ladki bahin yojana status detail
ladki bahin yojana status detail राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपले अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जाची आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस कसे पहायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कोणत्या स्थितीचा काय अर्थ
ladki bahin yojana status detail आपल्या अर्जाची स्थिति दाखवत आहे नेमकी आपल्याला दाखवत असलेल्या अर्जाची स्थिति याचा अर्थ काय होतो हे आज समजून घेणार आहोत.
- SMS verification done
आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज भरलेला आहे आणि आपला अर्ज भरताना दिलेला मोबाइल नंबर चे आपण व्हेरिफीकेशन पूर्ण केले आहे.
- In pending to Submitted
आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज सादर केला आहे, परंतु आपला अर्ज अजून तपासणी साठी पुढे पाठवण्यात आला नाही.
- Approved
आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये सादर केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे . आता आपणास काहीही करणे आवश्यक नाही सरकार कडून आपल्याला लाभ देण्यात येणार आहे.
- In Review
आपण सादर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तपासणी साठी पुढे पाठवण्यात आला आहे. लवकरच आपल्या अर्जावर तपासणी कार्य केले जाईल व आपणास आपले स्टेटस दिसून येईल.
- Disapproved
आपण केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज न मंजूर करण्यात आला आहे. त्या सोबत कोणत्या घटकामुळे disapproved करण्यात आला याचे कारण देखील देण्यात येईल. व आपणास अर्जात बदल करून आपला अर्ज परत तपासणी साठी पाठवावा लागेल.
- Rejected
आपल्या अर्जात जर असा पर्याय दिसत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण केलेला अर्ज नाकारण्यात आला आहे . त्याचे कारण देखील आपल्या अर्जात देण्यात येणार आहे. जर आपण त्या दिलेल्या घटकाची पूर्तता करत असाल तर आपण परत नव्याने अर्ज करू शकता.
3 thoughts on “in pending to submitted ladki bahin yojana माझी लाडकी बहीण योजना आपले स्टेटस काय सांगते पहा.”