पोस्ट ऑफिस विमा योजना 399

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 post office vima 399

जगात आपण दररोज बऱ्याचअश्या घटना पाहतोत. ज्या मध्ये अपघात होऊन  मुत्यू झाल्याचे आपणास समजते मानवावर काही नैसर्गिक कारणामुळे किंवा मानवनिर्मित घटनामुळे आपत्तीजनक अपघात येतात बऱ्याच वेळा आपण पाहतो कि अपघातातून व्यक्ती मुत्यू पावतो किंवा कोमामध्ये जाण्याचे प्रमाण पाहवयास मिळते .एका सर्वेक्षणातून माहिती समोर आली आहे कि दररोज २००० पेक्षा जास्त अपघात होतात या अपघातामध्ये कित्येक लोक मुत्यू देखील पावतात. अपघातामध्ये जर घरचा कुटुंब प्रमुख मुत्यू पावला तर त्या कुटुंबावर मानसिक संकट तर होतेत शिवाय  कुटुंबप्रमुख मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर आर्थिक संकट  देखील उद्भवते या आर्थिक संकटावर मात करता यावी म्हणून इंडियन पेमेंट पोस्ट बँक टाटा AIG यांनी मिळून एक ऑक्सीडेंट पॉलिसी पोस्ट ऑफिस विमा योजना सुरू केलेलीआहे या पोस्ट ऑफिस विमा योजना मधून गरीब कुटुंबातील व्यक्तींना त्याची इन्शुरन्स विमा काढणे खूप सोपे झाले आहे.

पोस्ट ऑफिस विमा योजना ही शेतकरी तसेच मजूर वर्ग यांना खूप लाभदायक ठरत आहे ज्यामध्ये दहा लाख रुपयाचा विमा कवच मिळत आहे आजच्या या लेखात आपण पोस्ट ऑफिस वीमा योजना 399 आणि 299  या विषयी संपूर्ण  माहिती पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिस विमा योजना -399 आणि 299अश्या दोन प्रकरच्या वीमा पॉलिसी इंडीयन पोस्ट पेमेंट बँक ने त्यांच्या  ग्राहकासाठी आणलेल्या  आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

पोस्ट ऑफिस विमा योजना

पोस्ट ऑफिस विमा योजना 299 रुपयची पॉलिसी

299  रुपयाची  पॉलिसी मध्ये 299 रुपयाच्या अपघाती विमा योजनेमध्ये

  • अपघाती मुत्यू झाल्यास 10लाखा रुपये दिले जातात
  • कायमचे अपंगत्व  झाल्यास 10लाख रुपये दिले जातात
  • दवाखाना खर्च  60,000 रुपये दिले जातात
  •  दवाखान्यात ऍडमिट असे पर्यंत दररोज 10,000 रुपये (10 दिवसा पर्यंत ) दिले जातात
  •  O P D खर्च 30,000 रुपये
  •  अपघात होऊन व्यक्तीस  पॅरालीस झाल्यास 10लाख रुपये दिले जातात
  •  कुटुंबाला दवाखाना वाहतूक प्रवास खर्च 25000 (जो खर्च झाला आहे जी रक्कम  कमी असेल तो खर्च दिला जाईल )

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 रुपयाची पॉलिसी

  • अपघाती मुत्यू झाल्यास 10लाखा रुपये दिले जातात
  • कायमचे अपंगत्व  झाल्यास 10लाख रुपये दिले जातात
  • दवाखाना खर्च  60,000 रुपये दिले जातात
  •  दवाखान्यात ऍडमिट असे पर्यंत दररोज 10,000 रुपये (10 दिवसा पर्यंत ) दिले जातात
  •  O P D खर्च 30,000 रुपये
  •  अपघात होऊन व्यक्तीस  पॅरालीस झाल्यास 10लाख रुपये दिले जातात
  • मुलांचे  शिक्षण  खर्च १  लाख  रुपये प्रती मूल (जास्तीत जास्त 2 मुलांना लाभ दिला जातो)
  •  कुटुंबाला दवाखाना वाहतूक  प्रवास खर्च 25000 (जो खर्च झाला आहे जी रक्कम  कमी असेल तो खर्च दिला जाईल )

आपण जर पहिले तर 299 आणि  399 या मध्ये फारचा फरक नाही या मध्ये मुख्य फरक हा फक्त मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारी रक्कम याचाच फरक आपणास पाहण्यास मिळतो पण सर्व घटकांचा तपशील विचार केला तर 399 ची विमा पॉलिसी  आपल्या फायद्याची आहे.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

कोणत्या अपघातावर कव्हर मिळते

  • सर्व प्रकारचे अपघात .
  • सर्प दंश (साप चावणे).
  •  विजेचा शॉक लागणे.
  • फरशी वरुन  घसरून पडने.
  •  गाडीवरून पडून अॅक्सीडेंट होणे.

इत्यादी घटकांचा या पोस्ट ऑफिस विमा पॉलिसी मध्ये  समावेश होतो.

नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा

अर्ज प्रक्रिया

पोस्ट ऑफिस विमा योजना ही पॉलिसी फक्त इंडियन पोस्ट पेमेंट बँक ग्राहकांना दिली जाते आपणास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले बँक खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपले वय 18 ते 65 या दरम्यान असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस विमा योजना कालावधी

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

या योजनेचा कालावधी हा एक वर्षासाठी आहे एका वर्षानंतर आपण पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपली विमा पॉलिसी RENEWAL नुसतीकरण करू शकतात. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वयाच्या 65व्या  वर्षापर्यंत  विमा पॉलिसी नुतनिकरण करू शकतात. नुतनिकरण करण्यासाठी आपण निवडलेल्या प्लॅनची रक्कम (299 किंवा 399 या पैकी)  आपणास प्रत्येक वर्षी भरावी लागणार आहे.

अधिक माहिती

अधिक माहिती  आपणास हवी असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता.

महत्त्वाची माहिती

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

पोस्ट ऑफिस विमा योजना ही एक गरीब तसेच शेतकरी मजूर वर्ग  यांच्या खूप फायद्याची ठरणारी आहे. या योजनेमध्ये आपल्यावर येणाऱ्या अपघाती संकटांना आपण सामोरे जाण्यास  व आपली व आपल्या कुटुंबाची अपघाताने होणाऱ्या मानसिक व आर्थिक  हानी यापासून आपण संरक्षण मिळवु  शकतो. आणि विशेष म्हणजे या पॉलिसीची वार्षिक किंमतही जास्त नाही म्हणून आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माफक अपेक्षा आम्ही  करतो.

Leave a comment