शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी सीबील स्कोअर ची गरज नाही.

शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी सीबील स्कोअर ची गरज नाही.

जवळ जवळ जून संपत आलेला आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. शेती साठी शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले जाते. हे कर्ज अल्प व्याजदराणे वितरित केले जाते.  परंतु मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.

शेती पिकासाठी पिक पेरणी पासून ते पिक कापणी पर्यंत येणारा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले जाते. हे पिक कर्ज शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृत बँकेमार्फत वितरित केले जाते. या बँकेच्या नियमात सीबील स्कोअर हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. बँक कर्ज वितरित करताना सर्वात प्रथम कर्जदारांचे सीबील स्कोअर तपसतात आणि अश्या च व्यक्तीला कर्ज देतात ज्यांचे सीबील स्कोअर चांगला असतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

पिक कर्ज

सीबील स्कोअर ची आवश्यकता नाही.

राज्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करताना सीबील स्कोअर मधून सूट देण्यात यावी अशी बऱ्याच शेतकऱ्यांची व शेतकरी हितचिंतक व्यक्तीची मागणी होती, सीबील स्कोअर मधून सुटका मिळाल्यास शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार मधील  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत बँकेला सूचना दिलेल्या आहेत , जर आपण सीबील स्कोअर मुळे कर्ज नाकारत असाल तर राज्य शासन एफआयआर दाखल करणार आहे. या मुळे आता शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करतांना बँक सीबील स्कोअर मुळे शेतकार्याचे पिक कर्ज अडवू शकणार नाही.

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

शेतकऱ्यांना काय होईल फायदा

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पिक कर्जथकीत राहिल्या मुळे किंवा अन्य कोणते कर्ज वेळेवर न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे सीबील स्कोअर कमी झालेले पाहायला मिळत आहे. जवळ जवळ राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या अडचणी चा सामना करावा लागत होता. या अटी मधून  शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेलें आहे. ज्या निर्णया च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणा आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना

पीक कर्ज योजना

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

सीबील रीपोर्ट माघाल तर गुन्हा (FIR) दाखल करू

सीबील रीपोर्ट माघाल तर गुन्हा (FIR) दाखल करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

बँके कडून नेहमी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतांना टाळाटाळ केली जाते. परंतु केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमी या बाबत नियम बदल करत असते . या बदललेल्या नियमामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळवणे सोपे होते, याच हेतूने राज्य सरकार ने सर्व राष्ट्रीयकृत बँकांना या सीबील नियमात शेतकऱ्यांना शिथिलता देण्याचे आदेश दिले आहेत.

जर बँकानी या नियमाचे  पालन नाही केले तर त्यांच्या वार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

काय आहे पिक कर्ज

शेतकऱ्यांना त्यांच्या पिक पेरणी करण्यापासून ते पिक कापणी पर्यन्त आवश्यक लागणार खर्च करण्याची शेतकऱ्याला जे कर्ज दिले जाते ते म्हणजे पिककर्ज.

हे पिककर्ज अगदी कमी व्याज दराने वितरित केले जाते. तसेच राज्य शासनाकडून पिक कर्जा वरील व्याज परतावा पण शेतकऱ्यांना वितरित केला जातो

पिक कर्जाबाबत  अर्ज ,कागदपत्रे ,पात्रता या बद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment