Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा; एकत्रित 3000 रुपये मिळणार ?

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या लाभार्थ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बळ कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, मे महिना संपूनही अनेक लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे, मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने चिंतेचे वातावरण

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. नियमितपणे मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीने महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मदत होते. मात्र, मे महिन्याचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे अनिश्चितता वाढली आहे.Ladki Bahin Yojana

हे वाचा : बचत गटांना आता मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

मे आणि जून महिन्यांचे 3000 रुपये एकत्रितपणे जमा होणार

दरम्यान, आता अशी चर्चा सुरू झाली आहे की मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, 10 जून रोजी वटपौर्णिमा आहे आणि हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे, या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या केवळ शक्यता आहेत आणि याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मे महिन्याचा रखडलेला हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे.Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिनीन 2100 रुपये कधी मिळणार ?

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा त्यांची सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये केली जाईल. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता या आश्वासनाचे काय होणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले होते की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी मिळणार, याची प्रतीक्षा राज्यातील महिला करत आहेत.Ladki Bahin Yojana

या महिलचा लाभ बंद

या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अनियमितता देखील समोर आल्या आहेत. अर्ज छाननीच्या वेळी असे आढळून आले की काही सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे, आता अशा अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. यासोबतच, ज्या महिला योजनेच्या इतर अटी व शर्तींची पूर्तता करत नाहीत, अशा महिलांची नावे देखील काही दिवसांपूर्वी वगळण्यात आली होती. त्यामुळे योजनेच्या नियमांनुसार केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मे आणि जून हप्त्याचे पैसे मिळणार

एकंदरीत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर, निवडणुकीदरम्यान दिलेले 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची आश्वासनाचे काय होते, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने याबाबत लवकरच स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा लाभार्थी महिला व्यक्त करत आहेत.Ladki Bahin Yojana

Leave a comment