Kapus soyabean second list राज्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन भावांतर योजने अंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची शासनाकडून घोषणा करण्यात आली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये या प्रमाणात व जास्तीत जास्त तीन हेक्टर च्या मर्यादेत पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान वितरित केले जाणार आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते आता शासनाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीच्या आधारे नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मदत होणार आहे.
कापूस – सोयाबीन अनुदान कधी मिळणार
Kapus soyabean second list या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
ज्या शेतकऱ्यांची कापूस व सोयाबीन अनुदान यादी मध्ये नाव नाही या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. या शेतकऱ्यांची नावे आता दुसऱ्या यादीमध्ये येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये नाहीत. परंतु त्यांच्या सातबारेवर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद केलेली आहे. अशा शेतकऱ्यांची नावे आता अनुदान यादी मध्ये समाविष्ट केली जाणार आहे.
असे होणार नाव समाविष्ट Kapus soyabean second list
ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांची आपल्या सातबारेवर पिकाची नोंद झालेली आहे. महसूल विभागामार्फत म्हणजेच आपल्या गावच्या तलाठी साहेबांच्या मार्फत ही यादी कृषी विभागाला पाठवली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये आपल्या सातबारेवर कापूस व सोयाबीन या पिकाची नोंद केली आहे त्या शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाकडून कृषी विभागाला पाठवले जाणार आहे. यादी पाठवल्यानंतर पुढील प्रक्रिया कृषी विभागामार्फत राबवली जाणार आहे यामार्फत शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांची नावे का वगळण्यात आली होती ?
Kapus soyabean second list राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करून देखील त्या शेतकऱ्यांची नावे अनुदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती यामागे कारण काय हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली होती परंतु यादीत नाव आलं नाही. याबद्दल बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की ज्या गटातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली परंतु त्यांच्या फेरमध्ये काही बदल करण्यात आला किंवा गावातील खाते क्रमांक यामध्ये बदल करण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नव्हती. आता या नवीन निर्णयानुसार त्या शेतकऱ्यांना देखील या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
दुसऱ्या यादीत नाव समाविष्ट झालेले शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार
Kapus soyabean second list ज्यावेळी महसूल विभागाकडून म्हणजेच तलाठी यांच्याकडून ई पीक पाहणी केलेले शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाला दिली जाईल त्यावेळी कृषी विभागाकडून त्या शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर जोडण्यात येतील. नावे पोर्टलवर जोडल्यानंतर त्या शेतकऱ्यांची आधार सहमती पत्र भरून घेऊन त्यांची केवायसी पूर्ण केली जाईल. केवायसी पूर्ण केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना हा लाभ वितरित केला जाईल.
ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केलीच नाही त्यांना लाभ मिळणार का ?
Kapus soyabean second list ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई पिक पाहणी केलीच नाही अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार का ? याबद्दल विचारणा केली असता अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीच नाही अशा शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान दिले जाणार नाही. दुसऱ्या यादीमध्ये फक्त ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचीच नावे समाविष्ट होणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई पिक पाहणी केली नाही किंवा कापूस / सोयाबीन या पिकाची नोंद नाही अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ वितरित केला जाणार नाही किंवा त्यांची नावे सद्यस्थिती मध्ये तरी दुसऱ्या यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत.
2 thoughts on “Kapus soyabean second list या शेतकऱ्यांना देखील मिळणार कापूस सोयाबीन अनुदान”