june to september nuksan bharpai : जून ते सेप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर.

june to september nuksan bharpai : शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पूर्णतः नुकसान होते. नुकसानीच्या प्रकारामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी,पुर, पिकावर पडणारे रोग अशा विविध अडचणीचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. यातच मागील हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर या कारणामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जून ते सप्टेंबर 2024 या कालावधी मध्ये नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात यावी याकरिता विभागीय आयुक्त यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाचा विचार करूनच राज्य शासनाने राज्यातील नुकसान बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा शासन निर्णय जाहीर ज्वारी केला आहे.

खरीप हंगामातील जून 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने शासन निर्णय शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना 29 कोटी 25 लाख 61 हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.

june to september nuksan bharpai

कोणाला मिळेल अनुदान june to september nuksan bharpai

june to september nuksan bharpai जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले होते. त्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून सादर करण्यात आले होते. या सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत राज्य शासनाने प्रस्तावात नावे असणारे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली आहे. प्रस्ताव अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नावे दाखल करण्यात आली आहेत अशा शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी अनुदानास पात्र

जून ते सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पूर या नैसर्गिक आपत्तीने पाली झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडून सादर करण्यात आले होते. याला मान्यता देऊन राज्य शासनाने खालील प्रमाणे विभागीय तरतुदीनुसार जिल्हा निहाय किती शेतकरी आणि किती रक्कम वितरित केली जाणार याची आकडेवारी दिलेली आहे.

अशी मिळते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई.

नाशिक विभाग

नाशिक विभाग अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांना 13 लाख 10 हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

पुणे विभाग

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील 1370 शेतकऱ्यांना 59 लाख 32 हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.

नागपूर विभाग

नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यातील 849 शेतकऱ्यांना 10 कोटी 98 लाख 76 हजार एवढी रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

अमरावती विभाग

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील 4841 शेतकऱ्यांना 4 कोटी 34 लाख 33 हजार एवढी रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभाग

छत्रपती संभाजी नगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील 08 हजार 632 शेतकऱ्यांना 13 कोटी 20 लाख एवढी रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.

शासन निर्णय पहा : येथे क्लिक करा.

बाधित शेतकऱ्यांची संख्या कमी का?

june to september nuksan bharpai जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयामध्ये राज्यातील 23 हजार 62 शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्याची तरतूद करण्यात आली. मग शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्यांची संख्या एवढी कमी कशी? राज्यातील बहुतांश भागांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले होते. june to september nuksan bharpai

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले होते. हे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करून राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामध्ये आणखी बरेच प्रस्ताव विभागीय आयुक्त कडून सादर केलेले आहेत. परंतु त्याला राज्य शासनाकडून अद्याप पर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पुढील काही काळात या प्रस्तावना देखील मंजुरी मिळेल आणि नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढेल. june to september nuksan bharpai

1 thought on “june to september nuksan bharpai : जून ते सेप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर.”

Leave a comment

Close Visit Batmya360