मानवाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा अन्न,वस्त्र आणि निवारा हे आपण लहान पणा पासूनच वाचत आलो आहोत. परंतु शासनाकडून देखील या वर भर दिला जातो आणि विविध योजना मार्फत नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. अश्याच एका योजने विषयी म्हणजे रमाई आवास योजना विषयी सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या योजने मध्ये अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकसाठी अर्थ सहाय्य केले जाते. ज्या मध्ये 269 चौ फुट घरकुल दिले जाते. राज्यातील अनुसूचित बेघर व्यक्तींना घर बांधणी साठी शासनाकडून सहाय्य केले जाते. आजच्या या लेखात आपण रमाई आवास योजना विषयी पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेचे नाव | रमाई आवास योजना . |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अनुसूचित जाती / जमाती . |
कोणामार्फत सुरू करण्यात आली | महाराष्ट्रातील राज्य सरकार कडून. |
योजना सुरू करण्याचा उद्देश | अनुसूचित जाती जमाती मधील आर्थिक दृष्ट्या दुर्लभांना स्वतचे घर उपलब्ध करून देणे. |
योजना कोणत्या विभागा मार्फत राबवली जाते | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,महाराष्ट्र राज्य |
योजनेत दिले जाणारे अर्थ सहाय्य | 1,32,000 पासून 2,50,000 पर्यन्त |
रमाई आवास योजना उद्देश
- राज्यातील अनुसूचित जाती /जमाती यांना कायमस्वरूपी घर पक्के घर देणे.
- राज्यातील अनुसूचित जाती /जमाती मधील नगरिकांचे आर्थिक जीवनमान सुधरवणे.
- गरीब असणाऱ्या कुटुंबाला पक्के घर मिळवून देणे.
- राज्यातील अनुसूचित जाती /जमाती मध्ये येणाऱ्या लोकांना घर बांधणी साठी आर्थिक सहाय्यता प्रदान करणे.
- पक्के घर बांधणी करण्यासाठी आर्थिक मदत देऊन झोपडपट्टी मुक्त भारत करणे…
रमाई आवास योजना वैशिष्ट
- रमाई घरकुल योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती / जमाती साठी अमलात आणलेली योजना आहे.
- या योजनेमधून ज्या कुटुंबाला पक्के घर नाही अश्या कुटुंबांना पक्के घर दिले जाते.
- या योजनेत ग्रामीण भागासाठी 1,32,000 रुपये अनुदान दिले जाते.
- या योजनेत डोंगराळ भागासाठी 1,42,000 रुपये अनुदान दिले जाते.
- रमाई घरकुल योजना मध्ये शहरी भागासाठी 2.50,000 रुपये अनुदान दिले जाते.
- रमाई घरकुल योजना मध्ये शौचालय बांधकाम करण्यासाठी 12,000 रुपये अनुदान दिले जाते.
- लाभार्थी व्यक्तीला नरेगा अंतर्गत 90 दिवसापर्यंत रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
- रमाई घरकुल योजना मध्ये आपण घरबसल्या आपल्या मोबाइल किंवा कम्प्युटर चा वापर करून अर्ज करू शकता.
- रमाई घरकुल योजना मध्ये रक्कम थेट बँक खात्यावर वितरित केली जाते.
रमाई आवास योजना पात्रता.
- अर्जदार व्यक्ति महाराष्ट्रातील रहिवाशी असावा.
- अर्जदार व्यक्ति हा अनुसूचित जाती / जमाती मध्ये मोडणार असावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 ग्रामीण साठी 1,50,000 शहरी भागासाठी असावे.
- अर्जदार व्यक्तीकडे पक्के घर नसावे.
- अर्जदाराणे या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभ घेणाऱ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति सरकारी नोकरीत नसावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करणे बंधनकारक.
रमाई आवास योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आर्जदाराचे पॅन कार्ड
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/ जमाती)
- Bpl प्रमाणपत्र
- अर्जदार विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- घर बांधणी जागेचे PTR (नमूना नं 8)
- जन्म दाखल किंवा जन्म तारखेचा पुरावा
- या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
- अर्जदार पूरग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- अर्जदार पीडित असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- अर्जदार मागील 15 वर्ष महाराष्ट्रात रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र
- चालू वर्षाचा उत्पन्न प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- बँक पासबूक
- इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहेत आपल्या भागानुसार संबंधित अधिकाऱ्याने आवश्यक मागणी केलेले कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहे.
रमाई आवास योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
आपण शासनाच्या https://pmaymis.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज दाखल किंवा अर्जाची सद्य स्थिति पाहू शकता.
रमाई आवास योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालय / नगरपरिषद कार्यालय / महानगर पालिका कार्यालय मध्ये जाऊन योजने विषयी सर्व चौकशी करून आपण आपला अर्ज व्यवस्थित भरून सोबत वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून. ग्रामपंचायत कार्यालय / नगरपरिषद कार्यालय / महानगर पालिका कार्यालय(आपण ज्या हद्दीत असाल तेथे) त्यांच्याकडे आपला अर्ज जमा करावा.
घरकुल योजना अर्ज pdf घरकुल योजना अर्ज
रमाई घरकुल योजना प्राधान्य क्रम
- ज्या नागरिकांचे जातीय दंगली मुळे राहत्या घराचे नुकसान झाले आहे.
- ऍट्रॉसिटीकायद्यानुसार पीडित अनुसूचित जाती / जमाती च्या व्यक्ति.
- नैसर्गिक (भूकंप /पुर ) आपत्तीने झालेले घराचे नुकसान.
- घरात कोणीही कमावत नाही अश्या विधवा महिला.
- कच्चे घर किंवा झोपडी असणाऱ्या कुटुंबाला.
अश्या प्रकारे प्राधान्य क्रम लाऊन लाभ दिला जातो.
रमाई घरकुल योजना अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसणे.
- अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे.
- अर्ज करण्याच्या अंतिम मुदती नंतर अर्ज करणे.
- अर्जदार अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडत नसल्यास.
- अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या नियमा पेक्षा जास्त असणे.
- अर्जदाराकडे पक्के घर असणे.
- अर्जदार कुटुंबातील व्यक्तीने एकाद्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असणे.
निष्कर्ष
आम्ही आशा करतो की आम्ही दिलेली माहिती आपणास समजली असेलच. आपणास किंवा आपल्या जवळील एकाद्या कुटुंबाला / मित्राला या योजनेची आवश्यकता असल्यास आपण ही माहिती त्या कुटुंबा पर्यंत पोहत करावी. जेणे करून त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
या योजनेमध्ये आपणास काही अडचण असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आपल्याला हवी असणारी माहिती आम्ही नक्कीच आपणास देऊ.
3 thoughts on “रमाई आवास योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया ,कागदपत्रे”