Cabinet Decision 2024 आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तलाठी आणि कोतवाल पदाचे नाव बदलण्यात आले आहे हे नाव बदलून आता कोणते नाव देण्यात आले आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत शासनाला वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार या पदांची नावे आता बदलण्यात आलेली आहेत त्यामुळे तलाठी आणि कोतवाल या पदाचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्यात आले आहे याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तलाठी आणि कोतवाल पदाचे नाव बदलण्यात आले आहे तलाठी यांना यापुढील काळात ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे तर कोतवाल यांना महसूल सेवक या नावाने ओळखले जाणार आहे नवीन प्रकाशित शासन निर्णयानुसार आता तलाठी पदासाठी ग्राम महसूल अधिकारी या नावाने ओळखले जाणार आहे.
Cabinet Decision 2024 कोतवालाचे नाव बदलून ‘महसूल सेवक’ :
Cabinet Decision 2024 जिल्हाधिकारी यांनी नमूद केलेली नोंदणी पत्रके रजिस्टर आणि जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते जमीन महसूल आणि जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रक्कम त्याला गोळा कराव्या लागतात कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावात संबंधित लिहिण्याचे काम तलाठ्यांना करावे लागते.
महसूल विभागांमधील तलाठी संवर्गाच्या पद नामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्या द्वारे करण्यात आली होती महसूल विधानसभेच्या विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनाम मध्ये बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्यात आले आहे. तलाठ्यांना गावांमधील सर्व कर किंवा सर्व जमिनीबद्दल सर्व माहिती नोंदवावी लागते त्यामुळे त्याला त्यांना वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस जी कामे सांगतील ती सर्व कामे त्यांना करावी लागतात त्यामुळे तलाठी हे एक महत्त्वाचे असे पद आहे. Cabinet Decision 2024
राज्यांमधील कोतवालांनी मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागणीत कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करावे अशी मागणी केली जात होती राज्य शासनाच्या समितीने कोतवाल पद हे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असल्यामुळे कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोतवाल पदाची नाव बदलून आता महसूल सेवक असे करण्यात आले आहे. Cabinet Decision 2024