महाराष्ट्रातील कैद्यासाठी जिव्हाळा कर्ज योजना

      नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सरकारच्या वेगवेगळ्या योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळे योजना अमलात आहे अशा बऱ्याच योजना आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. आपण आज या लेखाद्वारे असे एक योजना पाहणार आहोत या योजनेचे नाव आहे की. जिव्हाळा कर्ज योजना ही योजना कारागृहामध्ये हजारो कैदी शिक्षा भोगत असणाऱ्या लोकांच्या कुटुंबासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक कैदी हा मोठा गुन्हा केलेला असतो .असे होत नाही तो छोट्या मोठ्या घरातल्या वादामुळे तो व्यक्ती कारागृहामध्ये कैद असतो. अशा लोकांचा विचार करून शासनाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

         काही व्यक्ती अशी असतात की त्या घरातील कमवता व्यक्ती असतो. कमावता व्यक्ती  कैद असला की त्या परिवाराची काळजी काळजी कोण घेईल. असा विचार सरकारने केला ही योजना अमलात आणली. जेणेकरून त्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. त्यांच्या मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरामध्ये लागणाऱ्या वैयक्तिक खर्च. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन. महाराष्ट्र राज्यात शासनाकडून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 1 मे 2022  रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्य सरकारी  बँकेच्या वतीने जिव्हाळा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या  कुटुंबासाठी सात टक्के व्याज दराने 50  हजार रुपयाची कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्या कर्जाच्या सहाय्याने ती घरातील व्यक्ती आपल्या मुलांचे पालन पोषण करू शकते किंवा काहीतरी जोडधंदा सुरू करू शकतो असा या योजनेचा उद्देश आहे.

तसे शिक्षा भोगत असलेल्या लाभार्थी कैद्याची बँक खाते राज्य बँकेत उघडण्यात येणार आहेत. त्यामध्ये कैद्यांची उत्पन्न जमा करून प्रशासनाकडून त्यातून कर्जाची परतफेड घेण्यात येईल.

मित्र आणि मैत्रिणी राज्यात केंद्र वर राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात त्या सर्वांना माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला जिव्हाळा कर्ज योजनेची माहिती या लेखा देणार आहोत. तुम्ही ही माहिती सर्व वाचावी व तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जे कोणी कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या कुटुंबांना या योजनेची माहिती द्या जेणेकरून त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल

जिव्हाळा कर्ज योजना

योजनेचे नाव

जिव्हाळा कर्ज योजना महाराष्ट्र

राज्य

महाराष्ट्र

विभाग

समाज कल्याण विभाग महाराष्ट्र

अर्ज प्रक्रिया

 ऑफलाइन

अधिकृत संकेतस्थळ

उपलब्ध नाही

लाभ

पन्नास हजार रुपये रोख रक्कम

लाभार्थी

शिक्षा भोगत असलेले कैदी

योजनेचा उद्देश

कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणे

जिव्हाळा कर्ज योजना माहिती

     महाराष्ट्र सरकारची एक नवीन योजना आहे. ज्या परिवारातील व्यक्ती कैदी आहेत. आशा परिवाराला एक सरकारची आर्थिक मदत मिळेल. या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते जेणेकरून तो व्यक्ती व्यवसाय सुरू करू शकतील आणि नवीन जीवन सुरू करू शकेल. महाराष्ट्र राज्य बँकेत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची खात उघडण्यात येते. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कामाच्या मोबदल्यात मिळणारे पैसे या खात्यात जमा करण्यात येते. जमा झालेली ती रक्कम त्या कुटुंबातील व्यक्तींनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाते. त्यामुळे कैदी कारागृहात शिक्षा भोगत असताना सुद्धा स्वतःचा कुटुंबाचा सांभाळ करू शकते.

केंद्र सरकार / राज्य सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू करत असते त्याचप्रमाणे ही जिव्हाळा कर्ज योजना एक आहे.

जिव्हाळा कर्ज योजना उद्देश

  •  या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील व्यक्ती कैदी आहेत त्या व्यक्तीला या योजनेची खूप मोठी मदत मिळेल.
  •  जिव्हाळा कर्ज योजना या आधारे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून मिळेल हा या योजनेचा  उद्देश आहे.
  •  महाराष्ट्र राज्यातील एखाद्या घरातील  कर्ता व्यक्ती कैद असेल. तर त्या कुटुंबांना  दैनंदिन गरजांसाठी आर्थिक सहाय्यक करण्याच्या उद्देशाने, जिव्हाळा कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
  •  कारागृहात कैद असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना आता कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच  कोणाकडून कर्ज काढायची गरज पडणार नाही. हा या योजनेचा उद्देश आहे.
  •  महाराष्ट्र राज्यातील कैद्यांच्य  कुटुंबाचे भविष्य उज्वल बनविणे. 

