लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना देणार महिन्याला दोन हजार रुपये
महाराष्ट्राचे राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला.योजनेमध्ये राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचे ध्येय ठेवून योजना सरकारकडून आकारण्यात आली. परंतु या योजनेचा सत्ताधारी पक्षाला फायदा होतानाचा अंदाज सर्वच राजकीय पक्षाला दिसत आहे.
लाडकी बहीण योजना सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कार्य सुरू आहे. सत्ताधारी विरोधकांच्या नावाने ओरडतात तर विरोधक सत्ताधाऱ्यांनी ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे ही फक्त निवडणूक होई पर्यंत योजना चालणार आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य विरोधकांकडून केली जात आहेत. आता यामध्ये ज्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये या प्रमाणात निधी दिला जातो त्या महिलांना आता विरोधकाकडून म्हणजेच काँग्रेसच्या दिवंगत नेत्या कडूनच मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये लाभ देऊ असे आश्वासन देण्यात आले.
राज्यातील लाडक्या बहिणींना प्रति महिना दोन हजार रुपये देणार
आमचं सरकार सतेत आल्यास आम्ही महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देऊ असे आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे मोदी सरकार व महाराष्ट्रातील राज्य सरकार यांच्यावर टीका करत आम्ही आमचं सरकार आल्यानंतर राज्यातील महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी केली.
या कार्यक्रमात दिले आश्वासन
सांगलीचे दिवंगत नेते माननीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम सांगली या ठिकाणी आयोजित केला होता. या ठिकाणी राहुल गांधी तसेच मल्लिकार्जुन खर्गे आणि आदि मान्यवर हे सुद्धा उपस्थित होते या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषणा दरम्यान मोदी सरकार तसेच राज्यातील सत्तेतील सरकारवर जोरदार टीका करीत त्यांनी राज्यातील प्रसिद्धीस असलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी बोलताना महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले आहे. जर आमचं शासन आलं तर आम्ही राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये एवढा लाभ लाडकी बहीण योजनेअंतर्गत देऊ असं आश्वासन त्यांनी या कार्यक्रमात दिलं.
Milana don hajr oayeje mukhematei saheba aamla don hajr heve hi nbr viniti