Anganwadi Paryavekshak Bharti 2024 महिला व बाल विकास विभाग अंतर्गत राज्यात मुख्य सेविका गट क संवर्गातील सरळ सेवा पोटातील एकूण 102 पदासाठी भरती निघालेली आहे. यासाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलाच अर्ज करू शकतात. या महिलांनी अर्ज करण्याबाबत ची माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबद्दल कोण पात्र असणार अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार त्यासोबतच परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाच्या 102 जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये पदवीधर महिला ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतात. येणाऱ्या अर्जांमधून सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून या महिलांची निवड केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात व अर्जाची अंतिम तारीख याबद्दलची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
हे वाचा : समाजकल्याण विभागातील सरळसेवेन 219 पदांची भरती
Anganwadi Paryavekshak Bharti 2024 पात्रता
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महिलेचे शिक्षण पदवी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेची वय 21 वर्षे ते 38 वर्ष यादरम्यान असावे. (विविध आरक्षित घटकानुसर कमी जास्त ठेवण्यात आले आहे.)
- महिलेला मराठी भाषा ज्ञान अवगत असावे.
लागणारे कागदपत्रे.
- अर्ज मध्ये सादर केल्या नावाचा पुरावा दहावी किंवा बारावी शैक्षणिक प्रमाणपत्र.
- वयाचा पुरावा.
- शैक्षणिक माहितीचा पुरावा.
- आरक्षित जागेसाठी अर्ज करत असल्यास आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
- अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र.
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र.
- संगणक ज्ञान प्रमाणपत्र.
- पासपोर्ट फोटो.
- मोबाईल क्रमांक.
- ई-मेल आयडी.
अर्ज शुल्क.
Anganwadi Paryavekshak Bharti 2024 अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करताना परीक्षा शुल्क आकारले जाते हे परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 हजार रुपये आकारण्यात येते तर राखीव आरक्षित प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात येते.
अर्ज संबंधी महत्वाच्या तारखा.
ऑनलाइन अर्ज सादर करणे 14 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होतील तर ते 3 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील.
परीक्षा शुल्क भरण्यासाठी देखील 3 नोव्हेंबर 2024 हीच अंतिम तारीख असेल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा.
अर्ज करण्यासाठी शासनाने निर्गमित केलेले अधिकृत संकेतस्थळ http://www.icds.gov.in/ या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला आपली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल ज्यामध्ये वैयक्तिक माहिती रहिवासी माहिती शैक्षणिक माहिती त्यासोबतच आरक्षण माहिती याबद्दलची सर्व माहिती भरून आपला अर्ज सादर करू शकता अर्ज सादर केल्यानंतर आपण ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही नेट बँकिंग डेबिट कार्ड यूपीआय क्रेडिट कार्ड या सर्व माध्यमाचा वापर करू शकता अर्ज करण्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.