PM Vishwakarma Yojana : भारत सरकारने अनेक योजनांद्वारे सर्वसामान्य लोक आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना .या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांना चांगल्या रोजगाराची संधी निर्माण झालेली आहे . सप्टेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना मुख्यतः कारागीर आणि हस्तकला करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेतून कारागीरांना परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ज्याचा वापर करून ते आपला व्यवसाय सुरू करू शकतात.तर आपण आज या लेखाद्वारे पाहणार आहोत या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज दिले जातील .
PM Vishwakarma Yojana 2 लाख नागरिकांनी घेतला योजनेचा लाभ
मागील काही दिवसांमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या नागरिकांची आकडेवारी समोर आलेली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की,गेल्या एका वर्षात 2.02 लाख लोकांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत 1751 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. या योजनेत पारंपरिक कामगारांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे.
PM Vishwakarma Yojana कोणत्या कारागीरांचा समावेश?
पीएम विश्वकर्मा योजनेत पारंपरिक काम करणाऱ्या 18 प्रकारच्या कारागीरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये खालील व्यवसायांचा समावेश होतो:
- सुतार
- बोटी बनवणारे
- लोहार
- हातोडा व उपकरणे बनवणारे
- सोनार
- कुंभार
- दगड कामगार
- चर्मकार
- गवंडी
- गालिचे तयार करणारे
- झाडू व टोपली बनवणारे
- धुलाई करणारे
- शिंपी
- मासेमारीचे जाळे तयार करणारे
- इत्यादींचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
PM Vishwakarma Yojana किती कर्ज मिळू शकते?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी फक्त 5 टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे. कर्जाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये दिली जाते. पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम लाभार्थींना दिली जाते. यामुळे कारागीरांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी मदत होते.
PM Vishwakarma Yojana अर्ज प्रक्रिया
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थींनी अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट ओपन करावी लागेल. वेबसाईट ओपन केल्यानंतर “Apply Online” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल. आणि अर्ज सबमिट करावे लागेल. पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
निष्कर्ष
पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागीर आणि हस्तकला करणाऱ्यांसाठी रोजगाराची नवीन संधी निर्माण करणारी महत्त्वाची योजना आहे. परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देऊन कारागीरांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नगरीकांनी घ्यावा, यासाठी जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.PM Vishwakarma Yojana
1 thought on “PM Vishwakarma Yojana:व्यवसायासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा, आत्तापर्यंत 2 लाख तरुणांनी घेतला लाभ.”