मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक २८ जून २०२४ रोजी महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजना आणल्याचे दिसून आले. त्यात महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना १५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
कोणामार्फत राबवली जाते | महाराष्ट्र शासनाद्वारे |
विभाग | महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
उद्देश | महिलांना पुरेशा सोई सुविधा उपलब्ध करणे |
लाभ | १५०० रुपये प्रती महिना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील २१ ते ६० वयोगटातील महिला. |
अधिकृत संकेतस्थळ | अजून उपलब्ध नाही |
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील वय वर्ष २१ ते ६० मधील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमद्धे डीबीटी च्या सहाय्याने निधी वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये पात्रता, आवश्यक कागदपत्रे ,नियम अटी , आणि अर्ज करण्याची पद्धत या बद्दल सर्व माहिती आपणास देण्यात येणार आहे. तरी आपण हा लेख शेवट पर्यत वाचवा ही विनंती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उद्देश
- राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मिती व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे.
- महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे
- महिलांच्या संशक्तीकरनास चालना देणे.
- महिलांवर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण या मध्ये सुधारणा करणे.
योजनेचे स्वरूप
राज्यातील प्रत्येक पात्र महिलेला प्रती महिना १५०० रुपये महिना त्या महिलेच्या आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केला जाईल. जर एकाद्या महिलेला केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये पेक्षा कमी रक्कम येत असेल तर उर्वरित रक्कम या योजनेच्या माध्यमातून महिलच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
योजनेची पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोन असणार पात्र
- महिला महाराष्ट राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित , विधवा , घटस्फोटीत व निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- ज्या महिलांचे वय २१ ते ६० मध्ये आहे अश्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांचे राष्ट्रीय कृत बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलांचे / कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार च्या आत असणे आवश्यक आहे .
योजनेत अपात्र.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोन असणार अपात्र
- ज्या महिलांचे / कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये पेक्षा जास्त असणाऱ्या महिला.
- ज्या महिला / कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय /कंत्राटी कर्मचारी व निवृती वेतन धारक आहेत त्या महिला या योजनेत अपात्र असतील.
- ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये पेक्षा जास्त रक्कम मिळते.
- ज्या महिलांच्या कुटुंबात विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबात संयुक्त ५ एकर पेक्षा जास्त जमीन आहे.
- ज्या महिलांच्या नावावर किंवा कुटुंबात चार चाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळून)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावा.
- २.५० लाख रुपये च्या आतील उत्पन्न दाखला (तहसीलदार यांनी दिलेला)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशन कार्ड
- हमीपत्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जीआर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण पणे ऑनलाइन आहे.
- ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येणार नाही. त्यांनी आपल्या अंगणवाडी केंद्र / ग्रामपंचायत कार्यालय / सेतु सुविधा केंद्र येथे जाऊन आपला अर्ज सादर करावा.
- अर्ज करताना अर्ज करण्याच्या ठिकाणी अर्जदार महिलेने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- आपला अर्ज सादर केल्या नंतर आपणास पोहोच पावती देण्यात येईल.
अर्ज कधी सुरू होणार
अ. क्र
उपक्रम
दिनांक
१
अर्ज प्राप्त करण्यास सुरवात
१ जुलै २०२४
२
अर्ज करण्याची शेवट तारीख
१५ जुलै २०२४
३
तात्पुरती यादी प्रकाशन
१६ जुलै २०२४
४
तात्पुरत्या यादी वरील हरकती सादर करणे
१६ जुलै ते २० जुलै २०२४
५
तक्रात हरकती निराकरण करणे
२१ जुलै ते ३० जुलै २०२४
६
अंतिम यादी प्रकाशन दिनांक
१ ऑगस्ट २०२४
७
लाभार्थी बँक (EKYC) करणे
१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२४
८
लाभार्थी निधी हस्तांतरण
१४ ऑगस्ट २०२४
९
त्या नंतर प्रत्येक महिन्याचा देय दिनांक
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेच्या आत
निष्कर्ष
मध्यप्रदेश राज्य सरकार ने गेल्या वर्षी लाडली बहणा योजना सरू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मागील ४ महिन्यासापरून या योजनेवर सविस्तर अभ्यास करून राज्य सरकार कडून या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रती महीना १५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेत अर्ज करण्यासाठी १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेचा पहिल्या हप्त्याची रक्कम १४ ऑगस्ट २०२४ रोजी वितरित करण्यात येणार आहे.
Home work
Home’ work
Good
Good & very useful for women