लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात ladki bahin yojana amount credit
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात ladki bahin yojana amount credit
महाराष्ट्र राज्याला वेड लावणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना गेल्या दोन महिन्यापासून या योजनेमध्ये वारंवार होत असणारे बदल. या बदलामुळे महिलांमध्ये खूप सारी कन्फ्युजन निर्माण झालेले होते.
तसेच अर्ज प्रक्रियेसाठी वारंवार होणारे बदल म्हणजे सुरुवातीला ॲप वर अर्ज केला जात होता. त्यानंतर परत सरकारने बदल केला आणि पोर्टल वर अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आणि आता तर अर्ज भरल्यानंतर ओटीपी येत नाही.
त्यामुळे महिलांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले होते की आम्ही फॉर्म भरला आहे पण झाला असेल का नाही जर झाला असेल तर पैसे पडतील का? असे प्रश्न महिलांच्या मनात पडलेले होते.
गेल्या मागच्या दोन आठवड्यामध्ये तर अशी अफवा पसरली होती की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. अशा या योजनेबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे . ज्या महिला या योजनेसाठी पात्रता असतील त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यामधील अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचे म्हणजे गेल्या महिन्यातले आणि या महिन्यातले पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधन येण्या अगोदरच गिफ्ट दिले आहे.
रक्षाबंधन साठी अजून चार ते पाच दिवस बाकी आहेत त्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी जमा करण्यात येणार आहेत. असे सांगितले होते पण मात्र आज पासूनच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
17 ऑगस्ट पर्यंत पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3000 हजार रुपये जमा करण्यात येतील. सध्या तर ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याचे स्क्रीन शॉट व्हायरल होत आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात ladki bahin yojana amount credit
महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून अजून पण या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट आहे. आत्तापर्यंत जवळपास एक कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून, त्यांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. 31 जुलै पर्यंत अर्ज करणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये 17 ऑगस्ट पर्यंत जमा करण्यात येणार आहे.
31 जुलै नंतर अर्ज करणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यावर लवकरात लवकर लाभाची रक्कम जमा करण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की आम्ही शब्द दिलाय 17 तारखेला आमच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट चे दोन्ही मिळून तीन हजार रुपये दिले जातील. 17 तारखेपर्यंत दोन्ही महिन्याचे पैसे आम्ही देणार आहोत. आता आम्ही सुरू करतोय, चेक करतोय पैसे जाताहेत की नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.