ration card ekyc रेशन आता घरबसल्या करता येणार केवायसी : अशी करा केवायसी आपल्या मोबईल वरुन.

ration card ekyc : देशाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब असणाऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरित केले जाते. शासनाच्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांची ई केवायसी ही करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यापुढे इ केवायसी केलेल्या लाभार्थ्यांनाच रेशन कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या लाभ वितरित केले जातील. त्यामुळे इ केवायसी करणे हे अत्यंत बंधनकारक आहे.


ई केवायसी करण्यासाठी याआधी जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपण आपली ई केवायसी पॉस मशीनच्या सहाय्यानेच करता येत होती. यामध्ये नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत होता, ज्यामुळे स्वस्त धान्य दुकानात गर्दी टाळण्यासाठी व पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आता सरकारकडून मेरा ई केवायसी या नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून स्वतः लाभार्थी घरबसल्या आपल्या रेशन कार्ड मधील नावाची ई केवायसी पूर्ण करू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ration card ekyc

ई केवायसी का आहे बंधनकारक ration card ekyc

ration card ekyc रेशन कार्ड ला आधार सलग्न असलेली व्यक्ती आणि रेशन कार्ड मधील व्यक्ती खरी असल्याचे खात्री करण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. रेशन कार्ड प्रणालीमध्ये बनावट लाभार्थ्यांची नावे वगळता यावी व खऱ्या लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ वितरित करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांची ई केवासी करणे महत्त्वाचे आहे. ई केवायसी केल्याने लाभार्थ्याची पूर्ण ओळख पटते आणि ज्या लाभार्थ्यांची ओळख पटत नाही. अशा बनावट लाभार्थ्यांना या योजनेमधून कायमचे वगळण्यात येते. त्यासोबतच मयत असणारे लाभार्थी यांची देखील केवायसी यामध्ये करणे शक्य नाही. ज्यामुळे मयत लाभार्थ्यांची नावे देखील रेशन कार्ड मधून वगळण्यास मदत होईल. त्यामुळे ई केवायसी करणे हे अत्यंत महत्त्वाचे व बंधनकारक ठरवण्यात आले आहे.

ration card ekyc रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया.

सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून मेरा ई केवायसी ॲप डाऊनलोड करावे लागेल.
ॲप डाऊनलोड झाल्यानंतर आपल्यासमोर काही परवानगी मागितल्या जातील. त्या सर्व परवणग्या देणे आवश्यक आहे.

परवानगी दिल्यानंतर आपल्यासमोर येणाऱ्या या एरर साठी आपल्या मोबाईल मध्ये आणखी एक ॲप असणे आवश्यक आहे. आपल्या मोबाईल मध्ये आधार फेस आरडी सेवा ॲप हे ॲप देखील डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

ration card ekyc ई केवायसी करण्यासाठी मेरा ई केवायसी ॲप ओपन केल्यानंतर आपले राज्य निवडून व्हेरिफाय लोकेशनवर यावर क्लिक करा.

पुढे आपला आधार क्रमांक टाकून जनरेट ओटीपी वर क्लिक करा आपल्या आधार संलग्न असणाऱ्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी या ठिकाणी एंटर करा.

फेस ई केवायसी या पर्यायावर क्लिक करा आणि मोबाईलच्या सेल्फी कॅमेरा सुरू झाल्यावर त्यासमोर फोटो घ्या. फोटो घेताना पूर्ण चेहरा फोटोमध्ये येईल अशा पद्धतीने मोबाईल धरा फोटो घेत असताना डोळ्याची उघड झाप करा जेणेकरून ऑटो सिस्टम नुसार तुमचा फोटो घेतला जाईल.

फोटो घेतल्या नंतर सबमीट या पर्यायावर क्लिक करा. सबमीट केल्या नंतर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

हे वाचा : सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.

1 thought on “ration card ekyc रेशन आता घरबसल्या करता येणार केवायसी : अशी करा केवायसी आपल्या मोबईल वरुन.”

Leave a comment

Close Visit Batmya360