mukhyamantri sahayata nidhi : मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा मिळवा लाभ.

mukhyamantri sahayata nidhi : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील गरजू व होतकरू असणाऱ्या नागरिकांना. रुग्णालयातील खर्चामध्ये आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू केला. या मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली आहे. आता मुख्यमंत्री सहायता लाभ कसा मिळतो यासाठी कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा याची अनेक नागरिकांना माहिती नाही. आज आपण याच मुख्यमंत्री सहायता निधी बाबत पात्रता अर्ज प्रक्रिया याची माहिती घेणार आहोत.

राज्यातील गरीब रुग्णांसाठी सुरू केलेला मुख्यमंत्री सहायता कक्ष नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे. आजच्या युगात अनेक वैद्यकीय उपचार घेताना नागरिकांना आर्थिक परिस्थितीशी झुंजावे लागते. याच अनुषंगाने राज्य शासनाने राज्यांमध्ये गरीब नागरिकांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू केला.

सुरुवातीला या मुख्यमंत्री सहायता आर्थिक मदतीसाठी मंत्रालयात जाऊन अर्ज करणे आवश्यक होते. परंतु यामध्ये अनेक नागरिकांना ही प्रक्रिया अत्यंत अवघड असल्यामुळे यातून लाभ मिळवणे अशक्य होते. याचाच विचार करत राज्य शासनाने आता मुख्यमंत्री सहायता निधीकक्ष ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यामुळे पात्र असणाऱ्या नागरिकाला आता मंत्रालयात जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अर्जदार आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून देखील मुख्यमंत्री सहायता कक्षा कडून आर्थिक मदत मिळू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Give blood, give hope जागतिक रक्तदाता दिन २०२५: Give blood, give hope

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारी कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • उपचारासाठी लागणारे वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखवा
  • रेशन कार्ड
  • संबंधित आजाराचा रिपोर्ट
  • अपघात रुग्णासाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक.
  • प्रत्यारोपण रुग्णासाठी ztcc
  • रुग्णालयाची नोंद मुख्य मंत्री सहायता निधी लक्षात असावी.

अर्ज कसा करावा mukhyamantri sahayata nidhi

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया म्हणजे मुख्यमंत्री सहायता कक्षाला आपण ई-मेलच्या माध्यमातून आपली कागदपत्रे आणि आपला अर्ज पाठवू शकतो. आपली सर्व कागदपत्रे आणि आपण अर्जामध्ये दिलेली माहिती याची संपूर्ण तपासणी केली जाते. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्षा कडून आपला अर्ज मंजूर केला जातो. अर्ज मंजूर केल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री सहायता निधी रक्कम वितरित केली जाते. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने मंजूर केलेले रक्कम डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाते.

अर्ज आणि अर्जासोबत सर्व कागदपत्रे एका पीडीएफ मध्ये तयार करून आपण मुख्यमंत्री सहाय्याचा कक्षाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही माहिती पाठवू शकता. माहिती ईमेल ने पाठवल्या नंतर सर्व कागदपत्रे आपणास पोस्टाने मुख्यमंत्री सहाय्यता विभागाला पाठवणे आवश्यक आहे.

अधिकृत ई-मेल आयडी . aao.cmrf-mh@gov.in

हे पण वाचा:
Health Insurance Health Insurance :विमाधारकांची हेल्थ पॉलिसीकडे पाठ? अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर!

अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्यापूर्वी महत्वाच्या सूचना

मुख्यमंत्री सहायता मध्ये अर्ज करण्यापूर्वी त्यासाठी कोणती पात्रता नियम अटी यांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. आपण कोणत्या वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करत आहोत. त्याची नोंद मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आहे का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाकडन उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा निधी वितरित केला जातो. अपवादात्मक काही प्रकारामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून अधिकची रक्कम देखील रुग्णांना दिली जाते. हृदयरोग शस्त्रक्रिया, ट्रामा,कॅन्सर यासारख्या प्रमुख आजारावर देखील मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून आर्थिक मदत दिली जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता कोणते आजार समाविष्ट आहेत पहा

हे पण वाचा:
HMPV virous HMPV virous : नवीन virous बद्दल माहिती आणि बचावाचे उपाय.

Leave a comment