pm surya ghar पीएम सूर्य घर योजना साठी नवीन अर्ज सुरू ,पहा सविस्तर माहिती .

pm surya ghar केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजना (पीएमएसजीएमबीवाई) फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सौर पॅनल्सच्या माध्यमातून वीज पुरवठा करून वीज खर्चात बचत करणे हा आहे. ही योजना पर्यावरणपूरक व स्वच्छ ऊर्जा स्रोताचा वापर करण्यावर भर देते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

pm surya ghar पीएम सूर्य घर योजना म्हणजे काय?

पीएम सूर्य घर योजना ही एक अभिनव उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतातील घरांच्या छतांवर सोलर पॅनल्स बसवणे आहे. या योजेनेच्या मध्यमातून घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसवून वीज निर्मिती करण्यासाठी आहे . सोलर पॅनल्समुळे वीज बिलात मोठी बचत होते. यामुळे केवळ पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना मिळत नाही, तर आर्थिक लाभही होतो.  सरकारची मुख्य कल्पना ही आहे की, सौर पॅनल्सच्या माध्यमातून घरांना फुकट वीज दिली जाईल आणि त्या पद्धतीने लोक सौर ऊर्जा वापरण्याला प्रोत्साहित होतील.

एक कोटी पॅनल्स बसवण्याचे लक्ष्य

pm surya ghar योजनेच्या पहिल्या नऊ महिन्यांत 6.3 लाख सोलर पॅनल्स बसवले गेले आहेत. याचा अर्थ महिन्याला सरासरी 70,000 पॅनल्स बसवले जात आहेत.या योजनेचे भविष्यातील उद्दिष्ट आहे की, मार्च 2025 पर्यंत 10 लाख पॅनल्स इंस्टॉल केले जातील. आता 2025 अखेर 20 लाख पॅनल्स तर ,2026 मध्ये 40 लाख पॅनल्स आणि 2027 पर्यंत एक कोटी पॅनल्स बसवण्याचा विचार आहे. या योजनेचा मेन उद्देश देशभरात एक कोटी कुटुंबांना सौर पॅनल्सच्या माध्यमातून फुकट वीज मिळवून देणे हा आहे. यामुळे सरकारला वीज खर्चात दरवर्षी 75,000 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.

pm surya ghar

पात्रता व अर्ज प्रक्रियेचे नियम

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आहेत:

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • घराच्या छतावर सौर पॅनल्स बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी.
  • घरकुलांना वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • योजनेसाठी पूर्वी सौर पॅनल्सवर कोणतीही सबसिडी घेतलेली नसावी.
  • योजनेचा लाभ फक्त घरकुलांसाठी आहे; इमारतीतील फ्लॅट्स व व्यावसायिक प्रकल्पांना याचा लाभ होणार नाही.

योजनेचे फायदे

  1. वीज खर्चात बचत: सोलर पॅनल्स 300 युनिट्स वीज तयार करू शकतात, ज्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होते.
  2. अतिरिक्त उत्पन्न: अतिरिक्त वीज विकून दरमहा 1500-2000 रुपयांचे उत्पन्न मिळवता येते.
  3. पर्यावरणपूरकता: सौर ऊर्जा स्वच्छ व हरित ऊर्जा असल्याने पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त आहे.

सौर ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा

pm surya ghar या योजनेद्वारे भारताच्या सौर ऊर्जा क्षमतेत 30 गिगावॉट वाढ अपेक्षित आहे. सौर ऊर्जा ही देशाच्या नवीकरणीय ऊर्जा ध्येयांचा एक महत्त्वाचा भाग आहे. पर्यावरणपूरकता आणि ऊर्जा बचत या दोन्ही दृष्टिकोनातून ही योजना महत्त्वाची ठरते.

प्रधानमंत्री सूर्य घर योजना देशभरातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या उपयोगासाठी प्रोत्साहित करत आहे. ही योजना देशाच्या ऊर्जा आणि पर्यावरण धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment