दातांचे उपचार मोफत ! राज्य सरकार योजना

दातांचे उपचार मोफत ! राज्य सरकार योजना

दातांचे उपचार मोफत

           राज्य सरकार हे वेगवेगळे योजना राबवत आहे. राज्य सरकारने आरोग्य संबंधी अनेक आजारांसाठी वेगवेगळे योजना लागू केलेले आहेत. गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य संबंधित अनेक आजारांवर उपचारा साठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तसेच राज्य सरकारच्या नवीन योजनामुळे राज्यातील व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दंत वैद्यकीय उपचाराचा समावेश होणार आहे असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. दातांच्या समस्या ह्या खूप प्रमाणात वाढलेले आहेत गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती या दातांच्या आजारावर उपचार करू शकत नाहीत . तसेच मेडिक्लेममुळे अनेक आजारावरती खर्च कमी होतो. पण दंत चिकित्सेसाठी वैद्यकीय योजनाच लागू होत नाहीत, हे आपण पाहिले असेल. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचा समावेश होणार आहे. ही योजना मुंबई पुणे आणि इतर शहरातील खासगी रुग्णालयातही योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा सर्वसामान्य लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे. यासाठी डेलिगेशन रुग्णालयांना भेट देणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. या योजनेचा राज्यातील गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बळ  असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
दातांचे उपचार मोफत

हा असमतोल कसा भरून काढणार?

दातांचे उपचार मोफत या योजनेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5  लाखापैकी केवळ 1.5 लाख रुपये विमा कंपनी देणार असून उर्वरित 3.5 लाख रुपयांची हमी राज्य सरकार घेणार असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.

एकत्रित योजनेतील 1 हजार रुग्णालयाचा समावेश

दातांचे उपचार मोफत

   131 उपचार प्रायव्हेट आणि शासकीय रुग्णालयात दिले जातील जुलैअखेरपर्यंत सगळ्या रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट केल जाईल असे तानाजी सावंत म्हणाले.

या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 1000 इतक्या मर्यादित पर्यंत रुग्णालये अंगीकृत करण्याची मर्यादा होती. या योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले असून याबाबत शासन निर्णयास अनुसरून राज्यातील योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयाची संख्या खालील प्रमाणे 1900 इतकी होणार आहे. याबाबत यात विद्यमान एकत्रित योजनेतील एक हजार रुग्णालयाचा समावेश असल्याचे तानाजी सावंत म्हणाले.

सात जिल्ह्यामध्ये 140 खाजगी रुग्णालये

  •  महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गावांसाठी 150 रुग्णालयांचाही समावेश आहे.
  •  कर्नाटकच्या सीमेला लागू असलेल्या महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये 140 खाजगी रुग्णालये आहेत.
  •  आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागू असलेल्या कर्नाटकातील(बिदर, कलबुर्गी, कारावार, आणि बेळगावी) 4 जिल्ह्यामधील दहा खाजगी रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार आहेत.
  •  संपूर्ण महाराष्ट्रातील 200 रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार आहे.

अशी माहिती यावेळी देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महानगरपालिका आणि नगरपरिषद रुग्णालये यांच्या नियंत्रणाखाली सुमारे 450 रुग्णालयाचा समावेश असेल. तसेच असे सांगण्यात आले महाराष्ट्रातील मागास भागात स्थापन करण्यात येणारी इच्छुक आणि पात्र नवीन 100 रुग्णालयाचा समावेश असेल.

Leave a comment