माझी लाडकी बहीण योजना खात्यात येणार 1 रुपया
खात्यात येणार 1 रुपया नमस्कार मराठी तंत्रज्ञान माहिती मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागच्या एक महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. माझी लाडकी बहीण या योजनेने घरातल्या प्रत्येक माणसाला इकडे तिकडे फिरायला भाग पाडले. इकडे तिकडे फिरून सर्व कागदपत्रे गोळा करून फॉर्म भरून पण या योजनेच्या अजूनही वेगवेगळ्या अफवा आहेत . आता सध्या अशी अफवा पसरण्यात आली आहे कीया योजनेचा मराठी मधून अर्ज करण्यात आलेला असेल तर हा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. अशी अफवा सगळीकडे पसरत आहे. यामुळे ज्यांनी मराठी मध्ये अर्ज भरलेला आहे त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडलेले आहेत.
पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात येणार 1 रुपया
ज्यांच्या मनामध्ये असे प्रश्न पडलेले आहेत त्यांना काही घाबरण्याची गरज नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की पात्र महिलेचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. असे माननीय श्री मती आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेले आहे.
श्रीमती आदिती तटकरे मॅडम या म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे. यामुळे मराठीमध्ये भरलेला अर्ज स्वीकारला जाणार आहे.
यामुळे मराठीमध्ये भरलेला अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्यासाठी कोणतेही महिला अर्जदारांनी बळी पडू नये, अशा पसरलेल्या अफावा मुळे ज्या व्यक्तीने मराठी मध्ये अर्ज भरलेला आहे त्या व्यक्तीने तो अर्ज चुकलाय असे समजून डबल या योजनेचा अर्ज भरू नये. श्रीमती आदिती तटकरे यांनी असे सांगितले.
खात्यात येणार 1 रुपया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिला ज्या आहेत त्या महिलांच्या बँक खात्यात येणार 1 रुपया जमा करण्यात येणार आहे. हा एक रुपया जो महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तो सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे महिला व बालविकास श्रीमती आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे.
श्रीमती आदिती तटकरे म्हणाल्या की या योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनच्या वेळेस गेल्या महिन्यातले आणि या महिन्यातले असे मिळून तीन हजार रुपये पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत हे पैसे डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते.
अर्ज महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत याची संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पातळणी करण्यास येत आहे .यामुळे काही ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येणार आहे
खात्यात येणार 1 रुपया ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणतेही अफवाला बळी पडू नका असे महिला व बालविकास आदिती तटकरे यांनी सांगितले.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
2 thoughts on “माझी लाडकी बहीण योजना खात्यात येणार 1 रुपया”