दुध काढणी यंत्र. Milking Machine Price
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज दुग्ध व्यवसायासाठी महत्त्वाचे असणारे मशीन म्हणजे दूध काढणी यंत्र याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. खरंच बघितलं तर भारत देश हा जगात दूध उत्पादनासाठी प्रथम स्थानावर आहे परंतु बाहेरील देशातील जेवढे तंत्रज्ञानचा वापर केला जातो तेवढा तंत्रज्ञानाचा भारततात दुग्ध व्यवसायासाठी वापरले जात नाही.दुग्ध व्यवसाय हा आधी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून संबोधला जायचा परंतु आज मागणी वाढल्याने आजच्या काळात दुग्ध व्यवसाय एक प्रमुख व्यवसाय बनला आहे.या व्यवसायातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती केली आहे.या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्या उत्पादनात दहा ते वीस टक्के पर्यंत वाढ नक्कीच होईल.
मागील काही वर्षापासून नवीन तंत्रज्ञाचा वापर करून दुग्ध व्यवसायिकांनी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवले आहे.भारतात गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या समूहाकडून दूध काढणी यंत्राची निर्मिती केली जाते. याच्या किमतीहि शेतकऱ्यांना परवडण्या सारख्या आहेत.
दुध काढणी यंत्राचे फायदे.
आपण जर पाहिले तर हाताने धार काढण्यास शेतकऱ्यांचा जास्त वेळ जातो. जर अपणाकडे जास्त प्रमाणात जनावरे असतील तर आपणास मजुरांवर अवलंबून राहावे लागते. जर आपल्या जवळ Milking Machine दूध काढणी यंत्र असेल तर आपणास जास्त वेळ लागणार नाही आणि घरातील कोणतीही व्यक्ती या मशीन च्या साह्याने धार काढू शकतो.
मजुरांवरील खर्च कमी होऊन आपल्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण देखील वाढते.
जनावराच्या कासेला इजा होत नाही. वेळ कमी लागल्यामुळे जनावरे पान्हा मारत नाहीत. एकच वेळी चार ही सडा मधुन दूध निघते दुधाचे दर्जा चांगला मिळतो. मशीन चा वापर केल्यास कासेला लागलेली घान दुधात मिसळत नाही व आपल्या दुधाची गुणवत्ता उच्च प्रतीची मिळते.मशीन चा वापर केल्यास आपणास 10ते 20% उत्पन्न सुद्धा जास्त मिळते.
दुध काढणी यंत्राचा वापर
दूध काढणी यंत्र हाताळणे अगदी सोप्या पद्धतीचे आहे. नवीन नवीन आपणास हे मशीन वापण्यास अडचनी येऊ शकतात.परंतु योग्य प्रशिक्षण घेऊन आपण सहजरित्या या मशीनचा वापर करू शकतो. तसेच आपण ज्या कंपनीची मशीन घेतो त्यांच्या कडून सुद्धा आपणास प्रशिक्षण दिले जाते.
दुध काढणी यंत्राच्या किमती
दूध काढणी यंत्रामध्ये यंत्रामध्ये
१) सिंगल बकेट दूध काढणी यंत्र
२) डबल बकेट दूध काढणी यंत्र
३) फोर बकेट दूध काढणी यंत्र
४)सिक्स बकेट दूध काढणी यंत्र
असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्या प्रकारानुसार त्यांच्या किमती ठरवलेल्या असतात.
साधारणपणे बाजारात वेगवेगळ्या कंपनी च्या वेगवगळ्या प्रकारात १०००० ते १५०००० पर्यंत दुध काढणी यंत्राच्या किमती आपणास बाजारात पाहण्यास मिळतात .
१) सिंगल बकेट दूध काढणी यंत्र (एक ते चार जनावरासाठी ) सरासरी किमत १२००० रुपये
२) डबल बकेट दूध काढणी यंत्र ( चार ते दहा जनावरासाठी ) सरासरी किमत १८००० रुपये
३) फोर बकेट दूध काढणी यंत्र (दहा ते पंचवीस जनावरासाठी ) सरासरी किमत २४००० रुपये
४) सिक्स बकेट दूध काढणी यंत्र (पंचवीस ते पन्नास जनावरासाठी ) सरासरी किमत ४२०००
FAQ
QUE 01) दूध काढण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती ?
ANS : गायीच्या किवा म्हशीच्या डाव्या बाजूला बसून मूठ मारून दूध काढणे ही सर्वोत्तम पद्धत आहे.
QUE 02) गाय ( पान्हा चोरणे/ पान्हा मारणे ) दूध लपवू शकते का ?
ANS : उत्तर आहे हो गाय दूध लपवू शकते
QUE 03) गायीने दूध न दिल्यास किवा गाईचे दूध न काढल्यास काय होईल?
ANS : गाईचे दूध बरेच दिवस जर नाही काढले तर तिच्या कासेला जखम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधी कधी दूध न दिल्यास गायीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
QUE 04) जर्सी गाय किती दिवस दूध देते ?
ANS : साधारण पणे जर्सी गाय 10 महिन्या पर्यन्त दूध देते 2/3 महीने विश्रांति नंतर हे चक्र नेहमी चालूच राहते.
QUE 05 ) दूध उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते?
ANS : दूध उत्पादनात राजस्थान राज्य अव्वल स्थानी आहे.
QUE 06 ) भारतात दूध उत्पादन किती आहे ?
ANS : भारत देश 2021-2022 मध्ये सर्वाधिक दूध उत्पादक देश ठरला आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा 24 % वाटा आहे.
QUE 07 ) भारतातील सर्वात मोठा डेअरी उद्योग कोणता आहे ?
ANS : अमूल किंवा गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड. यांचा भारतातील सर्वात मोठी डेअरी उद्योग आहे.
QUE 08) सर्वात चांगले दूध कोणत्या गाईचे असते ?
ANS : गिर गाईचे दूध सर्वात चांगले मानले जाते.
2 thoughts on “Milking Machine Price – दुध काढणी यंत्र”