राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना मराठी rashtriya gokul mission 2024

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना मराठी rashtriya gokul mission

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना मराठी rashtriya gokul mission

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   आपण आज या लेखांमध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही एक योजना राष्ट्रीय गोकुळ मिशन पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. आपण तर पाहतच आहोत की भारतातील प्रत्येक घरोघर दूध हे अविभाज्य भाग आहे.  प्रत्येक व्यक्ती ही दुधाचा वापर करीत असते मुलांना पिण्यासाठी किंवा चहा कॉफी यासाठी किंवा काही लोक दररोज दूध किंवा दूधजन्य पदार्थाचे सेवन करत असतात जेणेकरून या दुधजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे हे पदार्थ आपल्या मुलांना किंवा घरातील व्यक्तींना चांगले असतात त्यामुळे याचा वापर खूप प्रमाणात होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्याला दर्जेदार दूध मिळणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गोकुळ मशीनच्या अंमलबजावणीची घोषणा केलेली आहे. ही घोषणा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सोबत डिसेंबर 2014 मध्ये करण्यात आली . राष्ट्रीय गोकुळ  मिशन ह्या योजनेमध्ये राष्ट्रीय दूध विकास दुग्ध विकास मंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करते.

     हा उपक्रम दुधाचे उत्पादन तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी देशी गोवंश जातीचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी राबविण्यात आला.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना मराठी rashtriya gokul mission

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना मराठी rashtriya gokul mission म्हणजे काय?

   राष्ट्रीय गोकुळ मिशन म्हणजे नॅशनल प्रोग्रॅम फॉर बोवाइन ब्रीडिंग अँड डेअरी  डेव्हलपमेंट (NPBBD) अंतर्गत राबविण्यात आलेल्या, राष्ट्रीय गोकुळ मिशन उद्देश भारतातील  गोवंशीय जाती विकसित करणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आहे तसेच शेती व्यवस्थापनाचा समावेश असलेल्या वैज्ञानिक पद्धतीने दुधाची उत्पादकता आणि उत्पादन वाढवते.

या योजनेच्या माध्यमातून देशातील दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करते. हे ग्रामीण शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनते.

राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना 2021 ते 2026 या कालावधीत सुरू राहील.

राष्ट्रीय गोकुळ मिशनची उद्दिष्टे काय आहेत?

  •  देशी  जातीचा विकास आणि संवर्धन.
  • प्रजननासाठी उच्च अनुवंशिक गुणवत्तेसह रोगमुक्त बैलांचे वितरण
  •  दुधाची उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे.
  •  साहिवाल, गिर, राठी, देवणी, लाल संधी आणि थारापारकर यासारख्या उच्चभ्रू जातीचा वापर करून नॉनडिस्क्रिप्ट गुरांचे अपग्रेडिंग.
  • आधुनिक शेती व्यवस्थापन पद्धतीने अनुकूल करणे आणि सामान्य संसाधन व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे.

राष्ट्रीय गोकुळ मिशनची वैशिष्ट्ये काय आहेत?

   राष्ट्रीय गोकुळ मशीन एकात्मिक पशु विकास केंद्र किंवा गोकुळ ग्रामस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करते. ही केंद्रे प्रजनन क्षेत्रामध्ये आणि महानगरा जवळील शहरी गुरे राखण्यासाठी स्थापन केली जाते.

  • हे सेंद्रिय खत विक्री, मूत्र डिस्टिलेट, A2 दूध आणि बायोगॅस पासून विज   निर्मितीच्या माध्यमातून केले जाईल.
  • ही केंद्रे MAITRIS , शेतकरी आणि प्रजन्यकर्त्यासाठी स्थानिक प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करतील.
  • ही विकास केंद्र औषध 40:60 च्या प्रमाणात अनुत्पादक आणि दुभत्या जनावराची देखभाल करतात. या व्यतिरिक्त, ते सुमारे 1000 प्राणी राखू  शकतात.
  •  गोकुळ ग्राम मध्ये घरोघरीच्या उत्पादनातून जनावराच्या पोषणाची गरज भागवली जाईल.

राष्ट्रीय गोकुळ मशीन चे फायदे काय आहेत?

  •  दुधाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
  •  दुभत्या गुरांच्या भारतीय जातीचे संवर्धन आणि विकास.
  •  प्रक्रिया, संपादक आणि विपणन डेअरी पायाभूत सुविधाची स्थापना.

राष्ट्रीय गोकुळ मिशन याचा लाभ कसा मिळवायचा

  • पशुधन विकास महामंडळामार्फत स्वराज्य अंमलबजावणी संस्था (SIA )RGM योजना राबवते. देशी गोवंश विकासात भूमिका असलेल्या सर्व एजन्सी त्याचा लाभ घेऊ शकतात
  • राष्ट्रीय गोकुळ मिशन मुळे, भारताला पशु उद्योग तसेच दूध उत्पादक उद्योगासाठी चांगले भविष्य पाहण्याची आशा आहे .

2 thoughts on “राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना मराठी rashtriya gokul mission 2024”

Leave a comment