vima sakhi yojana : महिलांसाठी एक महत्त्वाची सरकारी योजना सध्या सुरु झाली आहे, त्या योजनेला “विमा सखी योजना ” म्हणून ओळखले जाते. एलआयसीने ही योजना अवघ्या एक महिन्यापूर्वी लॉन्च केली होती आणि त्या योजनेला महिलांकडून जास्तीत जास्त प्रतिसादा मिळत आहे . त्यामुळे असे सिद्ध होते की, महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. विमा सखी या योजनेची सुरुवात पानिपत येथून झाली. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. 9 डिसेंबर पासून विमा सखी योजनेत महिलांची नोंदणी वेगाने वाढत असताना पाहायला मिळते.
vima sakhi yojana : विमा सखी योजना म्हणजे काय?
विमा सखी योजना म्हणजे काय ? हे माहीत असणे खूप गरजेचे आहे . या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी देणे. या योजनेअंतर्गत महिलांना कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विमा विक्रीचे कार्य करायचे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जाईल आणि दरमहा 7 हजार रुपये पगार देण्यात येईल तसेच , महिलांना कमिशन मिळवण्याची संधी मिळणार आहे . ही योजना महिला सक्षमीकरणाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते, कारण ती महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवते.
वार्षिक उत्पन्नाची तपासणी सुरू, 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर !
विमा सखी म्हणून कसे काम करणार?
vima sakhi yojana विमा सखी एजंट बनून महिला कुटुंबांना विमा घेण्यास प्रोत्साहित करतील आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्य करतील. त्यांना नोकरीत स्थिरता आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी सहाय्य मिळेल. महिलांना विमा सखी म्हणून काम करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल आणि याशिवाय दरमहा5,000 ते 7,000 रुपये स्टायपेंड देखील दिले जाईल.
विमा सखी योजनेसाठी पात्रता काय?
विमा सखी होण्यासाठी महिलांना काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागेल. विमा सखी होण्यासाठी महिलांचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे लागेल, तसेच त्या महिलाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल , विमा सखी योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना त्यांच्या जवळच्या एलआयसी शाखेला भेट द्यावी लागेल किंवा एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन देखील तुम्ही अर्ज सादर करू शकतात .
vima sakhi yojana अटी आणि पगाराचे तपशील:
vima sakhi yojana विमा सखी योजनेतील महिलांना तीन वर्षांच्या कालावधीत एक निश्चित पगार दिला जाईल. पहिल्या वर्षी दरमहा 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये स्टायपेंड मिळेल. आश प्रकारे महिलाना तीन वर्षांत एकूण 2,16,000 रुपये दिले जातील. याशिवाय, योजनेत काही विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण केल्यावर बोनस कमिशन देखील मिळणार आहे .
उद्दिष्टे आणि लक्ष्ये:
महिलांना स्टायपेंड मिळवण्यासाठी काही उद्दिष्टे साध्य करावीत:
- विमा सखीला पहिल्या वर्षी 24 लोकांचा विमा काढावा लागेल आणि पहिल्या वर्षी कमीत कमी 48,000 रुपये कमिशन (बोनस कमिशन वगळून) मिळावावे लागेल. पहिल्या वर्षी तुम्हाला दरमहा 7,000 रुपये स्टायपेंड मिळेल.
- दुसऱ्या वर्षी स्टायपेंड 6,000 रुपये असेल पण, यासाठी पहिल्या वर्षी घेतलेल्या कमीत कमी ६५% पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत लागू राहणे आवश्यक आहे.
- तिसऱ्या वर्षी तुम्हाला 5,000 रुपये स्टायपेंड मिळेल, ज्यासाठी दुसऱ्या वर्षी घेतलेल्या कमीत कमी ६५% पॉलिसी तिसऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय राहणे आवश्यक आहे.
कागदपत्रांची आवश्यकता:
vima sakhi yojana अर्ज करण्यासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्यामध्ये दोन नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि वयाचा पुरावा तसेच ,पत्त्याचा पुरावा, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आणि बँक खात्याचा तपशील यांचा समावेश आहे.
निष्कर्ष
विमा सखी योजना महिलांना स्वतंत्र आणि स्थिर करिअर घडवण्याची संधी प्रदान करते. एकीकडे महिला या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, तर दुसरीकडे त्यांना समाजात एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याची संधी मिळते. एलआयसीच्या या योजनेला महिलांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे, भारतात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.