणे.
- या योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून लांब दुसऱ्या शहरांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शिक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
हे वाचा: पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना
स्वाधार योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वाधार योजना खूप फायद्याची ठरणार आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईल आणि त्यांचा सर्वांगीण विकास करू शकतील.
- स्वाधार योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.
स्वाधार योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
या योजनेअंतर्ग अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर (इयत्ता 11वी, पदवी, पदविका,) शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्च खालील प्रमाणे नमूद केलेला आहे.
| मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
| महसूल विभागीय शहर व क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
| उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
|
भोजन भत्ता (वार्षिक) | 32000/- रुपये | 28000/- रुपये | 25000/- रुपये |
निवास भत्ता (वार्षिक) | 20000/- रुपये | 15000/- रुपये | 12000/- रुपये |
निर्वाह भत्ता (वार्षिक) | 8000/- रुपये | 8000/- रुपये | 6000/-रुपये |
एकूण (वार्षिक) | 60000/- रुपये | 51000/- रुपये | 43000/- रुपये |
- वरील रकमे व्यतिरिक्त वेदकीय व अभियांत्रिकी शाखेतील /विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5000/- रुपये
- अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष 2000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.
स्वाधार योजनेचे लाभार्थी
- या योजनेचे लाभार्थी अनुसूचित जाती जमाती, नव बौद्ध वर्गातील पण घरापासून दूर शहरात इयत्ता 11 वी ,12 वी , व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.
स्वाधार योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत गावापासून दुसऱ्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11वी , इयत्ता12वी, व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक विषयाचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नव बौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निवारण भत्ता या योजनेच्या माध्यमातून दिला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, नव बौद्ध वर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी स्वाधार योजनेच्या माध्यमातून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकते.
- स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तके आणि अभ्यास साहित्य साठी 5000/- रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
स्वाधार योजना पात्रता
- या योजनेसाठी पात्रता अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील असायला हवा.
- या योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे.
स्वाधार योजना अटी व नियम
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी, इयत्ता 12वी , पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त गुण असावे.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
- या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
- स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50 टक्के इतकी राहिली.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा आपल्या घरापासून दुसऱ्या शहरांमध्ये शिक्षण घेत असणारा असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा स्वतःच्या गावांमध्ये शिक्षण घेत असल्यास योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- केंद्र किंवा राज्य चष्माघरे शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थी हा उच्च शिक्षण घेणार असावा.
- लाभार्थी विद्यार्थ्यांनी मध्येच स्वतःचे शिक्षण सोडून दिल्यास विद्यार्थ्याला या बाहेर काढली जाईल.
- या योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंत देण्यात येईल. जास्तीत जास्त शैक्षणिक कालावधी हा 7 वर्षापर्यंत घेता येईल.
- या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. नाहीतर या योजनेसाठी तो विद्यार्थी अपात्रता राहील
- लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी सलंग्र असावे.
स्वाधार योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मागील वर्षातील गुणपत्रिका
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रमाणपत्र
- बँक खाते आणि बँक खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेत दाखला
- शपथपत्र
- विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
- महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- शेवटच्या शिकलेल्या वर्गाची टीसी
- मेस ,भोजनालय खानावळ यांची बिलाची पावती.
- मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
- भाडे करारनामा
स्वाधार योजना अर्ज करण्याची पद्धत
या योजनेचा अर्ज हा विद्यार्थ्यांना ऑफलाइन/ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने करण्यात येईल.
ऑफलाईन
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याला सर्वप्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
- कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून योग्य ती कागदपत्रे जोडून घ्यावी आणि तो अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही स्वाधार योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकाल.
ऑनलाईन
- सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृति वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेजवर स्वतःचा Username Email आणि password टाकून नवीन करावे लागेल. (Username आणि password नसल्यास स्वतःची नवीन नोंदणी करावी लागेल)
- विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
स्वाधार योजना अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती भरल्यास.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत न जोडल्यास.
- अर्जदार विद्यार्थी पात्रता आणि अटी यांची पूर्तता करत नसल्यास.
- खोटी कागदपत्रे जोडून अर्ज केल्यास
- अंतिम तारखेच्या आत न भरल्यास
- योजना बंद झाल्यास किंवा निधी संपल्यास
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला swadhar yojana: स्वाधार योजना या योजने विषयी सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला कोणाला किंवा तुमच्या परिसरामध्ये अनुसूचित जाती नव बौद्ध किंवा आर्थिक परिस्थिती गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती नक्कीच कळवा जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल.
तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुप, ई-मेल आयडीवर संपर्क साधा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
1 thought on “swadhar yojana: स्वाधार योजनाअर्ज प्रकिया”