ladaki bahin yojana: धक्कादायक लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

     2024-25 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना अमलात आणण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतीमहिना 1500 रुपये लाभ देण्यात येणार असून या योजनेमद्धे सहभाग नोंदवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

महिला सन्मान बचत योजना मराठी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ladaki bahin yojana

ladaki bahin yojana: धक्कादायक लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

ladaki bahin yojana: धक्कादायक लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

या योजनेमद्धे अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धती देण्यात आली आहे परंतु ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही अश्या महिलांनी आपला अर्ज आपल्या भागातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करण्यास शासनाने सांगितले आहे. हा ऑफलाइन अर्ज अंगणवाडी सेविका मार्फत ऑनलाइन केला जाणार आहे. 

अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे

            अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे 

अश्याच सोलापूर जिल्हयातील अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे ह्या अंगणवाडी केंद्रात आपल्या भागातील महिलांचे अर्ज ऑनलाइन करत होत्या. अर्ज ऑनलाइन करत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 

अंगणवाडी केंद्रात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. 

सुरेखा रमेश आतकरे ह्या महोळ तालुक्यातील देगाव येथे अंगणवाडी क्र 1 मध्ये कार्यरत होत्या. 

Leave a comment