PM Surya Ghar Yojna – पीएम सूर्य घर योजना
सौर ऊर्जा वापरासाठी केंद्र सरकार खूप मोठया प्रमाणात योजना आखत आहे. मागील काही दिवसात केंद्र सरकार कडून सौरऊर्जा प्रगतीला चालना मिळावी या साठी सरकार कडून काही योजना अमलात आणल्या जात आहेत. कृषि सौर पंप सारख्या योजनेने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या मुळे शेतकऱ्यांना दिवसा लाइट उपलब्ध करून देण्यात आली. या यशस्वी योजने नंतर देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना या योजणेची घोषणा केली आहे.
पंतप्रधान .श्री. नरेंद्र मोदी यांनी मोफत 300 यूनिट पर्यन्त वीज या योजनेची घोषणा केलेली आहे. आता झालेल्या अर्थसंकल्पात या साठी 750000 करोड रुपये निर्धारित केलेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभयार्थ्याना अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पीएम सूर्य घर योजना मार्फत गरीब कुटुंबाला वीज बिलापासून सुटका मिळणार आहे.
या योजनेचा लाभ प्रामुख्याने घरगुती विज वापर करणाऱ्या लाभार्थी यांना वितरित केला जात आहे. ज्या लाभार्थी यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना सरकार च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्रता नोंदणी प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
आजच्या या लेखात आपण पीएम सूर्य घर योजना मध्ये लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया या विषयी सर्व माहिती पाहणार आहोत.

योजनेचे नाव | पीएम सूर्यघर योजना |
योजनेचा विभाग | भारत सरकार विद्युत मंत्रालय |
योजनेचे लाभार्थी | भारतीय गरीब व मध्यमवर्गीय कुटुंब |
योजने अंतर्गत लाभ | 300 यूनिट पर्यन्त मोफत वीज |
योजनेचा उद्देश | एक कोटी घरांना मोफत वीज |
योजना अर्ज पद्धती | ऑनलाइन |
पीएम सूर्यघर योजना उद्देश
सौर ऊर्जा वापरात वाढ करणे व वीज निर्मिती करून भारतातील 1 कोटी कुटुंबाला मोफत वीज पुरवठा करणे हा पीएम सूर्य घर योजना चा मुख्य उद्देश. पीएम सूर्य घर च्या माध्यमातून एक कोटी कुटुंबाला आर्थिक बचत मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबाला 300 यूनिट पर्यन्त मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. एक कोटी घर प्रकाश मय करणे तसेच नवीन रोजगाराच्या संधि उपलब्ध होतील. असा या योजनेचा उद्देश आहे.
पीएम सूर्य घर योजना वैशिष्ट
- एक कोटी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला लाभ देणे.
- एक कोटी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला 300 यूनिट पर्यन्त मोफत वीज पुरवठा करणे.
- एक कोटी सौर पॅनेल घरावर बसवले जातील.
- सरकार कडून 60 टक्के पर्यन्त सबसिडी वितरित केली जाईल.
- उर्वरित 40 टक्के रक्कम बँके मार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल.
- पीएम सूर्य घर योजना अंदाजित खर्च 75000 कोटी रुपये.
- एक कोटी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला वीज बिलात सूट मिळणार आहे.
- सौर ऊर्जा वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होणार आहे.
पीएम सूर्यघर योजना पात्रता निकष
- भारतीय रहिवाशी असावा.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ति सरकारी नोकरीत नसावा.
- या योजनेसाठी सर्व जातीतील व्यक्ति पात्र असतील.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
- अर्जदारकडे मागील 6 महिन्यातील एक लाइट बिल असावे.
पीएम सूर्य घर योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- ओळख प्रमाणपत्र .
- निवासी प्रमाणपत्र .
- लाइट बिल .
- राशन कार्ड .
- बँक पासबूक .
अर्ज प्रक्रिया
आपण स्वत: https://pmsuryaghar.gov.in/ या पोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. किंवा आपल्या जवळील CSC सेंटर वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकता. अर्ज करताना काही अडचण निर्माण झाल्यास आपण आपल्या जवळील महावितरण केंद्र सोबत संपर्क करू शकता.
FAQ
- पीएम सूर्यघर योजना अधिकृत संकेतस्थळ कोणते?
- पीएम सूर्यघर योजना अधिकृत संकेतस्थळ https://pmsuryaghar.gov.in/ हे आहे.
- पीएम सूर्यघर योजना अंतर्गत किती यूनिट मोफत मिळतात ?
- पीएम सूर्यघर योजना अंतर्गत महिन्याला 300 यूनिट मोफत मिळतात.
- पीएम सूर्यघर योजना मध्ये अर्ज पद्धती कशी आहे ?
- पीएम सूर्यघर योजना मध्ये अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने आहे.
- पीएम सूर्यघर योजना अर्ज करण्याची शेवट तारीख किती आहे ?
- पीएम सूर्य घर योजना मध्ये अर्ज करण्याची शेवट तारीख 31 मार्च 2024 आहे.
- पीएम सूर्य घर योजना किती लोकांना लाभ मिळणार आहे ?
- पीएम सूर्य घर योजना अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे.