gharkul yojana Maharashtra केंद्र सरकारने देशामध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत देशातील नागरिकांना हक्काचं घर उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेचे अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपयांचे अनुदान वितरित केले जात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी कोण पात्र आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

आज आपण पीएम आवास योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रधानमंत्री आवास योजना काय आहे यामध्ये कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धतीने अर्थ सादर करता येतो का याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
योजनेची महिती gharkul yojana Maharashtra
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशामध्ये एक एप्रिल 2016 रोजी या योजनेची सुरुवात झाली. योजना विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबासाठी या कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर नाही त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत हक्काचे घर वितरित करते.
योजनेचा लाभ कसा घ्यावा
देशात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक पूर्ण करण्यात आलेला आहे. याच्याच धरतीवर देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्प्यात दोन सुरू करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना चे अंतर्गत शहरी भागातील नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. अद्याप पर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईन देण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.
घरकूल योजना 2025 पात्रता
घरकुल योजना च लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा खालील अटींची व नियमांचे पात्रता निकष पूर्ण करत असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा
- अर्जदाराकडे पक्के घर नसावे.
- अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
घरकूल योजना अवश्यक कागदपत्रे
घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला घरकुल योजनेचा लाभ दिला जातो.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँक खाते
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसील कार्यालयाने जारी केलेले)
- जॉब कार्ड (रोजगार हमी योजनेतून मिळालेले)
- मोबाईल क्रमांक
- घरातील सर्व सदस्यांची आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
एवढी कागदपत्रे अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
अर्ज प्रक्रिया
शहरी भागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येतो. शहरी भागातील नागरिकांनी अर्ज कसा करायचा याची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सदर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपला अर्ज सादर करू शकता. विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून आपण आपला अर्ज आपल्या ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करू शकता. ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर केल्यानंतर ग्रामपंचायत कडून त्या अर्जाची पूर्ण तपासणी करून अर्ज ऑनलाईन केला जाईल. अर्जाची पूर्ण माहिती संबंधित विभागाकडून तपासली जाईल. व अर्जांमधील माहिती बरोबर असल्यास अर्जदाराला घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.