Gharkul anudan: केंद्र सरकारने देशांमध्ये सर्वांसाठी घरे असे धोरण जाहीर केलेले आहे. यानुसार देशातील बेघर आणि कच्च्या घरात वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे याकरिता शासन प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाच्या या धोरणालाच प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने अतिरिक्त 50000 रुपये घरकुल लाभार्थ्यांना देण्याची घोषणा केली. या संमती शासनाकडून 4 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम वितरित केली जाणार आहे. या 50 हजार रकमेसाठी कोणते घरकुल लाभार्थी पात्र असतील आणि लाभ कसा मिळेल याची माहिती पाहुयात.

केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 01 अंतर्गत 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये हा टप्पा पूर्ण केला. त्यानंतर केंद्र सरकारने देशांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 राबवण्यास मान्यता दिली. टप्पा 2 मध्ये 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी हा सुरू करण्यात आलेला आहे. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय देखील टप्पा 2 साठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच अतिरिक्त 5000 हजार रुपयांचे रक्कम वितरित केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक उद्दीष्ट
महाराष्ट्र राज्यामध्ये बेघर आणि गरीब नागरिकांना हक्काचं घर वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला 19 लाख 66 हजार घरकुलांचे उद्दिष्ट दिलेला आहे. यामध्ये बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना जास्तीचा खर्च येत असल्याने राज्य शासनाने यामध्ये लाभार्थ्यांना अतिरिक्त 50000 हजार रुपये रक्कम वितरित करण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अधिक अनुदान देऊ केले जाणार आहे.
कसा मिळेल लाभ Gharkul anudan
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवल्या जातात. योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य सरकार अतिरिक्त 50000 हजार रुपये एवढे अनुदान वितरित करणार आहे. हे अनुदान राज्य शासन बांधकामासाठी 35 हजार रुपये अनुदान वितरीत करणार आहे. आणि उर्वरित 15000 हजार रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1kw मर्यादेपर्यंत सौर ऊर्जेची निर्मिती युनिट बसवण्यासाठी अतिरिक्त अनुदान राज्य शासन देणार आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान या अनुदानामध्ये अतिरिक्त पंधरा हजार रुपये राज्य शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. फक्त घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी 35 हजार रुपये एवढाच अतिरिक्त निधी मिळणार आहे. उर्वरित असणारा 15000 रुपयांचा निधी हा प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे. जर घरकुल लाभार्थी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ घेत नसेल तर; लाभार्थ्याला फक्त 35 हजार रुपये एवढेच अनुदान राज्य सरकार घर बांधकामासाठी वितरित करणार आहे.
कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार 50000 लाभ Gharkul anudan
शासनाने अतिरिक्त रक्कम वितरित करण्याचे धोरण आखलेले आहे. ही अतिरिक्त रक्कम कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार हा देखील प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राज्य शासन घरकुल संबंधी योजना राबवते. ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजना. अशा विविध योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जातात. या सर्व योजनांना केंद्र शासनाचा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत चा निधी वितरित केला जातो. यातच आता राज्य शासनाने भर घालून या लाभार्थ्यांना 50000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
राज्य शासनाच्या अधिपत्याखालील योजना ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना , मोदी आवास योजना , यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. या योजनांच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त घरकुल बांधकाम करणाऱ्यांना 50,000 अनुदान वितरित केले जाणार आहे.
घरकुल अतिरीक्त 50,000 लाभ
Gharkul anudan राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना 50 हजार रुपये अतिरिक्त अनुदान देण्याची मान्यता दिली. हे अनुदान 2024-25 पासून घरकुल मंजूर असणाऱ्या लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. या अनुदानामध्ये 35 हजार रुपये हे अनुदान घराचे बांधकाम करण्यासाठी दिले जाणार आहे. उर्वरित पंधरा हजार रुपयांचे अनुदान हे पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनाच वितरित केले जाईल.
फक्त घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना हे 15000 रुपयाचा अतिरिक्त अनुदान वितरित केलं जाणार नाही. जर आपल्याला 50 हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल तर घरकुल बांधकामांसोबतच पीएम सूर्यघर योजनेचा देखील आपल्याला लाभ घ्यावा लागेल. पिएम सूर्य घर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारचे अनुदान याच्या व्यतिरिक्त राज्य शासन अधिकचे 15 हजार रुपये अनुदान पीएम सूर्यघर लाभार्थ्यांना वितरित करणार आहे.
घरकुल योजना अर्ज प्रक्रिया ,पात्रता ,कागदपत्रे.