जिव्हाळा कर्ज योजना वैशिष्ट्ये

  •  महाराष्ट्र राज्यातील शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणेच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहात जिव्हाळा  कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • या योजनेला कसल्याही प्रकारचा जात  व धर्माची मर्यादा नाही सगळ्या जाती धर्माच्या कैद्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येईल.
  • जिव्हाळा कर्ज योजना अंतर्गत दिली जाणारी रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.
  •  जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड रकमेमधील 12 टक्के निधी कैद्याच्या  कल्याण निधीला देण्यात येते कर्ज योजना अंतर्गत

जिव्हाळा कर्ज योजना लाभार्थी

  • एखादी व्यक्ती दीर्घकाळासाठी शिक्षा भोगत असेल अशा व्यक्तीच्या कुटुंबासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेसाठी लाभार्थी हा व्यक्ती तीन वर्षासाठी कैदी असला पाहिजे त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल.
  • जिव्हाळा कर्ज योजनेमध्ये किती कर्ज दिले जाते
  • जिव्हाळा कर्ज योजनेमध्ये 50,000 हजार रुपयाची कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत त्या रकमेवर 7 टक्के व्याजदर आकारला जातो.
  • या कर्जाची परतफेड कालावधी हा तीन वर्षाचा निश्चित केला गेला आहे.

जिव्हाळा कर्ज योजना लाभ

  • महाराष्ट्र राज्यामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना जिव्हाळा योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाऊ शकते.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कैद्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.
  •  या योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबाचे आर्थिक जीवनमान सुधारेल.
  •  या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला विकास होण्यास मदत होईल.
  •  या योजनेसाठी जी रक्कम आपण घेणार आहोत त्या रकमे करता व्याजदर हा कमी आकारला जातो.
  •  या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबातील व्यक्ती कैद आहे त्या कुटुंबाला कर्ज मिळवण्यासाठी जमीन किंवा वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता लागणार नाही.
  •   जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयाच आर्थिक लाभ दिला जाऊ शकतो. व त्या कुटुंबाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही

जिव्हाळा कर्ज योजना पात्रता

  • शिक्षा भोगत असलेला कैदी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  •  जो व्यक्ती दीर्घकाळ शिक्षा भोगत असेल त्या व्यक्ती करिता जिव्हाळा कर्ज योजनेसाठी पात्रता आहे
  • कैदी हा तीन वर्षासाठी शिक्षा भोगणे आवश्यक आहे.
  • त्या व्यक्तीने कर्ज परतफेड करण्याची क्षमता दर्शवली पाहिजे.

जिव्हाळा कर्ज योजना अटी व शर्त

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याचे कैद्यांच्या कुटुंबांना दिला जाऊ शकतो
  •  महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कैद्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  या योजनेचा लाभ  दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
  • या योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड ही जबाबदारी राज्य शासनाची असणार नाही.
  • या योजनेअंतर्गत कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी व त्यांचे कारागृहातील उत्पन्न बघून या योजनेचा लाभ दिला जाईल.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी कैद असलेल्या व्यक्तीची संमती असणे गरजेचं आहे तरच त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या कैद्यांची संमती नसेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
जिव्हाळा कर्ज योजना

जिव्हाळा कर्ज योजना अवश्यक लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई – मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • शपथ पत्र
  • आधार लिंक असलेले बँक खाते.

जिव्हाळा कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम कुटुंबातील व्यक्ती शिक्षा भोगत असलेल्या कारागृहात जावे लागेल व त्या कारागृहातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून सोबत  योग्य ती कागदपत्रे जोडावी व भरलेला अर्ज कारागृहातील अधिकाऱ्याकडे जमा करावा. अशा प्रकारे तुमची जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्ज भरल्यानंतर करण्यात येणारी कार्यवाही

ज्यावेळेस अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर प्रत्येक अर्ज अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतो.

* अधिकारी योजनेतील माहिती व कागदपत्रांची तपासणी करतात  कैद्यांची उत्पन्न व त्याच्या शिक्षेचा कालावधी पाहून या योजनेसाठी पात्रता ठरविण्यात येते

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  •  शिक्षा भोगत असलेला कैदी हा महाराष्ट्र मूळचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  •  जो कैदी शिक्षा भोगत आहे त्या कैद्याचा कालावधी कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • त्या कैद्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात दिली जाणारी मानधन कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये चुकीची व खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल

निष्कर्ष

      आम्ही तुम्हाला जिव्हाळा कर्ज योजनेची सर्व माहिती या लेखाद्वारे दिलेली आहे हा लेख तुम्ही संपूर्ण वाचावा व तुमच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आजूबाजूच्या परिसरातील , नातेवाईकातील व्यक्ती जर कोणी शिक्षा भोगत असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबांना या योजनेची माहिती द्या हा लेख शेअर करावा जेणेकरून त्या व्यक्तीला  योजनेचा लाभ घेता येईल.

विचारले जाणारे प्रश्न

1 जिव्हाळा कर्ज योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

* जिव्हाळा कर्ज योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे.

2 जिव्हाळा कर्ज योजने अंतर्गत किती लाभ दिला जातो?

* जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत 50000/- हजार रुपये कर्ज दिले जाते.

3 जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत किती व्याजदर आकारला जातो?

* जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत 7 टक्के व्याजदर आकारला जातो.

4 जिव्हाळा कर्ज योजनेसाठी कोण लाभार्थी आहे?

* जिव्हाळा कर्ज योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेला कैदी. व त्या कैद्यांच्या कुटुंबातील व्यक्ती  या योजनेसाठी लाभार्थी आहे.

5 जिव्हाळा कर्ज योजनेचा उद्देश काय आहे?

* जिव्हाळा कर्ज योजनेचा उद्देश असा आहे की ज्या कुटुंबातील व्यक्ती शिक्षा भोगत आहे त्या  कैद्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे.

6 जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?

* जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.

2 thoughts on “महाराष्ट्रातील कैद्यासाठी जिव्हाळा कर्ज योजना”

Leave a comment