Devendra Fadnavis उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोका लावा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली , मुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis)फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मोक्का (MCOCA) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीव्ही 9 कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील उद्योग वेगळ्या राज्यात जात असल्याच्या आरोपांना उत्तर देत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Devendra Fadnavis

उद्योग क्षेत्रासाठी मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात बोलताना या निर्णयाची घोषणा केली. उद्योगधंद्यांच्या वाढीला अडथळा आणणारे आणि संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि उद्योगपतींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हे वाचा : मोका कायदा काय आहे ? हा कायदा कधी लागू होतो आणि शिक्षेची तरतूद कशी आहे? याबद्दल सविस्तर माहिती पहा!

महाराष्ट्राचा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीविषयीही मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहे. खरं तर, हा टार्गेट 2028 मध्येच पूर्ण होणार होता. मात्र, दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाल्याने ही प्रक्रिया थोडी लांबली आहे . तरीही, महाराष्ट्र हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्ण तयारीने पुढे जात आहे.

महाविकास आघाडीच्या काळात मंदी

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आर्थिक स्थितीवरही भाष्य केले. त्यांच्या मते, त्या काळात महाराष्ट्राची ग्रोथ रेट निगेटिव्ह होती. कोविड हा एक मोठा कारण होता, पण इतर राज्यांनी आणि देशानेही सकारात्मक ग्रोथ दाखवला होता. मात्र, त्या काळातील सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात विकासाची गती मंदावली. अनेक पायाभूत प्रकल्प आणि मोठे प्रकल्प रोखण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबला होता. मात्र, आता सरकारने पुन्हा वेगाने काम सुरू केले असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे.

आपण नंबर वन आहोत…

इंडस्ट्री वेगळ्या राज्यात जात आहे हा आरोप तथ्याशिवाय आणि कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता होत आहे.  आता मी दावोसमध्ये होतो. सहा राज्य होते. मूख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, काही लोक असे आरोप करतात की उद्योग महाराष्ट्र सोडून जात आहेत, मात्र हे तथ्य नसून, अभ्यासाशिवाय असे दावे केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या दावोस परिषदेवेळी इतर राज्यांना मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन मिळाले नाही, मात्र महाराष्ट्राने 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे.

2023 – 2024 आणि 2025 या प्रत्येक वर्षात महाराष्ट्र परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) अव्वल स्थानी राहिला आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्र एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील राज्याच्या तुलनेत तीन पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. देशात 10 राज्य स्पर्धा करतात. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट महाराष्ट्रात येईलच असं नाही. पण याचा अर्थ महाराष्ट्र मागे गेला आहे, असं नाही. आपण नंबर वन आहोत. नंबर वन असू असा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

उद्योगांना संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर भर दिला. त्यांच्या मते, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, त्यामुळेच उद्योग आणि गुंतवणूकदार येथे येत आहेत. त्यांनी कोका कोला कंपनीचा उल्लेख करत सांगितले की, काही लोकांनी त्यांच्या प्रकल्पात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. पन मात्र, सरकारने त्यावर कठोर कारवाई केली.

यापुढे जर कोणत्याही उद्योगात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला, तर अशा व्यक्तींवर थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उद्योगांच्या वाटेत अडथळे निर्माण करणे कठीण जाईल.

महाराष्ट्रातील उद्योगांचे भविष्यातील स्थान

महाराष्ट्र राज्य हे नेहमीच गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण राहिले आहे. मोठमोठे उद्योग गृहीत धरून राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. सरकारने आता उद्योगांमध्ये होणारे अडथळे दूर करण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र अधिक मजबूत होईल आणि भविष्यातील आर्थिक वाढ अधिक वेगाने होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संदेश दिला असून, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.Devendra Fadnavis

Leave a comment