HSRP Number Plate Online Registration : महाराष्ट्र परिवहन विभागाने अलीकडे एक अधिसूचना जाहीर केली आहे . ज्यामध्ये एप्रिल 2019 च्या अगोदर विकल्या गेलेल्या आणि तरीही वापरत असणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (High Security Registration Plate- HSRP) असणे गरजेचे आहे. नागरिकांना ही कार्यवाही मार्च 2025 च्या अखेर पर्यंत पूर्ण करून घेणे आवश्यक असणार आहे.

राज्यं सरकार कडून 2019 पूर्वी नोंदणीकृत असणाऱ्या वाहनांना hsrp नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. आपले वाहन जर 2019 पूर्वी खरेदी केलेले असेल तर आपणास आपल्या वाहनांना hsrp नंबर प्लेट बसवणे गरजेचे आहे. hsrp नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहणधारकांना 30 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. जर 30 मार्च नंतर आपल्या वाहनाला hsrp नंबर प्लेट नसेल तर आपल्याला 10000 रुपये दंड अकरण्यात येणार आहे. पहिल्या वेळी hsrp नंबर प्लेट दंड हा 5000 आहे तर दुसऱ्या वेळी परत hsrp नंबर प्लेट उललब्ध नसल्यास आपल्याला 10000 रुपये दंड अकरण्यात येणार आहे.
HSRP नंबर प्लेट दंडपासून वाचण्यासाठी आपल्या वाहनाला 30 मार्च पूर्वी hsrp नंबर प्लेट बसवून घेणे आवश्यक आहे. hsrp नंबर प्लेट ही सर्व वाहणसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे.
जर तुम्हाला खात्री नसेल किंवा तुमच्या वाहनांसाठी ही रजिस्ट्रेशन प्लेट कशी ऑनलाइन (HSRP Number Plate Online Registration) पद्धतीने मिळवायची आहे याबद्दल काही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, तर आज आपण या लेखामध्ये स्टेप बाय स्टेप प्रक्रिया माहिती करून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे, ही वेबसाईट वापरत असताना तुम्हाला जरा दम धरावा लागेल. कारण- काही पाने लोड होण्यास वेळ लागू शकतो.HSRP Number Plate Online Registration
महत्त्वाची सूचना कृपया लक्षात ठेवा
कृपया लक्षात ठेवा की, जर तुमचे वाहन महाराष्ट्र (HSRP Number Plate Online Registration) राज्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असेल तरच तुम्ही HSRP साठी अर्ज करू शकता.
HSRP साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभागाच्या अधिकृत https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html वेबसाईटवर जावे लागेल.
- या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Apply high security registration plate online असा पर्याय दिसेल या पर्याय सोबत दिलेल्या विंडोमध्ये select office वर क्लिक करून तुमच्याशी संबंधित आरटीओ कार्यालय निवडा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- Submit चा प्रयत्न केल्यानंतर नवीन ओपन होईल. स्क्रीनवर तुम्हाला तुमचे आरटीओ कार्यालय ज्या झोन मध्ये असेल त्या झोनचा क्रमांक दिसेल. समजा जर तुम्ही.MH20 AURANGABAD असे आरटीओ कार्यालय निवडले असेल तर तुम्हाला स्क्रीनवर HSRP FOR Maharashtra Zone 2 असे दिसेल.
- HSRP FO Maharashtra Zone 2 च्या खाली तीन पर्याय तुम्हाला दिसले असतील. तुम्ही एचएसआरपी नंबर प्लेट साठी अर्ज करत असाल तर तिसरा पर्याय म्हणजेच Apply HSRP निवडा.
- APPLY HSRP वर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला चार पर्याय दिसतील. त्यातील पहिला पर्याय Order HSRP या पर्यायावर क्लिक करा. पर्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर दिसलेल्या विंडोज मध्ये तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, (शेवटचे पाच आकडे), इंजिन नंबर (शेवटचे पाच आकडे), आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका व Validate च्या पर्यावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो डीपी दिलेल्या विंडोज मध्ये प्रवेश करून तुम्ही दिलेली माहिती व्हॅलीडेट करा.
- ही सर्व माहिती नोंदवल्यानंतर वाहनधारकांना एच एच आर पी नंबर प्लेट बदलून घेण्यासाठी लोकशाहीची माहिती दिली जाईल. त्यानंतर अपॉइंटमेंट स्लॉट घ्यावा लगेच आणि माहितीची खातरजमा केल्यानंतर ऑनलाईन पैसे भरून तुम्हाला एचएसआरपी नंबर प्लेट बदलून दिली जाईल .
- ज्या दिवशी तुमचा अपॉइंटमेंट स्लॉट असेल त्या तारखेला तुम्हाला तुमचे वाहन घेऊन प्रत्यक्ष लोकेशनवर जावे लागेल .जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर तुम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने एचएसआरपी नंबर प्लेट पाठवली जाणार नाही .
- वाहनधारकांसाठी ऑनलाईन नोंदवलेली वाहनाची माहिती आणि प्रत्यक्ष वाहनाची माहिती यात तफावत आढळून आली तर एचएसआरपी नंबर प्लेट दिली जाणार नाही आणि त्यासाठी भरलेले शुल्कही परत दिले जाणार नाही त्यामुळे तुमच्या वाहनाची माहिती काळजीपूर्वक भरा .HSRP Number Plate Online Registration
HSRP म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही विशेष सुरक्षितता देणारी प्लेट आहे. या प्लेटवर एक विशेष क्रमांक आणि कोड असतो. सरकारने एप्रिल 2019 नंतर विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य केले आहे. यामुळे वाहन चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच रस्ता सुरक्षा वाढते.
HSRP बसवण्याची अंतिम मुदत 30 मार्च 2025 असल्यामुळे वेळेत अर्ज करून प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.HSRP Number Plate Online Registration.
HSRP Number Plate Online Registration