रब्बी हंगामात हरभरा बियाण्यांची निवड ; ‘हे’ आहेत हरभऱ्याचे उत्तम वाण : Rabbi Hangam Harbhara Vaan 2024

Rabbi Hangam Harbhara Vaan 2024 सध्या राज्यामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन हार्वेस्टिंग वेळ सुरू झाली आहे सोयाबीन काढण्याच्या वेळी दरवर्षी पाऊस सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान करत असतो यावर्षी देखील तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून सोयाबीन काढणीच्या वेळी 21 सप्टेंबर पासून राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Rabbi Hangam Harbhara Vaan 2024

आज आपण आपल्या या लेखामध्ये हरभरा पिकाचे दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या वान यांच्या बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया.

हे वाचा : कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थ्याची यादी

Rabbi Hangam Harbhara Vaan 2024 ही 04 वान :

सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकांसाठी योग्य असलेल्या वानांची निवड करत असतो यापैकी सर्वोत्तम रब्बी हंगामातील हरभरा वानाची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

जॅकी 9218 :

हा वान सर्वाधिक उत्पादन देणारे आणि लोकप्रिय असे वाण आहे त्याची लागवड महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात केली जाते या वानाची पक्वता कालावधी 105 ते 110 दिवसाची आहे कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रामध्ये लागवड करता येऊ शकते परंतु बागायती क्षेत्रात लागवड केल्यास हेक्टरी उत्पादन अधिक मिळते पेरणीसाठी एकरी 30 किलो बियाणे वापरण्याची शिफारस केली जाते.

विजय वान :

जॅकी 9218 या वानाच्या तुलनेमध्ये विजय हरभरा वाहनाचे दाणे खूप बारीक आहेत लवकर काढण्यासाठी येणारे हे वाण आहे पक्वता कालावधी 90 ते 105 दिवसाचा असतो बियाणे बारीक असल्यामुळे एकरी पेरणीसाठी बियाणे प्रति हेक्‍टर 20 किलो शिफारस केली जाते कोरडवाहू क्षेत्रांमध्ये लवकर काढणीस येणारे वाण आहे. बागायती मध्ये हेक्टरी 24 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारे हे वान आहे.

दिग्विजय वान :

Rabbi Hangam Harbhara Vaan 2024 हे वान मध्यम कालावधीचा असून 100 ते 105 दिवसांमध्ये काढणी करण्यास येतो दाणे टपोरे आणि मध्यम आकाराचे असून एकरी 30 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे लागतात बागायती क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन देणारे हे वान आहे हेक्टरी बागायती उत्पादन 25 क्विंटलपर्यंत आहे दिग्विजय हा एक उत्तम वान असून, या वानाची लागवड करता येऊ शकते.

फुले विक्रमी :

हा वान उंच वाढणारा आहे या वानाची लागवड कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रामध्ये करता येऊ शकते बागायती क्षेत्रामध्ये हेक्टरी 22 क्विंटल पर्याय उत्पादन मिळते तर कोरडवाहू क्षेत्रांमध्ये 16 क्विंटल उत्पादन मिळते एकरी 30 किलो बियाणे पेरणीसाठी वापरण्याची शिफारस केली जाते अधिक कालावधीचा हा वाण असून 100 ते 110 दिवस काढणीस लागतात उंच वाढणारा असून हार्वेस्टर द्वारे काढण्यासाठी योग्य वाण आहे. Rabbi Hangam Harbhara Vaan 2024

1 thought on “रब्बी हंगामात हरभरा बियाण्यांची निवड ; ‘हे’ आहेत हरभऱ्याचे उत्तम वाण : Rabbi Hangam Harbhara Vaan 2024”

Leave a comment