राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना

विद्यार्थी अपघात विमा योजना  rajiv gandhi student accident insurance scheme

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र शासनाच्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यांचे भविष्य सुधरावे असा या योजनेचा हेतू असतो. आज आपण त्याच योजनेपैकी एक योजना पाहणार आहोत जिसे नाव आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुग्रह अनुदान योजना.या योजने अंतर्गत  इयत्ता 1 ते 12 पर्यंत शिक्षण घेत  असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांना विमा सुरक्षा निर्माण करून देणे. असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची सुरुवात 26 ऑक्टोबर 2012 पासून सुरू करण्यात आलेली आहे

या अगोदर म्हणजे सुरुवातीला ही योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना या नावाने विमा कंपनी राबविण्यात येत होती. पण आता राज्य शासनाने ही योजना विमा कंपन्यामार्फत बंद केली आणि  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना या नावाने राबवली जाते.

राज्यातील खूप सार्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात. त्यांची परिस्थिती खूप दुखत असते अशा कारणामुळे ते आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. आणि जर त्यांच्या मुलांचा अपघात झाल्यास त्यांच्याजवळ पुरेसे पैसे पण नसतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांच्या उपचारासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना सरकारकडून जास्त व्याजावर कर्ज घ्यावे लागते. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थी अपघात विमा योजना

विद्यार्थी अपघात विमा योजना या योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश केलेला नाही.

  •  विद्यार्थ्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक जखम करून घेणे किंवा विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणे.
  •  दारू पिऊन नशा करून झालेला अपघात.
  •  नैसर्गिक मृत्यू व मोटार शर्यतीतील अपघात.
  •  गुन्हायाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघत करताना झालेला अपघात.

 तर या सर्व गोष्टींचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार नाही.

विद्यार्थ्यांचा निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ अशा प्रकारे मिळेल

  •  विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास आईला या योजनेचे अनुदान दिले जाईल.
  •  जर त्या विद्यार्थ्यांचीआई या जगात नसेल तर त्याचा लाभ वडिलांना दिला जातो.
  •  जर त्या विद्यार्थ्याचे आई आणि वडील दोन्ही पण या जगात नसतील तर 18 वर्षापेक्षा मोठा भाऊ किंवा अविवाहित बहीण यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनाची उद्दिष्टे

  • विद्यार्थी अपघात विमा योजना अंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण देणे हा योजना मुख्य उद्देश आहे.
  • मुलांच्या अपघाताच्या वेळी पालकाचा होणाऱ्या आर्थिक समस्या पासून मुक्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे  जीवनमान सुधारेल .
  • विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी प्रोसहान  करणे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना सामग्रह अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

  • राजीव गांधी या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य  शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.
  •  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी कोणत्याही जाती धर्माची अट नाही. ही एक अत्यंत महत्त्वाची विमा योजना आहे यामध्ये 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे.
  •  या योजनेमुळे राज्यातील पालकांना खूप मोठी मदत होणार आहे.
  •  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामग्रह अनुदान योजनेअंतर्गत विम्याच्या हप्त्याची रक्कम राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येईल
  •  ही योजना राज्यातील मुलांना आणि मुलींना दोघांना पण सुरू करण्यात आलेली आहे.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अपघात झाल्यास पालकांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, आणि ते आपल्या मुलांचा योग्य तो उपचार करू शकतील. त्यांना कोणाकडून ही कर्ज काढण्याची गरज पडणार नाही.
  •  या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.
  •  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामग्रह अनुदान योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारे अनुदान

विद्यार्थी अपघात विमा योजना rajiv gandhi student accident insurance scheme

  •  विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानाची रक्कम: 1.50 लाख रुपये
  •  विद्यार्थी अपघातामुळे कायमचे अपंगत्व (2 अवयव/दोन डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा निकामी) सानुग्रह अनुदानाची रक्कम: 1 लाख रुपये
  •  विद्यार्थी अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी) सानुग्रह अनुदानाची रक्कम: 75,000/-रुपये
  •  विद्यार्थ्यास अपघातामुळे शास्त्रक्रिया करावी लागल्यास सानुग्रह अनुदानाची रक्कम: प्रत्यक्ष हॉस्पिटल चा किमान  1 लाख रुपये
  •  विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे जखमी झाल्यास म्हणजे क्रीडा स्पर्धा खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून किंवा आगीमुळे ,विजेचा धक्का, वीज अंगावर पडून इत्यादीसानुग्रह अनुदानाची रक्कम: हॉस्पिटलचा होणारा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना पात्रता

  •  विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा  रहिवासी असणे अनिवार्य  आहे.
  •  या योजनेमध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंत शिकत असल्याचे विद्यार्थी पात्रता असतील.
  •  या योजनेमध्ये मुलगा आणि मुलगी दोन्हीही पात्र असतील
  •  या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी लाभार्थी हामहाराष्ट्र राज्यातील असावा.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलगा आणि मुलगी दोघ पण असतील.
  •  1 ते 12 पर्यंतचे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे अटी व नियम

  •  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान लाभ फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
  •  महाराष्ट्र राज्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  1 पहिली ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  •  एखाद्या विद्यार्थ्याने मधीच शिक्षण सोडल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  लाभार्थी व्यक्तीने या अगोदर केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्या विमा योजनेचा लाभ  घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही .
  •  विद्यार्थ्याचे आई किंवा वडील दोन्हीपैकी कोणीही एक जण सरकारी नोकरी करत असल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक जखम करून घेतल्यास, किंवा आत्महत्येचा प्रयत्न करत, दारू पिऊन किंवा नशा करून अपघात झाल्यास, नैसर्गिक मृत्यू व मोटार शर्यतीतील अपघात झाल्यास अशा विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. 

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना सानुग्रह अनुदान योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •  राशन कार्ड
  •  शाळेचा दाखला
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  बँक खाते क्रमांक
  •  मोबाईल  नंबर
  • ई-मेल आयडी
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो

राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  •  या योजनेसाठी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होऊ शकेल.
  •  विद्यार्थी इयत्ता तेरावी मध्ये शिक्षण घेत असल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जामध्ये खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
विद्यार्थी अपघात विमा योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघातच सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जावून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
  •  त्यानंतर अर्धाच विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत.
  •  आणि भरलेला अर्ज आपल्या शाळेच्या कार्यालयात जमा करायचा आहे. त्यानंतर त्या अर्जाची पोच पावती घ्यायची आहे.

अशाप्रकारे तुम्ही राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा अर्ज करू शकतात.  विद्यार्थी अपघात विमा योजना rajiv gandhi student accident insurance scheme

2 thoughts on “राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना”

Leave a comment