poultry farming : कुक्कुटपालन म्हणजे ,कोंबडी पालन होय, कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप जुना आणि फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये कोंबड्याचे संगोपन करून अंड्याचे आणि मासाचे उत्पादन घेण्यात येते. कुकुट पालन व्यवसाय करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण कुकूटपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कोण कोणती काळजी घ्यावी लागते हे पाहूया. poultry farming

कुक्कुटपालन व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी
कुक्कुटपालन व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी म्हणजे कोंबड्यांच्या सुधारित जाती, त्यांची निवड व पैदास. अंडी उत्पादन आणि मासासाठी योग्य जात निवडणे खूप महत्त्वाचे आहे . जसे की लेयर कोंबड्या (अंड्यासाठी) आणि ब्रॉयलर कोंबड्या(मासासाठी)कोंबड्यांची जात निवड करताना, कोंबड्यांची उत्पादकता आणि रोगप्रतिकारक शक्ती व इतर गुणधर्म विचारात घ्यावे .poultry farming
कोंबड्यांचे खाद्य
- कोंबड्यांच्या विविध जाती आहेत .यामध्ये अंड्यांसाठी लेअर आणि मासासाठी ब्रॉयलर अशा वेगवेगळ्या जाती आहेत .
- तसेच,सुधारित देशी कोंबड्यांचे संगोपन पण केले जाऊ शकते.
कोंबड्यांची जोपासना व निगा राखणे आणि घरे
- कुक्कुटपालन व्यवसाय करताना कोंबड्यांना खेळती हवा आणि उष्णता यांचे योग्य प्रकारे नियोजन करून हवा खेळती ठेवणे आवश्यक आहे.
- शेड मधील तापमान नियंत्रित ठेवणे विशेष करून बदलणाऱ्या हवामानानुसार तापमान नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे.
- शेडमध्ये हवा उपलब्ध होईल तसेच प्रकाश व्यवस्था देखील उपलब्ध होईल अशा पद्धतीने व्हेंटिलेशन करणे आवश्यक आहे.
कोंबड्याचे आरोग्य व औषध उपचार
कुक्कुटपालनामध्ये सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे कोंबड्याचे आरोग्य. आरोग्यविषयक काळजी व्यवस्थित घेतली तर मिळणारे उत्पन्न देखील चांगले मिळते. प्राण्यांचे आरोग्य व्यवस्थित असेल तर प्राण्यांची मर कमी होते. यासाठी खालील प्रकारे खोबऱ्याचे लसीकरण आणि आरोग्य विषयक काळजी घेणे आवश्यक आहे:
- वेळोवेळी आवश्यक असणाऱ्या लसीकरणाची मात्रा देणे गरजेचे आहे.
- हंगामानुसार बदलणारे लसीकरण आणि वातावरण याचा परिणाम प्राण्यांवर दिसून येतो त्यामुळे आवश्यक असणारे लसीकरण त्याच त्याच हंगामामध्ये देणे आवश्यक आहे.
- प्राण्यांमध्ये रोगाची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पुढील कारवाई पार पाडावी.
अंडी व मासांची योग्य वेळी विक्री
कुक्कुटपालन व्यवसायातून नफा मिळवायचे म्हटल्यानंतर विक्री अत्यंत महत्त्वाची आहे. मिळणारे उत्पन्न अंडी मास यांची योग्य वेळी विक्री करणे अत्यंत महत्त्वाचे असते. बाजाराचा आढावा बाजारातील मागणी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून विक्रीसाठी माल उपलब्ध करणे गरजेचे आहे. आपण निर्माण केलेले उत्पन्न त्याला कोणत्या बाजारपेठेमध्ये अधिक मागणी आहे याचा अभ्यास करून आपली निर्माण झालेले उत्पन्न यामध्ये मास आणि अंडी त्या बाजारात उपलब्ध करून विक्री करणे गरजेचे आहे. poultry farming