रोजगार संगम योजना महाराष्ट्र बेरोजगार तरुणांसाठी

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण आज महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित तरुणाला त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार उपलब्ध नाहीये, त्यामुळे सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत अशा बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारने रोजगार संगम योजना महाराष्ट्र द्वारे सुरू केलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना राज्य सरकार कडून रोजगार मिळवण्यासाठी मदत मिळेल जेणेकरून त्या तरुणांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतील. चला तर आपण आज या लेखांमध्ये या योजनेची माहिती, याचा लाभ कोणाला दिला जाईल, पात्रता काय आहे, अर्ज करण्याची पद्धत ,आवश्यक लागणारे कागदपत्रे ,या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख तुम्ही संपूर्ण वाचावा.

टीप :- रोजगार संगम योजना अंतर्गत कसल्याही प्रकारचा आर्थिक लाभ दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी 1500 / 2000 / 5000 प्रती महिना अश्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. हे पूर्ण खोटे आहे अशा प्रकारचा कोणताही आर्थिक लाभ या योजनेमार्फत दिला जात नाही. या योजनेच्या माध्यमातून आपणास रोजगार उपलब्ध करण्यासाठी मदत केली जाते हे लक्षात ठेवा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

रोजगार संगम योजना महाराष्ट्र माहिती

महाराष्ट्र राज्यात असे  तरुण सुशिक्षित आहेत परंतु त्यांना शिक्षणाप्रमाणे नोकरी नाही. नोकरी उपलब्ध नसल्यामुळे ते तरुण आज बेरोजगार आहेत. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना काम शोधण्यात हा कार्यक्रम मदत करेल. रोजगार संगम योजनेत निवडलेल्या सर्व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यात राज्य सरकार मदत करेल, जेणेकरून त्या तरुणांना त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी सरकारची मोठी मदत होईल.

निवडलेल्या व्यक्तींना या योजनेद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण देखील मिळेल, ज्यामुळे ते व्यवहारीक क्षमता आत्मसात करू शकतील. कौशल्य सुधारण्याचे प्रशिक्षण ऑनलाइन  सत्राद्वारे दिले जाईल. व त्यांच्या कौशल्य व शिक्षणाच्या आधारावर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana
योजनेचे नावरोजगार संगम योजना महाराष्ट्र
कोणामार्फत राबवली जातेमहाराष्ट्र शासनाद्वारे
विभागकौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
उद्देशबेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे
लाभरोजगार उपलब्ध करण्यास सहकार्य
लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
अधिकृत संकेतस्थळhttps://www.rojgar.mahaswayam.gov.in

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र उद्देश

  • या योजनेचा असा उद्देश आहे की राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
  • रोजगार संगम योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारकडून रोजगार मिळण्यासाठी मदत देण्यात येणार आहे, ही मदत तरुणांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत देण्यात येणार आहे.
  • रोजगार संगम योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्याकरिता कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांचा सामाजिक आर्थिक विकास करणे.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र फायदे

  • या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना कामाची नवीन संधी मिळणार आहे.
  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र अंतर्गत निवडलेल्या व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.
  • रोजगार संगम योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रोजगार मिळवण्यास मदत दिली जाईल.
  • अर्जदार व्यक्ती कौशल्य विकास कार्यक्रमाच्या मदतीने कौशल्य निर्माण करून सहजपणे रोजगार मिळवू शकतील..

तरुणांसाठी पीएमईजीपी योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र पात्रता

रोजगार संगम योजना महाराष्ट्र पात्रता खालील प्रमाणे आहेत

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria
  • अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असावे तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  • अर्जदार व्यक्तींकडे शैक्षणिक पदवी किंवा कोणत्याही व्यवसायिक अथवा नोकरीभिमुख कोर्समध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा कमीत कमी 12 उत्तीर्ण तरी असावा
  • लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती इतर कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या सेवेत रुजू नसावा.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. राशन कार्ड
  5. पासपोर्ट आकाराचे फोटो
  6. शैक्षणिक आणि डिप्लोमा प्रमाणपत्र
  7. ई-मेल आयडी
  8. मोबाईल क्रमांक
  9. जातीचे प्रमाणपत्र

pradhan mantri mudra yojana

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

रोजगार संगम योजना अटी व नियम

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे.
  • महाराष्ट्र बाहेरच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.
  • अर्जदार व्यक्ती जर 18 पेक्षा कमी वयाचा आणि 40 पेक्षा जास्त वयाचा असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावा बारावी उत्तीर्ण जर नसेल तर त्या व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असले पाहिजे जर लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबातले उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्रता नसेल.
  • लाभार्थी व्यक्तीकडे डिप्लोमा किंवा पदवीधरअसणे आवश्यक आहे.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला अधिकृत महास्वयंम वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर पेजवर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म ओपन होईल, नोंदणी फॉर्म ओपन झाल्यावर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि पुढील पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल तो OTP भरा
  • तो अर्ज सबमिट करा.

अशाप्रकारे तुम्ही रोजगार संगम योजना महाराष्ट्र महाराष्ट्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

नाबार्ड पशुधन लोन योजना

निष्कर्ष

आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये रोजगार संगम योजना महाराष्ट्र विषयी माहिती दिलेली आहे. या योजनेमध्ये योजनेचा लाभ, पात्रता, या योजनेचा फायदा, अटी व नियम, आवश्यक लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, या सर्वांची माहिती दिलेली आहे  आपण या योजनेचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

या योजनेच्या माध्यमातून आपणास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली जात नाही हे लक्षात असुदय आपणास जर कोणी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करून देतो असे संगत असेल तर आपण त्या पासून सावध रहा.

आणि जर आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा जवळील संपर्क मध्ये असे तरुण असतील ज्यांचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागलेली नाही त्यांना या योजनेबद्दल माहिती द्या किंवा हा लेख त्यांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आणि या माहितीबद्दल काही प्रश्न अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात आम्ही  तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू .

धन्यवाद!

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

विचारले जाणारे प्रश्न

  1. रोजगार संगम योजनेचा लाभ किती दिला जातो?
  • रोजगार संगम योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ दिला जात नाही या योजनेच्या माध्यमातून आपणास रोजगार मिळवण्यासाठी सहकार्य केले जाते.
  1. या योजनेची सुरुवात कुठे झाली?
  • या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे
  1. रोजगार संगम योजनेची अर्ज करण्याची पद्धत?
  • रोजगार संगम योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धत आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत महास्वयंम वेबसाईटवर जाऊन करावी लागेल.
  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किती असले पाहिजे किती आहे?
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष इतकेच असावे.
  1. या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना होणार आहे.

Milking Machine Price – दुध काढणी यंत्र

Leave a comment