cm filled ladki bahin application मुख्यमंत्री यांनी स्वतः भरला लाडकी बहीण योजनेचा अर्ज
मुख्यमंत्री यांनी स्वतः भरला लाडकी बहीण योजनेचा अर्ज cm filled ladki bahin application राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सर्वत्र अर्ज सुरू आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना प्रती महिना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
काय आहे प्रकार मुख्यमंत्र्यांनी स्वतः भरला अर्ज.
दिनांक 2 ऑगस्ट रोजी (छत्रपती सांभाजीनगर) येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सांभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख महिलांचे अर्ज मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सिल्लोड (छत्रपती सांभाजीनगर)येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठीचा दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा अर्ज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला, त्या अर्जावर तिची सही घेऊन तो जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपुर्द केला.
एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन देखील दिले
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय आहे, त्यादृष्टीने विविध योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची घोषणा देखील या वेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. ही योजना कायमस्वरूपी राहणार या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले. cm filled ladki bahin application
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.