cm fellowship : राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशासकीय कामाचा अनुभव मिळावा. तसेच तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनाला मिळावा. आणि तरुणांच्या या कलागुणातून आणि कौशल्यातून प्रशासनाला मदत व्हावी व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये गती निर्माण व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आलेला आहे. या फेलोशिप कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यामध्ये 60 फेलोची निवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्य सरकारने या मुख्यमंत्री फेलोशिप निवडी बाबतचे नियम अटी व पात्रता स्पष्ट करणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. निर्णयाच्या माध्यमातून फिल्मची निवड करताना कोणत्या बाबी तपासल्या जातील कोण पात्र असेल कोणाची निवड केली जाईल तसेच यांना मानधन किती दिले जाईल याची सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
राज्य शासनाच्या या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत राज्यांमध्ये 2025-26 अंतर्गत 60 फीलोंची निवड केली जाणार आहे. फिलोशीप साठी निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याप्रमाणे दर्जा नियुक्त केला जाईल. फिलोंच्या निवडीमध्ये एक तृतीयांश महिलांचा समावेश असेल. जर एक तृतीयांश महिला उपलब्ध झाल्या नाही तर त्या ठिकाणी पुरुषांची निवड केली जाईल.
मुख्यमंत्री फेलोशिप कोण असणार पात्र
- फीलोशिप साठी अर्ज करणारा नागरिक हा भारतीय असणे आवश्यक आहे.
- फीलोशिप साठी अर्ज करणारा नागरी किमान 60 टक्के गुणासह पदवीधर असणे आवश्यक आहे.
- फिलोशीप साठी अर्ज करण्यासाठी किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटरशिप अप्रेंटिसशिप आर्टिकल शिप एक वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. पूर्णवेळ स्वयंरोजगार उद्योजकतेचा अनुभवही या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल त्या पद्धतीचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
- अर्जदाराला मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. अर्जदाराला हिंदी भाषेचे देखील चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
- संगणक चालवता येणे त्यासोबतच इंटरनेटचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय सादर करायच्या अंतिम तारखेपर्यंत 21 ते 26 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
cm fellowship अर्ज प्रक्रिया
फिरोशिप साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराला https://mahades.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला 500 रुपयाची शुल्क देखील आकारले जाणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिप अर्ज संबंधी माहिती आणि परीक्षेची सविस्तर माहिती https://mahades.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
निवड प्रक्रिया
फेलोशिप साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवारांना परीक्षा शुल्क देखील भरावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा पूर्ण करावी लागेल.
वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा मधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी नियुक्त केले जाईल. या निवड झालेल्या 210 उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने निबंध सादर करावा लागणार आहे. वस्तुनिष्ठ परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांची मुंबई येथे मुलाखत घेतली जाणार आहे.
या 210 उमेदवारांपैकी साठ उमेदवारांची निवड केली जाईल. निवड करण्यात आलेल्या फेलो पैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणात काम पाहतील. फिलोची निवड झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कौशल्याचा वापर करून व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, शासकीय कामकाज गतिमान कसे करता येतील याची संधि प्राप्त होणार आहे.
निवड कालावधी
राज्य सरकारने सुरू केलेला हा फिलोशीप कार्यक्रम बारा महिन्याच्या कालावधीसाठी आहे. एकदा निवड झालेल्या फिलोशीप उमेदवारांना पुढील 12 महिन्यापर्यंत या पदावर राहता येईल. त्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा कालावधी वाढ दिला जाणार नाही. 12 महिने पूर्ण झाल्यानंतर आपोआपच फिलोंची नियुक्ती संपुष्टात येईल.
मानधन : अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याप्रमाणे अधिकार देण्यात येतील. या उमेदवारांचा दर्जादेखील गट अ च्या अधिकाऱ्याप्रमाणेच असेल. निवड झालेल्या उमेदवारांना शासनाकडून प्रति महिना 56,100 रुपये मानधन म्हणून वितरित केले जातील. व अतिरिक्त प्रवास खर्च म्हणून 5,400 रुपये वितरित केले जातील. असे मिळून एकूण अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 61,500 रुपये प्रति महिना या प्रमाणात शिष्यवृत्ती वितरित केली जाईल.
मुख्यमंत्री फेलोशिप शासन निर्णय 👇🏻👇🏻👇🏻
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती.