bandhkam kamgar कुटुंबीयांना कौशल्यवृद्धीचा लाभ
नमस्कार आज आपण या लेखामध्ये bandhkam kamgar कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कौशल्यवृद्धीचा लाभ याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची उत्पादक क्षमता व रोजगार क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेअंतर्गत कामगारांना एक नवीन रोजगार क्षमता वाढविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कामगारांना एकूण सहा विषयाची प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सहा विषय पैकी कोणतेही एका विषयाचे प्रशिक्षण घेऊन बांधकाम कामगार सुद्धा चांगली प्रगती करू शकतात.
bandhkam kamgar कौशल्यवृद्धी योजना अंतर्गत प्रशिक्षणाचे विषयी
कौशल्यवृद्धी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे विषय खालील प्रमाणे
- मेसेनरी
- बार वेल्डिंग
- प्लम्बिंग
- पेंटींग
- स्कॅफोल्डिंग
- शटरिंग कारपेटिंग
bandhkam kamgar कौशल्यवृद्धी योजनेचा फायदा
bandhkam kamgar कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना खूप सारे फायदे होणार आहेत.
कामगारांना होणारा फायदा
- कौशल्य वृद्धी प्रशिक्षणामुळे कामगारांना चांगली नोकरी मिळेल व त्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
- प्रशिक्षणामुळे कामगार अधिक कार्यक्षम बनू शकतील आणि तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
- कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे कामगारांमध्ये वृद्धीची वाढ झाल्यास त्यांना नवीन आणि चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
- चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर कामगारांना कौशल्याच्या जोरावर दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळून उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करून लाभार्थी कामगार आपल्या राज्यामध्ये एखादा नवीन उद्योग सुरू करू शकतात . राज्याचा औद्योगिक विकास होण्यास मदत मिळेल.
कुटुंबाला होणारा फायदा
- कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेणाऱ्या पालकांची मुले चांगल्या नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध असतात.
- चांगलं नोकरीमुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि विमा योजनांमध्ये प्रवेश मिळू शकतो
- चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण प्राप्त करून मुलांना दुसऱ्या ठिकाणी चांगली नोकरी मिळेल. आणि कामगारांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल व परिणाम कुटुंबाची परिस्थिती सुधारेल.
- कौशल्याच्या जोरावर कामगारांना एक चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल आणि सामाजिक आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- कौशल्य विकासा मुळे कुटुंबाला दारिद्र्यातून बाहेर पडण्यास मदत होईल.
bandhkam kamgar कौशल्यवृद्धी योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा खर्च
कामगारांना कौशल्यववृद्धी योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा खर्च प्रति तास 27/-रुपये म्हणजे एकूण 120 तासाचे 3,300/- रुपये प्रति प्रशिक्षणार्थी व पगार नुकसान भरपाई म्हणून 35/- रुपये प्रति तास म्हणजे एकूण 120 तासाचे 4,200/- रुपये कामगारांना दिले जातील.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कौशल्यवृद्धीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्जदार कामगारांनी मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असायला हवे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षे असावे.
bandhkam kamgar कौशल्यवृद्धीचा लाभ घेण्यासाठी अटी व नियम
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील असेल तर त्या कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे नोंदणी जीवित असलेले बांधकाम कामगार पात्र असतील.
- अर्जदार व्यक्तीने बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे.
- 200 पेक्षा जास्त कामगार असलेल्या साईटवर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 60 पर्यंत असणे आवश्यक आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कौशल्यवृद्धीचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- कायमचा पत्ता पुरावा
- 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- काम चालू असलेल्या बांधकामाचा पत्ता
- मोबाईल नंबर
- नोंदणी अर्ज
- बँक पासबुक
- 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
- जन्माचा दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला
- महानगर पालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
अर्ज करण्याची पद्धत
- कौशल्यवृद्धीचा लाभ घेण्यासाठी कामगारांना खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल. अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- तो अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक ती लागणारी सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा पद्धतीने तुम्ही कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.