मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, पेमेंट करावे का? शेतकऱ्यांना कधी मिळणार सौर पंप. sour pump scheme payment

sour pump scheme payment राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल ही तयार करण्यात आले. या पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना आता पेमेंट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पेमेंट केल्यानंतर शेतकऱ्यांना कधी पंप मिळणार ही शंका बऱ्याच शेतकऱ्यांचे मनात आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत पेमेंट केल्यानंतर किती दिवसांनी शेतकऱ्यांना सौर पंप मिळेल याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात.

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यातच महत्त्वपूर्ण योजना की म्हणजे सौर कृषी पंप. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कमी किमतीत कृषी सौर पंप बसवून दिला जाणार आहे. या सौर कृषी पंपासाठी आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यातून शेतकऱ्यांना लाभ कधी मिळणार व पेमेंट कधी करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केल्या शेतकऱ्यांना आता पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अनेक शेतकरी या पेमेंट पर्यायामुळे गोंधळात पडले आहेत कारण पेमेंट केल्यानंतर अर्जाची छाननी व तपासणी होणार अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेमेंट करावे किंवा न करावे याबद्दलचा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
ई-पीक पाहणी 2025 ई-पीक पाहणी 2025: खरीप हंगामासाठी नवीन ॲपद्वारे पीक नोंदणी सुरू

हे वाचा: शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध असे करा पेमेंट

आधी पेमेंट नंतर तपासणी. sour pump scheme payment

याआधी शेतकऱ्यांना सौर पंप वाटप करताना अर्जाची तपासणी करून नंतर शेतकऱ्याला पेमेंट पर्याय उपलब्ध करून दिला जात होता. परंतु यावेळी म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधी पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर केला जाणार आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या मनात विविध शंका निर्माण झालेल्या आहेत. पेमेंट करूनही जर अर्ज मंजूर नाही झाला तर तसेच पेमेंट केल्यानंतर किती दिवसांनी अर्ज मंजूर होईल व अर्ज मंजूर झाल्यानंतर सौर कृषी पंपाचे वितरण कधी केले जाईल अशा विविध शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाल्या आहेत.

अर्ज मंजुरी साठी पेमेंट करणे आवश्यकच..

ज्या शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय दिलेला आहे. त्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाला आहे असे नाही. पेमेंट केल्यानंतर अर्जाची तपासणी केली जाईल. व त्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल. यासाठी अर्ज मंजुरी करिता शेतकऱ्यांना पेमेंट करणे आवश्यकच आहे.

हे पण वाचा:
Land Possession update Land Possession update: आता अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर ताबा असणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क? जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि अटी

पेमेंट केल्यानंतर कधी मिळेल सौर पंप sour pump scheme payment

आता ज्या शेतकऱ्यांना पेमेंट साठी पर्याय उपलब्ध झाला आहे. या शेतकऱ्यांनी जर ऑनलाईन पद्धतीने आपले पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना सौर पंप कधी पर्यंत मिळेल. यासाठी अधिकृत किंवा महावितरण कडून निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. परंतु पेमेंट केल्यानंतर अर्जाची तपासणी केली जाणार आणि तपासणीनंतर मंजूर झालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वितरित केले जाणार.

अर्ज मंजुरी प्रक्रिया

या आधी सौर कृषी पंप योजना अंतर्गत प्रथम अर्जदाराला प्रथम प्राधान्य या प्रमाणात योजना राबवली जात होती. परंतु यावेळी नियोजन बदल केले आहे का? किंवा जे शेतकरी आधी पेमेंट करतील त्यांच्याच अर्ज आधी तपासणी केली जातील याची कोणतीही माहिती विभागाकडून देण्यात आलेले नाही. परंतु पेमेंट केलेल्या अर्जाची तपासणी केली जाणार हे मात्र निश्चित आहे.

सौर कृषि पंप योजना लाभ व पेमेंट बद्दल काही महत्वाचे मुद्दे

पेमेंट करताना घाई करू नका. पेमेंट केले तरच आपल्याला सौर कृषी पंप मिळणार हे निश्चित आहे. परंतु पेमेंट केले की लगेच आपल्याला सौर कृषी पंप मिळणार आहे या संभ्रमात राहू नका. याची पुढील प्रक्रिया अजून बाकी आहे त्यामुळे संबंधित विभागाशी म्हणजेच महावितरण कार्यालयाशी संपर्क करूनच पुढील कार्यवाही करावी.

हे पण वाचा:
e pik pahani Update e pik pahani Update: खरीप हंगामाची ई-पीक पाहणी झाली सुरू, ई-पीक पाहणी या संदर्भात मोठे अपडेट..! जाणून घ्या सविस्तर

पेमेंट केले की लगेच सौर पंप मिळणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की मागील पद्धतीनुसारच पेमेंट केलं की शेतकऱ्यांना लगेच सौर पंप मिळतो. परंतु यावेळी तसं होणार नाही कारण पेमेंट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी होणार. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज मंजूर करून पंप वितरित केले जाणार.

मागणी जास्त लाभ उशिराच ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर झाले आहेत अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये अर्ज कमी प्रमाणात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना तात्काळ सौर कृषी पंप वितरित केले जातील.

पेमेंट करण्याआधी नियम अटींची तपासणी करा सौर कृषी पंपाचे ऑनलाइन पेमेंट करण्याआधी त्या ठिकाणी दिलेल्या पात्रता नियम व अटी त्यासोबतच मार्गदर्शक सूचना या सर्वांची माहिती व्यवस्थित पाहूनच पेमेंट करा. जर आपण यामध्ये पात्र असाल तरच आपण पेमेंट करावे अन्यथा आपले पेमेंट अडकून देखील राहू शकते.

हे पण वाचा:
KRUSHI SAMRUDH YOJANA शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

विभागाकडून कोणतीही माहिती नाही. शेतकऱ्यांनी पेमेंट करावे किंवा नाही तसेच शेतकऱ्यांना पंप कधी मिळणार या बाबत विभाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्या सोबतच अर्जाची तपासणी कधी होणार याची देखील तारीख स्पष्ट करण्यात आली नाही.

हे पण वाचा:
onlion policy committee कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचं नवं धोरण कधी येणार? onlion policy committee

Leave a comment