नमो शेतकरी योजना

     महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे . ज्या मध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे केंद्र सरकारची पीएम किसान सम्माण निधी योजना आहे. ज्या मध्ये भारतातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात त्याचे अनुसरण करत महाराष्ट्र शासनाने देखील नमो शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये वितरित करणार आहे . त्या अनुषंगाने राज्य सरकारने पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे . ज्या मध्ये महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेत पात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
नमो शेतकरी योजना

योजनेचे नाव

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

सुरू करणारे राज्य

महाराष्ट्र

योजनेचा विभाग

महाराष्ट कृषि विभाग

उदिष्ट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत करणे

लाभार्थी संख्या

महाराष्ट्रातील 88 लाख 66 हजार शेतकरी.

लाभार्थी पात्रता

महाराष्ट्रातील अल्प भूधारक शेतकरी वर्ग.

नमो शेतकरी योजना GR

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा नमो शेतकरी योजना GR

नमो शेतकरी योजना वैशिष्ट

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
  • पि एम किसान सम्मान निधी धर्तीवर वर्षाला 6000 रुपये दिले जातील .
  • दर चार महिन्याला 2000 या प्रमाणे निधी बँक खात्यात जमा केला जाईल.
  • निधी जमा करण्यासाठी सरकार थेट लाभ हस्तातरण BDT चा वापर करणार आहे.
  • या योजनेचा महाराष्ट्रातील 1.5 करोंड शेतकरी कुटुंबाला लाभ मिळणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.
  • सरकार ने या योजनेसाठी 6900 करोंड रुपये बजट निश्चित केले आहे.

नमो शेतकरी योजना पात्रता

  • लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • शेतकरी हा अल्प भूधारक असावा (2 हेक्टर पेक्षा कमी )
  • लाभार्थी शेतकरी पती पत्नी या पैकी एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल .
  • लाभार्थी शेतकरी हा आमदार ,खासदार , जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिति सदस्य नसावा.
  • लाभार्थी शेतकरी हा सरकारी नोकरी करणार नसावा.
  • लाभार्थी शेतकरी इन्कम टॅक्स भरणार नसावा.
  • शेतकऱ्यांच्या नावावर 8 अ उतारा असावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असावा.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावे जमीन 2019 पूर्वी झालेली असावी.
  • लाभार्थी शेतकऱ्याचे आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी योजना नोंदणी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड .
  2. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावा.
  3. उत्पन्न प्रमाण पत्र .
  4. राशन कार्ड .
  5. बँक पासबूक (आधार लिंक असणारे )
  6. सातबारा, 8 अ .
  7. मोबाइल क्रमांक
  8. पासपोर्ट साइज फोटो.

नमो शेतकरी योजना नोंदणी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड .
  2. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावा.
  3. उत्पन्न प्रमाण पत्र .
  4. राशन कार्ड .
  5. बँक पासबूक (आधार लिंक असणारे )
  6. सातबारा, 8 अ .
  7. मोबाइल क्रमांक
  8. पासपोर्ट साइज फोटो.

नमो शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया

    नमो शेतकरी योजना मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी राज्य शासनाचे कोणतेही असे संकेतस्थळ उपलब्ध नाही. जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधी मध्ये नोंदणी झालेले आहेत व ते महाराष्ट्र मधील रहिवाशी आहेत अश्या सर्व शेतकरी लाभार्थ्याना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिल जातो.

    आपणास नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास सर्व प्रथम पीएम किसान सम्मान निधी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पीएम किसान सम्मान निधी योजने मध्ये नाव नोंदणी आपण स्वत: आपल्या मोबाइल वरुण किंवा आपल्या जवळील CSC सेंटर वर जाऊन देखील आपण नोंदणी करू शकतात. पीएम किसान सम्मान निधी योजनेमध्ये आपण पात्र ठरवल्यानंतर आपणास नमो शेतकरी योजने मध्ये पात्र ठरवण्यात येते. त्या साठी आपण या योजनेच्या सर्व पात्रता , अटी  , कागदपत्रे या सर्व घटकांची माहिती घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

निष्कर्ष

   नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी योजना आहे. ज्या मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करता येईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी प्रगतीच्या वाटेने चालेल. ही योजना केंद्र सरकारच्या योजने प्रमाणेच आहे. ही फक्त महाराष्ट्र राज्यातच राबवली जाणार आहे . या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार असून आता महराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला पि एम किसान योजनेचे 6000 रुपये  व नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे मिळून वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत.

   या लेखात आपण नमो शेतकरी योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपल्या जवळील मित्र नातेवाईक यांना या योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करावा. या योजने मध्ये आपणास काही अडचण असेल तर आपण आम्हाला विचारू शकतात. आम्ही नक्कीच आपली मदत करू.

नेहमी विचारली जाणारी प्रश्न

  1. नमो शेतकरी योजना काय आहे ?
  • नमो शेतकरी योजनेअंतर्गत माहाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  1. नमो शेतकरी योजना कोणी सुरू केली ?
  • ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली .
  1. नमो शेतकरी योजने मध्ये किती निधी दिला जातो ?
  • या योजनेमध्ये दर चार महिन्याला 2000 असे मिळून वर्षाला 6000 रुपये दिले जातात.
  1. नमो शेतकरी योजनेत लाभार्थी कोण आहेत?
  • नमो शेतकरी योजनेत महाराष्ट्रातील अल्प भूधारक शेतकरी लाभ धारक आहेत .
  1. नमो शेतकरी योजनेचा उद्देश काय आहे ?
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे व त्यांना शेती व्यवसायासाठी प्रोस्थाहण देणे.