sugarcane harvester ऊस तोडणी यंत्र अनुदान वाटपास मंजूरी
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास ((sugarcane harvester) अनुदान या प्रकल्पास 20/03/2023 रोजीच्या
शासन मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावनी राज्यात सुरू आहे. 03 मे,
2024 रोजी झालेल्या 36 व्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये मा. मुख्य सचिव यांनी राष्ट्रीय कृषि विकास
योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान वाटप करण्यासाठी रु.321.30 कोटी रकमेच्या प्रकल्पास मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ मंजुरी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा
कालावधी मार्च 2024 अखेर संपला असल्याने , सदर प्रकल्पास 09/05/2024 रोजीच्या शासन निर्णय द्वारे
आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षा करीता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास
योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाच्या सन 2024-2025 करीताच्या रु.321.30 कोटी रकमेच्या
निधी वाटपास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत (sugarcane harvester) ऊस तोडणी यंत्रांसाठी अर्ज केले आहेत अश्या शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. ही निवड झाल्यानंतर एकूण मंजूर अनुदानपैकी 60 टक्के केंद्र सरकार व 40 टक्के राज्य सरकार PFMS प्रणाली द्वारे लाभार्थी यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. या अनुदान वितरण प्रणाली मध्ये सर्व प्रक्रिया ही राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत राबवण्यात येते.
ऊस तोडणी यंत्र अनुदान बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. us todani yantr gr
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.