Ladki bahin april installment : सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत नऊ हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. आता महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची अपेक्षा आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल (Ladki bahin April installment) महिन्याचा हप्ता देण्याबाबत शासनाकडून नवीन अपडेट समोर आली आहे.
८ मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त महिलांच्या खात्यावर राज्य शासनाकडून दोन महिन्याचे हप्ते जमा करण्यात आले. महिलांना मागील बाकी असणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता असे दोन्ही महिन्याचे हप्ते महिलांना मार्च महिन्यात जमा झाले आहेत.

एप्रिल महिन्याचा हप्ता किती मिळणार
अनेक ठिकाणी महिलांना एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये मिळणार अशा बातम्या समोर येत आहे. परंतु लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये देण्याबाबत शासनाने कोणतेही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे महिलांना एप्रिल महिन्यात देखील पंधराशे रुपये लाभ दिला जाईल. 2100 रुपये वितरणाबाबत शासनाची कोणतीही घोषणा किंवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांना 2100 रुपये एप्रिल महिन्यात मिळणार ही बातमी पूर्णतः खोटी आढळली आहे. एप्रिल महिन्यात महिलांना 1500 रुपये मिळणार हेच सत्य आहे.
लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना देण्याचे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. परंतु सध्या राज्याची आर्थिक स्थिती त्या योग्य नसल्याचे कारण अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार महिलांना सध्यातरी 2100 रुपये दिले जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. यामुळे महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा पंधराशे या प्रमाणातच वितरित केला जाणार आहे.Ladki bahin April installment
हे वाचा : पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी कशी करायची? 20 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी या स्टेप फॉलो करा
कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता
महिलांना एप्रिल महिन्याचा (Ladki bahin April installment) हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडून अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यात येत आहे. म्हणजेच महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळणार आहे. सरकारकडून प्रत्येक हप्ता वितरण करताना काही विशेष तारखांची तरतूद करून त्या तारखांना हा हप्ता वितरीत केला जातो. त्यानुसार या महिन्यामध्ये महिलांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हप्ता वितरित केला जाईल अशी प्राथमिक माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाईल. अक्षय तृतीयाचे मुहूर्त म्हणजे 30 एप्रिल. महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा तीस एप्रिल च्या आसपास जमा केला जाईल. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाईल.

सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना एक शासन निर्णय निर्गमित केला होता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत हप्ता वितरित केला जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु शासनाला प्रत्येक हप्ता वितरित करताना आर्थिक तरतूद करावी लागते. राज्याची आर्थिक स्थिती सध्या डगमगली असल्यामुळे महिलांना प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी विलंब होत आहे. ज्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती स्थिर होईल त्यावेळी महिलांना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत हा हप्ता जमा केला जाऊ शकतो.
शासन निर्णयामध्ये महिलांना हप्ता वितरित करण्याची तारीख जरी निश्चित केलेली असली तरी महिलांना या महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटीच मिळणार आहे. कारण राज्य शासन महिलांना हप्ता जमा करण्यासाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधणार आहे. Ladki bahin April installment
कोणत्या महिलांना मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांपैकी 50 लाखाहून अधिक महिला या योजनेतून सरकारकडून बाद करण्यात आलेले आहेत. या महिलांचे अर्ज शासनाने रद्द केले आहेत त्या महिलांना हा हप्ता वितरित केला जाणार नाही. याआधी सरकारकडून चार चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेतून लाभ देण्यापासून वंचित ठेवले आहे. त्यानंतर सरकारने इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना देखील या योजनेमध्ये लाभ देण्यापासून वंचित ठेवले आहे. सरकार आता आयकर विभागाची मदत घेऊन अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेमधून वगळणार आहे.
एप्रिल महिन्याचा (Ladki bahin April installment) हप्ता शासनाच्या सर्व नियम व अटींमध् पात्र असणाऱ्या महिलांनाच वितरित केला जाईल. तपासणी दरम्यान ज्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार नाही. Ladki bahin April installment
1 thought on “Ladki bahin April installment: लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता.”